६ मे १९२२: ह्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांना मुंबईत सकाळी ६ वाजता देवाज्ञा झाली.महाराजांचे ब्लड प्रेशरने रक्ताच्या उलट्या होऊन मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये रात्री देहावसान झाले होते. https://parg.co/bDJw
मुंबई गोरेगाव येथील खेतवाडी मधील गल्ली क्रमांक १३ 'पन्हाळा लॉज' बंगल्यात पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी महाराजांच बंधू श्री बापूसाहेब महाराज -कागलकर व मेहुणे खानविलकर सोबत होते. त्यांनी कारभाऱ्यांमार्फत देहावसनाची बातमी मुंबईतील लोकांना व कोल्हापुराला व इतर संस्थनिकांना तारेने कळवली. तारेमध्ये पार्थिव कोल्हापुरात दहन विधीस मोटारीने आणत आहोत असे कळविले होते.पार्थिव सकाळी मुंबईहून निघणार होते. पण महाराजांच्या निधनाची बातमी त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून पसरली होती. तेव्हा मुंबई ते कोल्हापूर रस्त्यावरील गावोगावचे लोक महाराजांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी वाटेवर हारतुरे घेऊन ताटकळत उभे होते. त्यांनी ठिकठिकाणी मोटारी अडवून अंत्यदर्शन घेतले व पुष्पहार घातले. वाटेत साताऱ्यास छत्रपती सरकारनी सत्कार करून दर्शन घेतले. नंतर संध्याकाळी सूर्यास्तावेळी पार्थिव कावळा नाक्यास कोल्हापुरात आले. तेव्हा लोकांचा एकच हल्लकल्लोळ उडाला. कावळा नाक्याहून पार्थिव मोटारीने नवीन राजवाड्याकडे नेण्यात आले. प्रेत मोटारीतून आगाशीत उतरवून दरबार हॉलमध्ये स्वतंत्र सिंहासनावर स्थानापन्न करण्यात आले. तेव्हा लोकांची अंत्यदर्शनासाठी एकच झुंबड उसळली होती. नंतर हजारो लोकांच्या उपस्थितित अभुतपूर्व अंत्ययात्रा काढण्यात आली. व पंचगंगे काठी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मुंबईचा गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी काश्मिरला गेलेला होता. ही बातमी तारेने लगेच त्याला कळविण्यात आली. ती तार आजही ब्रिटिश लायब्ररीत जपून ठेवलेली आहे.दरबारी रितीनुसार छत्रपतींच्या कुटुंबाला इंग्रज सरकारकडून शोकसंदेश पाठवण्यात आला. त्याची त्या वेळचा कोल्हापूरचा इंग्रज रेसिडेंट कर्नल मिअरवेदर ह्याला राजाराम छत्रपतींनी पोच दिली. छत्रपतींच्या कुटुंबाला पाठविलेल्या शोकसंदेशाची पोच कोल्हापूरचे दिवाण सर आर व्ही सबनीस ह्यांच्याकडून इंग्रज सरकारला (कर्नल मिअरवेदरला) पाठवण्यात आली. हे दोन्ही कागदही लायब्ररीत जपून ठेवलेले आहेत.
राजाराम छत्रपती आणि दिवाणसाहेबांची स्वाक्षरी त्यांच्या त्यांच्या लेटरहेड्सवर पहायला मिळणं हे दुर्मिळ. सोबत सर्व ह्या सर्वांचे फोटो देत आहे.