ठाण्याचा मानबिंदू - धर्मवीर आनंद दिघे

 ठाण्याचा मानबिंदू - धर्मवीर आनंद दिघे

कडवड शिवसैनिक कसा असावा याचे उदाहरण म्हणजे आनंद चिंतामणी दिघे हे होय.शिनसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक तरूणांना आपलेसे केले त्यापैकी एक तरूण होता आनंद दिघे.त्यावेळी शिवसेना नुकतीच मुंबई बाहेर पडुन मराठी माणसाला आपलेसे करत होती.पक्षाचा प्रचार नि प्रसार करण्यासाठी बाळासाहेब सभा घेत असत. आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे.

ठाण्याचा मानबिंदू - धर्मवीर आनंद दिघे

आनंद दिघें यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी  एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. ठाणे येथील टेंभी नाका परिसरात त्यांचे घर होते.दिंघेंच्या लाघवी व मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात प्रसिद्ध होते.७० च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरू केलं. यावेळी शिवसेना ऊभारी घेत होती.मराठी माणूस शिवसेनेमागे होता. दिघेंच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही,आपले जिवन त्यांनी समाजकार्य व शिवसेनेसाठी अर्पण केले होते.त्यांची ही धडाडी पाहुन बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख पदाची माळ गळ्यात घातली.व त्यांनी ती समर्थ पणे पेललीसुध्दा.त्यांनी टेंभीनाका येथे आनंद आश्रमाची स्थापना करून तेथेच शिवसेनेचे कार्यालय चालू केले.कार्यालय हेच घर करून ते तेथेच राहत असल्याने दिघे सामान्य माणसासाठी.कोणत्याही कामासाठी ते केव्हाही उपलब्ध असत.लोकही विश्वासाने, हक्काने त्यांचा दरवाजा ठोठावत.त्यांच्या घरी आई, भाऊ असा परिवार असला तरी ते घरी क्वचितच जात असत. 

त्यांच्या कार्यालय म्हणजेच आनंद आश्रमात जनता दरबार दररोज सकाळी भरत असे.या दरबारात ते लोकांचे तंटे-बखेडे, सोडवत असत.कोणावर अन्याय झाला असला तर  त्यांच्या दरबारात हमखास न्याय मिळत असे.त्यांचा दरारा व धाक पण तसा होता. पोलीस व प्रशासन ,समाजकंटक सुध्दा त्यांना वचकुन असत. यामुळे कोर्ट कचेरया पेक्षा लोंकांचा या दरबारावर श्रध्दा होती. 

दिघेयांची देश व देवभक्ती

"देवा-धर्माच्या बाबतीत आनंद दिघे अतिशय कडक होते.धर्म आणि राष्ट्र यावर त्यांची प्रखर भक्ती होती.ठाण्यामध्ये त्यांनी टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव सुरू केला. सर्वांत पहिली दहीहंडी सुरू केली.गणपती उत्सव, शिवजयंती या सगळ्या धार्मिक कार्यातून त्यांची 'धर्मवीर

' अशी ख्याती पसरली. याच काळात ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. राजकारणात दिंघेचा शब्द प्रमाण होता.ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या.शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी स्वयंरोजगारासाठी अनेकांना स्टॉल उभारून दिले. त्यामुळे ते लोकांच्या हृदयावर राज्य करू लागले.आनंद दिघेनी कोणतीही निवडणूक लढवली नाही वा कोणते पदही घेतले नाही.१९९५ साली शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता होती.बाळासाहेब ठाकरेनी एकदा दिघेना मातोश्री वर बोलावून घेतले व विचारले, "आनंद तुला कोणते मंत्रिपद पाहिजे ते माग ते मी तुला देतो." यावर दिघेनी बाळासाहेबाना नम्रपणे नकार देत सांगितले की, "ठाणे जिल्हाप्रमुख हे पद मला मंत्रीपदापेक्षाही मोठे आहे."

गणोशोत्सवाची धामधूम चालू होती २४ ऑगस्ट २००१ रोजीचा तो दिवस होता. भल्यासकाळी  दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला.क्षणातच शिवसैनिक जमले. ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दिघेना दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. २६ तारखेला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं. पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली.यावेळी  भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे त्यांच्या भेटीला हॉस्पिटल मध्ये आले.शिवसेनेचे नारायण राणे, मनोहर जोशी यांच्यासह नेतेमंडळी येत होती.सुरक्षेच्या कारणास्तव बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल मध्ये येऊ शकत नव्हते पण प्रत्येक अपडेट त्यांच्यापर्यन्त पोहाचवले जात होते. 

डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करत होते पण संध्याकाळी त्यांना हार्ट अटॅक आला व त्यांचा मृत्यू झाला.हॉस्पिटल बाहेर शिवसैनिकांचा जमाव काळजीत होता.आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हतं. शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की, "आनंद दिघे आपल्यातून गेले."

जमाव प्रक्षुब्ध झाला दिंघेंच्या वर हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार झाला नाही असा जमावाचा समज झाला.उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिलबाहेरील दिघेंच्या चाहत्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं.जमावाला काबुत ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला काही क्षणातच ठाणे उत्सुर्फपणे बंद झाले.

हॉस्पिटल जाळणे ही गैरसमजातुन झालेली घटना होती कारण आनंद दिघे गेले हे दु:ख जनता पचवु शकत नव्हती एवढे प्रेम जनता त्यांच्या वर करत होती.आजही ठाण्यात दिघेच्यांवर जनता तेवढीच प्रेम करते. असा लोकनेता परत होणे नाही. 

-अनिल पाटील, पेठवडगाव

9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম