पुण्यामध्ये अजुनही आहेत नथुराम गोडसेच्या अस्थी

पुण्यामध्ये अजुनही आहेत नथुराम गोडसेच्या अस्थी 

फेसबुक लिंक http://bit.ly/3wjCTUS
महात्मा गांधी यांची हत्या ३० जानेवारी १९४८ मध्ये नथुराम गोडसेनी केली,त्या खटल्यात गोडसेना फाशिची शिक्षाही झाली.हे सर्वानाच माहिती आहे.पण गोडसेंच्या रक्षा अजुनही विसर्जित केलेली नाही.
पुण्यामध्ये अजुनही आहेत नथुराम गोडसेच्या अस्थी
हिंदू धर्मात व्यक्तिचे मुत्युनंतर दहन केले जाते.दहनानंतर त्या व्यक्तिची रक्षा पाण्यामध्ये विसर्जित करण्याची प्रथा आहे.तसे पाहता नथुराम गोडसे हे एक थोर व्यक्तिमत्व होते.त्यांचे आपल्या देशावर खूप प्रेम होते. देशासाठी काहीही करायला ते कधीही मागे पुढे बघत नसत.पण सुरूवातीला म. गांधीना समर्थन देणारे गोडसे नंतर मात्र गांधीशी वैचारिक मतभेदांमुळे फटकुन राहु लागले.

 कॉंग्रेस ते संघ

नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे आणि आई  लक्ष्मी गृहिणी होती.जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले.तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले.नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.त्यांची रुची देशाच्या हित कार्यात लागण्यात समर्थ ठरेल असे त्यांना वाटून ते देशासाठी आणि फुटीर मुस्लिमांच्या विरोधी उभे राहिले.भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच सोडले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक पुस्तकांत मन रमवले.नथुराम गोडसे अखिल भारतीय कॉंग्रेस या पक्षामध्ये होते, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शेवटी सन १९३०मध्ये ते अखिल भारतीय हिंदू महासभेत गेले. ते "अग्रणी " आणि "हिंदू राष्ट्र " या वर्तमानपत्रांचे संपादक होते. ते आपल्या वर्तमानपत्रांतून मोहंमद अली जिना यांच्या फुटीरतेच्या विचारांचा प्रखर विरोध करीत. सुरुवातीला यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधीची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचे तथाकथित मुस्लीम तुष्टीकरण यांमुळे ते गांधीविरोधी झाले.

५५ कोटी रुपये आणि पाकिस्तान

फाळणीचा वेळेस झालेल्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला ७५ कोटी रुपये द्यायचे होते. त्यातले २० कोटी रुपये दिले गेले होते, आणि त्याच वेळेस पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी उरलेले ५५ कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. गांधींच्या या निर्णयामुळे कष्टी होऊन आणि चिडून नथुराम गोडसे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गांधीची हत्या केली.एखाद्या व्यक्तीला आपले विचार, आपले सिद्धांत पटत नसतील तर त्याची थेट हत्या करण्याच्या कृतीचं समर्थन कोणत्याही स्थितीत होऊ शकत नाही.


नथुराम गोडसेंवर मोहनदास गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात चालविण्यात आला.यावेळी गोडसेनी कोर्टात सांगितले की,", मी गांधीजींचा खूप आदर करतो मात्र त्यांनी अखंड भारताचे दोन तुकडे केले म्हणून त्यांना मी गोळ्या घातल्या."
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाब मधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यांचे अंतिम शब्द असे होते,
"जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो".


फाशीच्या आधी गोडसेच्या एका हातात भगवत गीता आणि अखंड भारताचा नकाशा होता तर दुसऱ्या हातात भगवा झेंडा होता. असे देखील सांगितले जाते की फाशीच्या आधी गोडसेने नमस्ते सदा वत्सलेचे उच्चारण केले होते आणि जोर जोरात घोषणा देखील दिल्या होत्या.फाशी नंतर त्यांचा मृतदेह सरकारने कुटुंबियांना न देता त्याचे अंतिम संस्कार केले होते. त्यानंतर त्यांच्या अस्थी एका डब्यात भरून कुटुंबियांना देण्यात आल्या होत्या.गोडसेची एक अंतिम इच्छा होती त्यामुळे त्याच्या अस्थीचे विसर्जन अद्याप केले गेलेले नाही. कुटुंबीयांनी त्याच्या अस्थी तशाच चांदीच्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. गोडसे याने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते की, माझ्या अस्थींचे विसर्जन तो पर्यंत करू नका जो पर्यंत अखंड भारत होत नाही व सिंधू नदी स्वतंत्र भारतात सामील होत नाही.तोपर्यंत माझ्या अस्थींचे विसर्जन करू नका.असे सांगितले होते. यामुळेच गोडसे कुटुंबीयांनी नथुराम यांच्या अस्थी अजून जपून ठेवलेल्या आहेत आणि ते आपले स्वप्न पूर्ण होण्याची वाट देखील पाहत आहेत.नथूराम गोडसे यांच्या अस्थी अजूनही पुण्यातील शिवाजीनगर जवळील एका इमारतीमध्ये एका कळसामध्ये सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तसेच अस्थी-कलश त्यासोबत त्यांचे काही कपडे आणि हाताने काढलेल्या काही नोट्स अजूनही त्या इमारतीत सुरक्षित स्थानी ठेवलेल्या आहेत.
 👇🏻 व्हिडिओ👇🏻  : नथुराम गोडसे यांच्या अस्थी व कुंटुबिय

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম