रतन खत्रीच्या मटक्याबददल

जेवु न देणारा ओपन व झोपु न देणारा क्लोज


 रतन खत्रीच्या मटक्याबददल 


 फेसबुक लिंक http://bit.ly/3tIpVhA
मटका' हा एकेकाळी मुंबईच्या औद्योगिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. गरीबीत जिंदगी गुजारणार्‍या मजुरांच्या, कामगारांच्या दुखऱ्या मनावर लागाणारा बाम होता असे म्हटले तरी हरकत नाही. 'मटका' खेळणारा 'खिलाडी' कधीच श्रीमंत झाला नाही. श्रीमंत झाले ते 'खेळीये' म्हणजे खेळवणारे! पण उद्याचा दिवस काहीतरी घेऊन येईल अशी आशा देणारा 'मटका' हा गरीबांचा स्वस्तातला खेळ होता. त्यांच्या ठसठसत्या जखमांवर फुंकर घालणारी ती वार्‍याची झुळूक होती. आज वाचू या रतन खत्री आणि त्याच्या मटक्याबद्दल!
रतन खत्रीच्या मटक्याबददल

रतन खत्रीच्या मटक्याबददल

मटक्याच्या जन्माचे मूळ मात्र अमेरिकेतून इकडे आले आहे. सुरुवात झाली ती 'न्यूयॉर्क कॉटन'च्या सट्ट्यापासून. अमेरिकेत गुलामगिरीच्या प्रश्नावरून यादवी सुरु झाली तेव्हा जागतिक बाजारात कापसाचा तुटवडा पडायला लागला. मग भारतासारख्या अनेक देशांतून कापूस मँचेस्टरला जायला लागला. भाव रोज वरखाली व्हायला लागले आणि न्यूयॉर्क कॉटन मार्केटच्या बंद भावावर (क्लोजींग प्राइस) सट्टा खेळला जाऊ लागला. रतन खत्रीसुद्धा या न्यूयॉर्क कॉटन सट्ट्यातला एक खेळिया म्हणजे बेटींग घेणारा! मुंबईतल्या धनजी स्ट्रीटवर त्याचा छोटासा व्यवसाय होता. येणारे जाणारे छोटेमोठे व्यापारी त्याच्याकडे सट्टा खेळायचे. धंदा हळूहळू मोठा झाला. पण काही काळातच न्यूयॉर्क कॉटनची 'रमत' संपुष्टात आली. रोजच्या बेटिंगची सवय लागलेले व्यापारी नव्या खेळाची मागणी करायला लागले.
आणि त्यातून जन्म झाला मटक्याचा! शून्य ते नऊ या आकड्यांवर खेळला जाणारा नवा जुगार! पण आकडा काढायचा कसा? तर पत्त्याच्या कॅटमधून तीन पत्ते काढायचे आणि जिंकणारा आकडा जाहीर करायचा. एक रुपया लावला असेल तर जिंकल्यावर ९ रुपये! सकाळ संध्याकाळ दोनदा चान्स! ओपन आणि क्लोज! थोड्याच दिवसांत हा खेळ न्यूयॉर्क कॉटनपेक्षाही जास्त पसरायला लागला. हा नवा खेळ असल्याने त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अणि तो लोकप्रिय करण्यासाठी रतन खत्रीने चक्क एक ब्रांडिंग कँपेन केली. पत्त्याच्या कॅटमधून चित्रे काढून उरलेले पत्ते पिसून एका मटक्यात टाकले जायचे. त्यातले पहिले दोन पत्ते जनता (थर्ड पार्टी) काढायची आणि खत्री तिसरा पत्ता काढायचा. असा झाला 'मटका' या नावाचा आणि खेळाचा जन्म.हा खेळ साठीच्या दशकात आला आणि १९८०/८५ पर्यंत अखंडित चालतच राहिला. या खेळात भाग घेण्यासाठी लागणारे पैसे म्हणजे 'एन्ट्री' इतकी कमी असायची की कोणीही खेळून आपल्या नशिबाची परीक्षा घेऊ शकायचा. हळूहळू बेटिंग करणार्‍यांची संख्या वाढत गेली. दिवसातून दोनदा आकडा लावायला खेळाडूंची गर्दी व्हायला लागली आणि त्यासोबत 'बुकी' हा प्रकार जन्माला आला.
बुकी म्हणजे रतन खत्रीने काढलेल्या आकड्यावर बेटींग घेणारे स्थानिक खेळिये! 
काही वर्षांतच भारतात तब्बल १२,००० बुकी मटक्याचे बेटिंग घ्यायला लागले. धंद्याची उलाढाल दिवसाला ३५० कोटींपर्यंत पोहचली. तळागाळातल्या प्रत्येक माणसाला ही आयुष्य बदलून टाकण्याची संधी वाटायला लागली. खेळणार्‍याच्या हातात एका रंगीत चिटोर्‍याखेरीज काहीच नसायचं. पण आकडा लागला तर केवळ त्याच्या जोरावर पैसे ताबडतोब हातात यायचे. पोलीस स्टेशनला मटक्याचा अड्डा म्हणजे खात्रीशीर उत्पन्न झाले. त्यामुळे त्यांनीही मटक्याच्या अड्ड्यांकडे दुर्लक्ष केले. 'रेड' टाकायचे दिवस बुकीला सांगून ठरवले जायचे. एखादं बाकडं, दोन खुर्च्या मोडल्या जायच्या, कागदं फाडली जायची, दोन माणसं जमा केली जायची, त्यांचा 'टेबल जामीन' केला जायचा आणि तिसर्‍या दिवशी धंदा पुन्हा चालू व्हायचा.
आपला धंदा भोईवाड्याच्या अंडर यायचा. पलीकडच्या भागला एलफिस्टन म्हणायचं. तिकडे तोडणकर कंपनीचा धंदा होता. आपलं आणि त्यांचं बरं होतं. आपले खिलाडी आपल्याकडे त्यांचे रमय्ये त्यांच्याकडे. सकाळी सहाच्या आधीच धंदा चालू व्हायचा. गाळा लिहिणारे उशीरा यायचे. पण रायटर पावणेसहाला येऊन बाकड्यावर बसायचा. परेल वर्कशॉपची पब्लिक पहिल्या शिफ्टला जाताना आकडा लावून जायची. धंदा फुल्ल होता. टाटा कंपाउंडची दहा-बारा पोरं सकाळीच यायची. पलीकडच्या चाळीतल्या काही पोरांचा आपल्या धंद्यावर डोळा होता. त्यांचा गॉडफादर त्या वेळाचा कार्पोरेटर. अधूनमधून नडी व्हायची. सिनीअर आपला असल्यामुळे प्रकरण संपायचं. अधून मधून दादरच्या पीसीला कळ लागली की तोडणकरांचा धंदा काही दिवस बंद व्हायचा. मग तिकडची जनता आपल्याकडे. कधी भोईवाडा टाईट असला तर आपली पब्लिक तिकडे. दोन्ही बंद असले तर मात्र कोपर्‍यावर पोरं उभी करून खडेखडे बेटिंग घ्यायला लागायचं."
१९७५ साली आणीबाणी (इमर्जन्सी) आली आणि मटक्याचे धंदे बंद पडले. रतन खत्री दोन वर्षं जेलमध्ये गेला. १९७७ साली इमर्जन्सी उठली. गरीबी आणि गरीब आहे तिथेच होते आणि धंदा पुन्हा सुरु झाला.

यानंतर मटक्याची सूत्रे पोलिस स्टेशनसोबत नव्याने आलेल्या 'भाई' लोकांच्या हातात गेली. आता बुकीला दोन हप्ते द्यावे लागायचे. एक हप्ता पोलिसांना आणि दुसरा भाई लोकांना!आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,पण हे सगळे घडण्यापूर्वी रतन खत्रीला पहिला धक्का दिला त्याच्या मॅनेजरने, म्हणजे कल्याण भगतने ! 
कल्याण भगत हा मूळचा गुजरातच्या कच्छ प्रांतातला. त्याचे आडनाव गाला. पण त्याचे पूर्वज "भक्त" होते म्हणू त्याचे आडनाव झाले भगत!
About Ratan Khatri's Matka
आता धंद्यात फाटे फुटायला सुरुवात झाली. रतनचा वरळीमेन आणि कल्याणजीचा 'कल्याण'. रतन आठवड्यातून फक्त पाच दिवस, तर कल्याण सात दिवस काम करायला लागले. गिर्‍हाईकं वाटली गेली, बुकी दोघांचेही बुकींग घ्यायला लागले. कल्याणच्या पाठोपाठ चंदू, चिनू, बाबला, शांती, आबनानी असे नवे मटकेवाले आले. एरिया वाटून घेण्यासाठी भाई लोकांची मदत घायला सुरुवात झाली. याच दरम्यान 'डिके' म्हणजे दिलीप कुळकर्णी गँगने रतन खत्रीला धमकी देऊन त्याचा धंदा स्वत:कडे वळवून घेतला. मुंबईचा फोर्ट एरिया मटक्याचे हेडक्वार्टर झाले.
खत्रीने काळाची पावले ओळखली आणि धंद्यातून बाहेर पडला. त्याने फिल्म फायनान्सींगचा धंदा करून बघीतला. रंगीला रतन या सिनेमाला त्यानेच पैसे दिले असे म्हणतात. पण बॉक्स ऑफीसवर सिनेमा पडला. त्यानंतर रतन खत्री रिटायरच झाला.
नवे लोक येत राहिले. त्यापै़की प्रशांत-ठाणे बाळू-भार्गवी-खोटे यांचे धंदे सुरु झाले. कल्याण भगतचा धंदा मात्र आहे तसाच सुरु राहिला. त्याच्यांनतर त्याच्या मुलाने धंदा हातात घेतला पण त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या पैशावरून कुरबुरी सुरु झाल्या. काही दिवसांतच बायको आणि मुलाने त्याचा काटा काढला. त्याच्या हत्येसोबत आणखी सहाजणांची पण हत्या झाली. कल्याणचा धंदा संपला.

अनेक लोकांचा विरंगुळा व्यसनात बदलला. मटक्यासोबत 'सोशल क्लब' या नावाखाली पत्त्याच्या जुगाराचे अड्डे तयार झाले. सोबत दारुच्या अधिकृत आणि अनधिकृत धंद्याला चालना मिळाली. बुकींना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. राजकारणी लोकांनी या दोन नंबरच्या धंदेवाल्यांकडे 'पोलीटिकल इन्फ्लुएन्सर' या नजेरेने बघायला सुरुवात केली. काही बुकी थेट राजकारणात आले. मुंबईवर हळूहळू भाई लोकांची सत्ता स्थापित व्हायला सुरुवात झाली. जुगाराला प्रतिष्ठा मिळाल्याने क्रिकेट-इलेक्शन रिझल्ट या सगळ्यावर बेटिंग सुरु झाले. एकूणच सामाजिक नैतिक-अनैतिकतेच्या व्याख्या बदलायला सुरुवात झाली. त्यातूनच पुढे जे घडले तो इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर आहेच.
आम्हाला फक्त इतकेच सांगायचे होते की समाज स्वतःला घडवत असतो आणि येणार्‍या पिढीला त्याचा बरा वाईट हिस्सा वारसाहक्कात मिळत असतो.
अनिल पाटील
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
9890875498
कोरा लिंक http://bit.ly/3ocQydd

==========================================================

Open without food and close without sleep

 About Ratan Khatri's Matka


 
Matka was once an integral part of Mumbai's industrial culture. It does not matter if it is said that it was a balm for the miserable minds of the workers living in poverty. The 'player' who plays 'Matka' never gets rich. 'Kheliye' means those who become rich! But 'Matka' was a cheap game for the poor, hoping to bring something tomorrow. It was the wind that was blowing on their bruises. Let's read today about Ratan Khatri and his pot!
About Ratan Khatri's Matka

The origin of Matka's birth, however, has come here from America. It all started with a New York Cotton bet. When Yadavi started with the issue of slavery in America, there was a shortage of cotton in the world market. Then cotton started going to Manchester from many countries like India. Prices began to fall every day and bets were placed on the closing price of the New York Cotton Market. Even Ratan Khatri is a betting taker in this New York cotton bet! He had a small business on Dhanji Street in Mumbai. Small traders coming and going used to gamble with him. The business gradually grew. But soon New York Cotton's 'Ramat' came to an end. Traders, accustomed to daily betting, started demanding new games.
And out of that was born Matka! New gambling on numbers from zero to nine! But how to draw a figure? So three cards were drawn from the address cat and the winning number was announced. If one rupee is invested, then 9 rupees after winning! Twice morning and evening chance! Open and close! Within a few days the game began to spread beyond New York Cotton. As it is a new game, Ratan Khatri launched a branding campaign to increase its credibility and make it popular. Pictures were taken out of the leaf cat and the remaining leaves were ground and put in a pot. The first two addresses were drawn by Janata (third party) and the third by Khatri. This is how the name 'Matka' came into being and the game was born. This game came in the sixties and continued till 1980/85. The money required to participate in this game was so low that anyone could test their luck by playing. Gradually, the number of bettors increased. Twice a day, a crowd of players began to gather numbers, and with it came the type of 'bookie'. Within a few years, as many as 12,000 bookies started betting on pots in India. Business turnover reached Rs 350 crore per day. Everyone at the bottom began to feel the opportunity to change this life. There was nothing in the player's hand except a colorful picture. But if there was a figure, the money would come to him immediately only on his strength. The police station was a surefire source of income. So they too ignored the pottery bases. The day to drop the 'red' was decided by telling the bookie. A box, two chairs would be broken, papers would be torn, two men would be gathered, their 'table bail' would be given and the business would resume on the third day.
Your business used to come under Bhoiwada. The other side was called Elphiston. Todankar was the company's business there. It was good for us and for them. Your players have their fun. Business used to start before six in the morning. Slanderers used to come late. But Reuters used to come and sit on the bench. The public used to go to the first shift of the Parel workshop. The business was full. Ten to twelve kids from the Tata compound used to come in the morning. Some of the kids on the other side had their eyes on the business. His godfather was a corporator at the time. Occasionally there would be nadi. The case was over because the senior was yours. From time to time, Dadar's PC came to know that Todankar's business would be closed for a few days. Then we have the people of Tikkad. If Bhoiwada is tight then your public is there. If both were closed, I would have to bet on the corner. "
In 1975, there was an emergency and the pottery business was shut down. Ratan Khatri spent two years in jail. The Emergency was declared in 1977. Poverty and the poor were there and the business resumed.
After this, the sources of the pot went into the hands of the newly arrived 'brothers' with the police station. Now the bookie had to pay two installments. One installment to the police and another to the brothers! You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, but before all this happened, Ratan Khatri was given the first push by his manager, Kalyan Bhagat! Kalyan Bhagat is a native of Kutch, Gujarat. His last name was Gala. But to say that his ancestors were "devotees", his last name became Bhagat!

Now the business began to split. Ratan's Worlimen and Kalyanji's 'Kalyan'. Ratan started working only five days a week, while Kalyan started working seven days a week. Girhahaika felt, the bookies began to book both. Kalyan was followed by Chandu, Chinu, Babla, Shanti, Abnani. Brothers and sisters began to help to divide the area. Meanwhile, Dilip Kulkarni gang threatens Ratan Khatri to take over
The Fort Area of ​​Mumbai became the headquarters of Matka.
Khatri recognized the steps of time and got out of business. He ventured into film financing. It is said that he paid for the movie Rangila Ratan. But the movie fell at the box office. After that Ratan Khatri retired.
New people kept coming. Among them, Prashant-Thane Balu-Bhargavi-Khote started their businesses. However, Kalyan Bhagat's business continued as it is. After him, his son took over the business, but he and his wife started quarreling over money. Within days, his wife and son removed his fork. He was killed along with six others. Kalyan's business is over.
Many people's hobbies turned into addictions. Along with Matka, an address gambling den was set up under the name 'Social Club'. Along with this, the official and unofficial business of liquor got a boost. Bookies gained social prestige. Politicians began to look at these two businessmen as 'political influencers'. Some bookies got directly into politics. The rule of the Bhai people gradually began to be established in Mumbai. With the rise of gambling, cricket-election results began to be bet on. The overall definition of social morality-immorality began to change. The history that happened after that is before our eyes today.
All we want to say is that society is shaping itself and the next generation is getting a fair share of it.

Anil Patil
Mahiti seva Group Pethwadgaon
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম