नाशिकचे काळाराम मंदिर
-
फेसबुक लिंक http://bit.ly/3hy0E7r
रामायण काळातील काही घटना नाशिक परिसरात घडल्या आहेत,याचे काही अवशेष सुध्दा सापडत असतात.याच नाशिक मध्ये श्रीरामाची अनेक मंदिरे आहेत.पैकी पंचवटी परिसरात काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर गोपिकबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले.मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.,संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोरच्या मंदिरातील श्रीरामाच्या चरणी पाहतो, असा भाव आहे. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे.मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे.श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.येथे नियमीत पु़जाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे.मंदिरासमोर भव्य सभामंडपात प्रवचने व किर्तने होत असतात. मंदिरातील राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मुर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी जाता येते.परिसरात अनेक मंदिरे पाहावयास मिळतात.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
Tags
धार्मिक