अपंग असुनही मनाने खंबीर -सुभाष केर्लेकर

अपंग असुनही मनाने खंबीर -सुभाष केर्लेकर

देव आपल्याला जन्माला घालतो, तेव्हा एखाद्या साच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला अपेक्षित असतात. पण प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडतच असं नाही आणि एखादा जन्मतःच अपंगत्व घेऊन जन्माला येतो. तसेच धडधाकट जन्माला येऊनही पुढे जाऊन अपघाताने एखाद्याला अपंगत्व आलेलं असतं.त्यामुळे आलेल्या या अपंगत्वावर मात करत समोर ध्येय ठेऊन कुठलेही काम केलं तर असाध्य असं काहीच नाही, याची साक्ष म्हणजे शिरोली(पु) येथील सुभाष केर्लेकर होय. 

अपंग असुनही मनाने खंबीर -सुभाष केर्लेकर
यांचा आतापर्यंतचा थक्क करणारा प्रवास पाहता सुभाष खरंच दिव्यांग आहे का? तर… याचं उत्तर त्याला ओळखणारे प्रत्येक व्यक्ती ‘नाही’ असंच देईल.जन्मतःच सुदृढ असणाऱ्या सुभाष हा लहानपणापासून हट्टाकट्टा होता पण वयाच्या विसाव्या वर्षी मित्राच्या निष्काळजीपणामुळे मोटरसायकल व एसटीचा अपघात होऊन अपघातात त्याला उजवा पाय गमवावा लागला.घरची परिस्थिती बेताची होती. उजवा पाय नसल्याने जयपुर फुट वापरून त्याने शिक्षण चालू ठेवले. एखादी गोष्ट करण्याची इच्छा बाळगली, त्यासाठी अपार कष्ट घेतले तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही.आणि मेहनत करायला जे घाबरत नाही ते कधीही जीवनात अपयशी ठरत नाहीत… मग ते अपंग असले तरीही..

पदवीधर होऊन शासकीय नोकरीच्या मागे न लागता गावातच असणाऱ्या एमआयडीसीतील प्राज इंडस्ट्रीज मध्ये सुरूवातीला हेल्पर म्हणुन कामास सुरुवात केली.प्राज इंडस्ट्रीजचे मालक संजय शिंदे यांनी त्याच्यावर विश्वास टाकुन कारखान्याची जबाबदारी दिली. आणि सुभाषने ती सार्थ ठरवत कारखान्यातील पडेल ते काम करून सार्थ ठरवली.आज सुभाष लेथमशिन लिलया हाताळतो शिवाय सीएनसी मशिनही चालवण्यात त्यांचा हातखंडा आहे.बारा बारा  तास काम करण्याची त्याची तयारी असते.त्याला मेकॅनिकची आवड असुन लेथमशिन, सीएनसी मशिनमधला तांत्रिक बिघाड झाला तर सुभाष कौशल्य पणाला लावून ते मशिन दुरूस्त करतो. आज सुभाष तेथे सुपरवायझर म्हणुन काम करत असुन स्व:तच्या पायावर सक्षम ऊभा आहे.पुढे त्याला सुस्वरूप पत्नी मिळाली असुन त्याच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली आहेत. त्याला मोटरसायकल चालवताना पाहिले तर कोणी म्हणणार नाही की हा दिव्यांग आहे. विशेष म्हणजे ज्या मोटरसायकलमुळे त्याला अपंगत्व आले मोटरसायकल विकुन न टाकता गेली २५ वर्ष तीच मोटरसायकल वापरत आहे.मानवी चुक असल्याने मोटरसायकलची काय चुक? असा त्याचे मत आहे. 

यावेळी शासकीय सेवेतील लोक आठवतात.जे खरोखर अपंग आहेत त्यांचे ठीक आहे. परंतु खोटी प्रमाणपत्रे मिळवुन नोकरी मिळवलेल्यांची भरपुर उदाहरणे आहेत. थोड्या थोड्या गोष्टींचा बाऊ करुन छोटंसं अपंगत्व असलं तरी ते आपला दुबळेपणा दाखवून त्यामधून पळवाटा काढून सहानुभूती मिळवत असतात.पण सुभाष केर्लेकरकडे पाहिले तर त्याच्या जिद्दिला तोड नाही. 

अपंग असुनही मनाने खंबीर -सुभाष केर्लेकर
आपल्या शारीरिक व्यंगावर यशस्वीपणे मात करून ठामपणे स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण केलं आहे.आज सुभाषला पत्नी व दोन मुले असुन आईसह तो संसारात मग्न आहे. 

आपल्या अपंगत्वावर मात करून वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविणारे असे अनेकजण आज स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. तरीही समाजाची दिव्यांगांकडे बघण्याची दृष्टी पुर्णपणे बदललेली नाही. त्यांना सहानुभूती, देणग्या, पैसे यांची गरज नसून विश्वासाची गरज आहे तसेच त्यांच्या कलागुणांना स्वीकारण्याची गरज आहे. 

सुभाष स्वभावाने बोलघेवडा असुन त्याच्याशी कधीही  8083837474 या मोबाईल नंबरवर बोलु शकता. 

-अनिल पाटील, पेठवडगाव

9890875498


अपंग असुनही मनाने खंबीर -सुभाष केर्लेकर
दि ८/४/२०२२

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম