म्हणुन बाळासाहेबाना काश्मिरी पंडित आपलं मानतात.

 म्हणुन बाळासाहेबाना काश्मिरी पंडित आपलं मानतात.  

१९९० चा तो काळ होता.जम्मु काश्मीर अक्षरश धगधगत होते.सामान्य लोकांचे जीणे हराम झाले होते.सहज रस्त्यातुन फिरायला बाहेर पडावे म्हटले तरी जिंवत परत येईल याची शाश्वती नव्हती.प्रत्येक रस्त्यावर भारतीय जवानांचा कडक पहारा असुनही अतिरेकी कधीही धडाधड गोळीबार करून पळुन जात.यामध्ये निरपराध नागरिक बळी पडत.

म्हणुन बाळासाहेबाना काश्मिरी पंडित आपलं मानतात.
यावेळी व्ही पी सिंग पंतप्रधान व मुफ्ती मोहम्मद सइद गृहमंत्री होते.केंद्र सरकार आपल्या परीने परिस्थिती हाताळत होते.पण परिस्थिती हाताबाहेर जात होती.म्हणुन जम्मु काश्मीर राज्यपाल पदी खमक्या माणूस हवा होता. कडक शिस्तीचे आधिकारी म्हणुन ख्याती असलेल्या जगमोहन व गिल यांच्या नावाचा विचार केंद्र सरकार करत होते.सर्वानुमते मग जगमोहन यांची राज्यपाल पदी निवड झाली.जगमोहन यांनी सुत्रे घेतल्या बरोबर दिसेल तो अतिरेकी टिपण्याचा आदेश लष्कराला दिला होता.अतिरेकी काश्मीर खोऱ्यात धुमाकूळ घालत होते.यावेळी त्यांनी खोऱ्यातील हिंदू पडिंताना लक्ष्य करावयास सुरुवात केली.पंडिताची घरे लुटणे, मुलींना पळवुन नेऊन अत्याचार करणे,सार्वजनिक ठिकाणी फिरावयास बंदी घालणे,धर्मांतर करणे असा छळ सुरू केला.अतिरेकाची सीमा गाठली व पंडिताच्या घरात जाऊन लहान मुले व पुरूषावर गोळया चालवुन हत्या होत होत्या.म्हणुन हिंदू पंडित जम्मु काश्मीर मधुन घरदार, शेती सोडून जीवानिशी बाहेर पडत होते.राज्यपालानी अतिरेक्या विरुद्ध कडक भूमिका घेतल्याचा हा परिणाम होता.राज्यात कायदा व सुव्यवस्था लयास गेली होती.अशातच खुद्द गृहमंत्री सइद यांची मुलगी रूबिया हिचे अतिरेक्यानी अपहरण केले.व सुटकेच्या बदल्यात पाच जहाल अतिरेकी सोडावयास केंद्र सरकारला भाग पडले.जम्मु काश्मीर मधुन बाहेर पडलेल्या हिंदू पंडित अक्षरश भिकेला लागला होता.सर्वच राजकीय पक्ष,नेते हे हताश होते आणि कोणतंही पाऊल उचलू शकत नव्हते हा एका दृष्टीने भारतीय लोकशाहीचा पराभव होता.काश्मीर खोऱ्यातून लाखो पंडितांना अक्षरशः हकलण्यात आलं होतं.कुटुंब कबिला घेऊन तो इतर राज्यात आश्रयाला आला.'खाली धरती वर आकाश' अशी त्याची परिस्थिती होती.केंद्र सरकारने ठिकठिकाणी छावण्या सुरू केल्या खरया पण पुढे काय? हा प्रश्न होताच.

काश्मिरी पंडिताना मदत

काही विस्थापित पंडित महाराष्टात पण आले होते.मिळेल ते काम करून आपल्या कुंटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.जम्मु काश्मीर मध्ये राव असलेले हे पंडित रंक झाले होते.कशीबशी मुले शिकत होती.यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेस सरकारचे राज्य होते.व मुख्यमंत्री शरद पवार होते.विरोधी पक्ष म्हणुन शिवसेना सरकारला धारेवर धरत होती.बाळासाहेब ठाकरे यांचा जबरदस्त धाक होता.त्यांचा प्रत्येक शब्द हा आदेश म्हणून स्वीकारला जायचा.यावेळी काश्मिरी पंडिताचे प्रतिनिधी शिष्टमंडळ आपल्या काही मागण्या घेऊन बाळासाहेबाना भेटायला मातोश्री वर गेले होते.बाळासाहेबानी त्यांची अगत्याने चौकशी केली.व काही मदत हवी असल्यास देण्याची तयारी दाखवली.यावेळी पंडितांनी सांगितले की, आम्हाला पैशाची मदत नको, पण मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी शैक्षणिक संस्थात आरक्षण मिळावं यासाठी आम्ही आलो आहोत.बाळासाहेबानी लगेच शब्द दिला.व म्हणाले की, राज्यात जरी माझे सरकार नसले तरी तुमच्या मुलांना शैक्षणिक मदत देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता नव्हती तरीही इतकं मोठं आश्वासन पंडितांना देणं आणि ते अमलात आणणं इतकी राजकीय इच्छाशक्ती आणि क्षमता ही केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्येच होती.बाळासाहेबानी लगेच आपली यंत्रणा कामास लावली. व आवश्यक त्या अर्ज आणि कागदपत्रांची पूर्तता करून महाराष्ट्रातील काही ठराविक संस्थांमध्ये महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांसाठी आरक्षणाची व्यवस्था ही केवळ बाळासाहेबांच्या मागणीवरून मान्य करण्यात आली.बाळासाहेबांच्यामुळेच आज  काश्मिरी हिंदूपंडीत तरूण  सुशिक्षित आहेत.इंजिनिअर आहेत. महाराष्ट्रात जे काही आरक्षण आहे, त्याचं संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना जातं.पण याचं श्रेय बाळासाहेबानी कधीही घेतलं नाही.म्हणुन देशाच्या विविध भागात स्थलांतरित झालेले काश्मिरी पंडित हे आजही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना याच कारणामुळे अभिवादन करत असतात

 -अनिल पाटील पेठवडगाव

9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম