२७ नक्षत्र,त्याच्या वनस्पती,नवग्रह यांची व बारा राशी व वनस्पती याची माहिती
⚡भरणी: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष 'आवळा' होय. च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण इ. ख्यातनाम औषधांमध्ये आवळ्याचा उपयोग केला जातो. पोटाचे, छातीचे रोग बरे करण्यासाठी आवळ्याचा उपयोग केला जातो. यामध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर असल्यामुळे सदीर्, पडसे यावर चांगला उपयोग होतो. ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी असेल त्यांनी या वृक्षाची आराधना करावी. दिशा पूर्व.
⚡कृत्तिका: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष उंबर. शीतलता हा उंबराचा प्रधान गुण आहे. गोवर, कांजण्या, देवी हे रोग झाल्यावर शरीरात जी उष्णता उत्पन्न होते. त्यावर 'औदुंबरफळ' हे रामबाण औषध आहे. दिशा-पूर्व. ज्याचे जन्मनक्षत्र कृत्तिका असेल त्यांनी 'औदुंबरा'ची उपासना करावी.
⚡रोहिणी: या नक्षत्राचे आराध्य वृक्ष जांभूळ. या नक्षत्राच्या प्रभावाखालील येणाऱ्या व्यक्तीला घसा, दमा, संधिवाताचा त्रास होतो. लहान मुलांचे पोटाचे विकास जांभळाच्या भक्षणाने दूर होतात. मधुमेह व स्त्रीरोगावर जांभूळ व त्यातले बी खाणे हितावह ठरते. नाग, विंचू दंशावर जांभळीच्या पानाचा रस उपयोगी पडतो.
⚡मृग: या नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहे खैर. खैरापासून स्वल्पसदीर वाटिका, खपिराष्टक इत्यादी आयुवेर्दिक औषधे बनविली जातात. दात, दाढदुखी व चर्मरोगावर ही औषधे उपयोगी पडतात. ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी खैर वृक्षाची आराधना करावी. दिशा-ईशान्य.
⚡आर्दा: या नक्षत्राचा आतध्य वृक्ष आहे कृष्णागरु. हा अत्यंत सुगंधी वृक्ष आहे. यापासून मिळणाऱ्या धूपापासून सुगंधित अगरबत्ती आणि उटणे तयार केली जातात. कृष्णामरु सुगंधी, उष्ण, कडू, तिखट, स्निग्ध, मंगलकारक असा आहे. अतिशीतलतेपासून निर्माण होणाऱ्या रोगांवर कृष्णागरूचा चांगला उपयोग होतो. या नक्षत्राच्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींना गळा, खोकला, धनुर्वात, कर्णविकार इ. विकार संभवतात. उपरोक्त नक्षत्राच्या प्रभावाखाली जन्मलेल्या व्यक्तींनी कृष्णागुरू वृक्षाची आराधना करावी. दिशा - ईशान्य.
⚡पुनर्वसू: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेळू अथवा बांबू. बांबूच्या आतील भागात भागात आढळणाऱ्या पदार्थास 'वंशलोचन' म्हणतात. हे अत्यंत लोकप्रिय औषध बऱ्याच देशांत प्रसिद्ध आहे. सांधेदुखीवर बांबूचा पाला वाफावून बांधण्याचा प्रघात आहे. या नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्ती इतरांना मदत करणाऱ्या असतात त्यांनी बांबू या वृक्षाची आराधना करावी. दिशा - उत्तर.
⚡पुष्य: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष पिंपळ आहे. हे नक्षत्र अत्यंत शुभ्र मानले जाते. गुरुपुष्य या अमृतसिद्ध रोगावर सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे. पिंपळाची कोवळी पाने, साल औषधात वापरतात. या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती धिरोदत्त, गंभीर व अध्यात्मक वृत्तीची असतात व त्यांनी पिंपळाची आराधना करावी. दिशा - उत्तर.
🔹अश्लेषा, विशाखा, अनुराधा अश्लेषा, विशाखा आणि अनुराधा या नक्षत्रांचा आराध्य वृक्ष 'नागचाफा' आहे.🔹
कोकणात देवळाच्या आसपास नागचाफ्याची दोन किंवा तीन झाडे लावण्याचा प्रघात आहे. अत्यंत सुंदर म्हणून या वृक्षाची गणना होते. या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींनी नागचाफा या वृक्षाची आराधना करावी. दिशा - उत्तर.
⚡मघा: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष 'वटवृक्ष' म्हणजे वड आहे. वड हा विस्तार, सुदीर्घायुष्य, सार्मथ्य आणि मांगल्य यांचे प्रतिक आहे. वडाचे सर्व भाग औषधात वापरतात. विशेषत: वडाचा चीक सांधेदुखी, दाढदुखी, हातापायांच्या भेगांसाठी वापरतात. वडाची फळे मधुमेहावर उपयुक्त अशी आहेत. ज्यांचे जन्मनक्षत्र मघा आहे त्यांनी वडाची आराधना करावा. दिशा - वायव्य.
⚡पूर्वा: या नक्षत्राचा आराध्यक्ष वृक्ष 'पळस' आहे. पळसामध्ये अनेक औषधी गुणवधर्म आहेत. गळवे, फोड यावर पळस रामबाण औषध आहे. या जन्मनक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी पळस या वृक्षाची आराधना करावी. दिशा - वायव्य.
⚡उत्तरा: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष 'पायर वृक्ष' होय. भाजलेला व्रण पायरीच्या सालीच्या काड्याने धुतल्यास व्रण शुद्ध होतो व लवकर भरतो. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी 'पायर वृक्षा'ची आराधना करावी. दिशा - वायव्य.
⚡हस्त: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष जाई सारखा कोमल वेल आहे. जाईच्या पानांचा उपयोग तांेडातील फोड, हिरड्या यांवर चांगल्या प्रकारे होते. जुनाट, लवकर भरून न निघणाऱ्या व्रणात जाईपासून निघणारे जात्यादी तेल वापरतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी 'जाई'ची आराधना करावी. दिशा - वायव्य.
⚡चित्रा: भगवान शंकराला प्रिय असलेला बेल वृक्ष चित्रा नक्षत्राचा आराध्यक्ष वृक्ष आहे. बेल मधुर, तुरट, उष्ण, रुचकर, रुक्ष, कडू आणि पाचक आहे. बेल फळाचा उपयोग पोटाच्या विकारावर उत्तम प्रकारे होतो. बेल फळांचे मुरंबे फारच रुचकर लागतात. याची पाने मधुमेहावर प्रतिबंधक म्हणून उपयोगी ठरतात. ज्यांचा जन्म या नक्षत्रावर झाला असेल त्यांनी 'बेल वृक्षाची आराधना करावी.' दिशा - पश्चिम.
⚡स्वाती: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष 'अर्जुनसारडा' आहे. याचे उपयोग आयुवेर्दिय औषधाबरोबरच इतर वैद्यकीय शास्त्रातही याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. किरकोळ जखमा, व्रण भाजणे यावर अर्जुनसारडाच्या सालीचा उपयोग आदिवासी सर्रास करतात. अर्जुनसारिष्ट नावाचे औषध बरेच लोकप्रिय आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांनी 'अर्जुनसारडा' या आराध्यक्ष वृक्षाची उपासना करावी. दिशा - पश्चिम.
⚡ज्येष्ठा: या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे 'सावर'. भरपूर काटे असलेला हिवाळ्यात पर्णहिन असलेला हा वृक्ष दुर्लक्षिला जातो. यापासून अनेक औषधी वनस्पती मिळतात. यापासून मिळणाऱ्या डिंकास मोचरस असे म्हणतात व आतड्यांच्या काही रोगावर याचा चांगला उपयोग होतो. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी 'सावर' वृक्षाची आराधना करावी. दिशा - नैऋत्य
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
कोणत्या राशीसाठी कोणते झाड आहे फायदेशीर
आपण आपल्या घर- अंगणात उचित स्थानावर आपल्या राशीप्रमाणे झाड लावले तर याचा भरपूर फायदा मिळेल. हे झाड आपल्या जीवनातील समस्या दूर करू शकतात.
🦙मेष: या राशीचं स्वामी मंगळ आहे आणि या राशीसाठी आंब्याचं झाडं लाभदायक सिद्ध होऊ शकतं. याव्यतिरिक्त आवळ्याचं झाड जीवनात सुख आणू शकतं. आंबा पित्त रोग नाशक आहे. या झाडाने व्यक्तीच्या प्रतिष्ठेत वृद्धी होणार.
🐂वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या राशीच्या जातकाला गूलर, अशोक आणि जांभळाचं झाड लावायला हवं. हे झाड या राशीच्या जातकासाठी फायदेशीर सिद्ध होईल. याने पूर्व जन्मांच्या दोषांचाही नाश होतो.
👫मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे आणि या राशीच्या जातकांना बांबू किंवा वडाचे झाड लावायला हवे. हे त्रिदोष अर्थात तिन्ही दोष दूर करतं. याने शत्रूचा विनाश होतो.
🪳कर्क: या राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे जातकाला आवळ्याचं किंवा पिंपळाचं झाड लावणे फायदेशीर आहे. याने कफजनक रोगांचा नाश होतो आणि चंद्र मानसिक शांती देतं
🦁सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीसाठी जांभूळ किंवा वडाचे झाड लावणे फायदेशीर आहे. याने पित्त संबंधी रोगांचे नाश होते आणि व्यक्तीची बौद्धिक प्रगती होते.
👩⚖️कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या जातकांना अमरूद किंवा बेलाचे झाड लावायला हवे. याने वात संबंधी रोगांचा नाश होतो. याने शत्रूची भीती राहत नाही.
⚡तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. म्हणून जातकाला मौलसिरी, अर्जुन किंवा चिकूचे झाड लावायला हवे. याने वातासंबंधी रोगाचं नाश होतं. याव्यतिरिक्त पूर्व जन्माच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
🦀 वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या जातकाने सेनेगलिया कैटेचू किंवा कडुनिंबाचे झाड लावणे फायदेशीर सिद्ध होईल. याने वात रोगांचा नाश होईल यासह व्यक्तीच्या प्रतिष्ठेत वृद्धी होईल.
धनू: या राशीचा स्वामी बृहस्पति आहे. या राशीच्या जातकांना कदंब किंवा शिलारसाचे झाड लावायला हवं. याने पित्तासंबंधी रोगांचे नाश होऊन ज्ञानामध्ये वृद्धी होते.
🦎 मकर: या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. या राशीच्या जातकांनी फणस लावणे फायदेशीर आहे. याने त्रिदोष अर्थात तिन्ही प्रकाराचे दोष दूर होतात. याने धन, सुखात आणि वैभवात वृद्धी होते.
🥌 कुं*: या राशीचा स्वामी शनी आहे म्हणून या जातकांनी आपल्या घरात शमी किंवा आंब्याचे झाड लावायला हवे. याने कफ रोग दूर होतो आणि धन, सुख आणि वैभवात वृद्धी होते.
🐟 मीन: या राशीचा स्वामी बृहस्पति आहे म्हणून जातकांनी कडुलिंबाचे झाड लावायला हवे. याने कफसंबंधी रोगांचा नाश होतो यासह गुरू ज्ञानामध्ये वृद्धी होते