८०० पेक्षा जास्त हिरे असलेली बहुमूल्य ढाल.

  ८०० पेक्षा जास्त हिरे असलेली बहुमूल्य ढाल. 


फेसबुक लिंक http://bit.ly/2RFEViK
खालील चित्रातील हि बहुमूल्य हिरेजडित ढाल जम्मू-कश्मीरचे महाराजा रणबीर सिंह ह्यांची आहे.जम्मू-कश्मीर राज्याचे पहिले 'डोग्रा' महाराजा गुलाबसिंह ह्यांचे रणबीर सिंह हे तृतीय चिरंजीव होते.राजा रणबीरसिंह हे संस्कृत आणि पर्शियन भाषेचे पंडित होते. शिवाय अफगाणी पख्तुन भागातील 'पश्तो' भाषेतही ते बोलत असत.असे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,राजा रणबीरसिंह यांनी संस्कृतच्या प्रसारासाठी रघुनाथन मंदिरात संस्कृत पाठशाळेची निर्मितीही केली होती. व्याकरण, कविता, गणित, तत्वज्ञान, भूमिती आणि वेदांचा अभ्यास इथे शिकविला जात.१८५७ च्या उठावात राजा रणबीरसिंह ह्यांनी इंग्रजांना पैसे आणि सैन्याची मदत केली होती. ह्या बदल्यात नंतर त्यांना इंग्रजांकडून बरेच फायदेही मिळाले होते. राजा रणबीरसिंह यांनी सहा लग्ने केली होती. त्यांना चार मुले आणि दोन मुली होत्या.
प्रिन्स ऑफ वेल्स आणी युनायटेड किंग्डमचा राजा 'एडवर्ड सातवा' हा १८७५-७६ साली हिंदुस्थानच्या भेटीवर आला होता.आपल्या हिंदुस्थान भेटीदरम्यान २० जानेवारी १८७६ रोजी राजा एडवर्ड हा हत्तीवर बसून जम्मू येथे जम्मू-कश्मीरचे महाराजा रणबीर सिंह यांच्या भेटीस गेला होता.ह्या भेटीदरम्यान जम्मू-कश्मीरचे महाराजा रणबीर सिंह ह्यांनी किंग एडवर्ड सातवा ह्यास हि बहुमूल्य हिरेजडित ढाल भेट दिली होती.
स्व
संरक्षणासाठी वापरण्यात येणारी हि ढाल पितळापासून बनविलेली असून ह्या ढालीवर उत्कृष्ट पद्धतीने सोन्याचे नक्षीकाम केलेले आहे. ढालीवर मधील समोरील बाजूस चार वाट्या असून प्रत्येक वाटीवर ५० वेगवेगळ्या आकारांचे हिरे आहेत.


वरील बाजूस चंद्रकोर आहे. ह्या ढालीवर निळ्या हिरव्या आणि पिवळ्या रंगात चित्रकारी केलेली असून ह्या चित्रांत तुम्हाला मोर, हत्तीच्या झुंजी, वाघांच्या झुंजी, वाघ-सिंह हरणाची शिकार करतानाची दृश्ये चित्रित केलेली दिसतील. ह्या ढालीवर वर्तुळाकार अशी सात पाने असून प्रत्येक पानात वेगवेगळ्या आकाराचे ३१ हिरे आहेत.


ह्या पूर्ण ढालीवर ८०० पेक्षा जास्त हिरे असून ढालीवर चांदीच्या कामावर सोन्याचे पाणी देऊन नक्षीकाम केलेले आहे.
ह्या ढालीचे पूर्ण माप हे  6.7 x 48.0 cm  आकाराचे आहे.
हि ढाल सध्या रॉयल कलेक्शन ट्रस्ट (युनायटेड किंग्डम) ह्यांच्या संग्रहात आहे. उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे ह्या ढालीची निर्मिती करण्यात आली होती.

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
,9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম