उपेक्षित दलित योध्दा -सिदनाक
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यापासून काही अंतरावर कळंबी नावाचे गाव आहे.या गावामध्ये शिदनाक घराण्याने मराठी स्वराजेची चार पिढया इमानेइतबारे सेवा केली आहे.
स्वराज्य रक्षणासाठी केलेला पराक्रम पाहून काळनाक उर्फ शिदनाक(पहिला) यांना सातारचे छत्रपती शाहूंनी १७३९ मध्ये कळंबी गाव इनाम दिला होता. त्यांचे वडील खंडनाक हेही शूर हाेते. ते मिरजच्या एका लढाईत धारातीर्थी पडल्यावर, त्यांचा मुलगा काळनाक उर्फ शिदनाक यास कळंबी गाव सरंजामाच्या खर्चासाठी इनाम म्हणून लावून दिला.शिदनाक यांचे मुळ गाव हे साताऱ्याजवळील कळंबी होय.ते गावचे वतनदार होते.
काळनाक उर्फ शिदनाक हे आपल्या पित्याप्रमाणे शूरवीर हाेता, मराठी स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी मोठा पराक्रम केला आहे.त्यांच्या पराक्रमाची तेव्हा सगळ्या मराठी मुलखात चर्चा होत होती. तो काळ जातपात मानन्याचा होता.काही सुवर्ण मंडळी भेदाभेद मानत असत पण खुद्द राजदरबारी सिदनाक यांना मान मिळाला असल्याने काही मंडळी दात खाऊन होती.त्यांना ते निक्षून सांगत मनगटाच्या जोरावर मी हे यश मिळवले आहे.आणि ते खरेही होते.ते मोठी फौज बाळगून होते. त्यांनी १७३९ ते १७६१ पर्यंत मराठी सत्तेच्या रक्षणासाठी जिवाचे रान केले. तलवार गाजवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले, स्वराज्य राखण्यात खंडनाक पहिला, काळनाक उर्फ शिदनाक पहिला, राजनाक पहिला, खंडनाक दुसरा, अशा सलग चार पिढ्यांनी कामगिरी बजावली.आपल्या तलवारीच्या जोरावर त्यांनी छत्रपतींचे मन जिंकले होते.राजदरबारी त्यांना विशेष मान होता. आौरंगजेबाने छ. संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर फलटन जमवून मुघलांविरुद्ध काही काळ संघर्ष केला होता.
भारतातील गाजलेले युद्ध म्हणुन पानिपत युद्धाकडे पाहिले जाते. १७६१ मधील पानिपत येथे झालेल्या घनघाेर युद्धात शिदनाक-पहिला, यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला.यावेळी झालेल्या घनघाेर लढाईत लढताना त्याना वीरमरण आले.त्यावेळी युध्दाचा धामधुमीचा काळ असलेने त्यांचे अंत्यसंस्कार युध्दभुमीजवळच केले गेले. . पण, त्यांचे वस्त्रे,चिलखत व शस्त्रे सैनिकांनी कळंबी गावी परत आणली. आजही त्याचे अवशेष कळंबीतील शिदनाकाच्या वंशजांच्या देवघरात आहेत.
पहिल्या सिदनाक यांच्या मुत्युनंतर त्यांचे पुत्र राजनाक यांना मराठा दरबाराने लागलीच रूजु करून घेतले व कळंबी गावची इनामदारी बहाल केली. सिदनाक-इनामदार यांचे देवघर
हे पहिले सिदनाक सुध्दा पित्याप्रमाणे शुर होते.त्यांनी आपल्या दलित समाजातील तरूणाना सैन्यात सामावुन घेऊन, त्यांना लढाईचे प्रशिक्षण देऊन लढाऊ फलटण तयार केली.या फलटणीचा दबदबा पण तसा होता. या राजनाक-इनामदार यांनी सांगली संस्थानचे पटवर्धन यांच्या बरोबर कर्नाटक हैदर व टिपु सुलतान यांच्या बरोबर झालेल्या लढाईत मोठे शौर्य गाजवले. यामुळे सांगली दरबारात त्यांना मानाचे स्थान होते.
इतिहासात गाजलेल्या सुप्रसिद्ध खर्ड्याच्या लढाईतही राजनाकने पराक्रम गाजवला. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली११ मार्च १७९५ ला खरडयाची लढाई झाली होती. ही लढाई निजाम अली खान असफजाह दुसरा आणि पेशवे सवाई माधवराव यांच्या फौजांमध्ये झाली होती.परशुराम भाऊ पटवर्धन,राजनाक इनामदार, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर, रघुजी भोसले या मराठा योद्धांनी अर्धवर्तुळाकार रचना करून निजामाच्या सैन्यास जेरीस आणले. या लढाईत मराठ्यांनी निजामांच्या फौजांचा धुव्वा उडवला होता.
राजनाक यांचा मुलगा खंडनाक हेसुद्धा मोठे योद्धे होते.सांगलीचे चिंतामणराव पटवर्धन यांच्याबराेबरीने त्यांनी काही युद्धात सहभाग घेतला.कळंबी येथील या सिदनाक घराण्याने रणभूमीवर शौर्य गाजवले आहे. पण या घराण्याची इतिहासाने म्हणावी तशी नोंद घेतलेली नाही. पहिला शिदनाक यांचा पानिपतच्या लढाईतील पराक्रम, तर अंधारात होता, एवढा झुंजार योद्धा पण अप्रकाशित राहिला होता. मिरजेचे इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी अथक प्रयत्न करून, तत्कालिन मोडी लिपीतील कागदपत्रे यांचा अभ्यास करून तो इतिहास समोर आणला आहे.याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.
- अनिल पाटील पेठवडगाव
9890875498