विजापूरची मूलुख मैदान तोफ


विजापूरची मूलुख मैदान तोफ


__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
__________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/2PWLHQW
विजापूर मध्ये एक भलीमोठी तोफ आहे तिला "मुलुख मैदान" तोफ म्हणतात.खरेतर तिचे नाव मलिक-इ-मैदान तोफ (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा)असे आहे.
या तोफेचे वजन ५५ टन असून निजामशाहीतील राजा बुर्हाणशहा याच्याकडे काम करीत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या मिश्रणातून अहमदनगर येथे ही तोफ गाळली होती.या तोफेचे तोंड मगरीच्या उघडलेल्या जबड्यासारखे आहे. मलिक मैदान तोफेची लांबी १४ फूट ४ इंच असून तिचा व्यास ४ फूट ११ इंच आहे.

निजामशाहीच्या उत्तरार्धात ही तोफ अहमदनगर येथून परांड्याच्या किल्ल्यावर व नंतर दक्षिणेत नेण्यात आली.सध्या ही तोफ विजापूर किल्ल्याच्या बुर्ज-ए-शरीफ नावाच्याबुरुजावर ठेवण्यात आलेली आहे.बुर्ज-ए-शरीफचा अर्थ सिंहांचे बुरुज असा होतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,तालीकोट युद्ध जिंकल्यानंतर 16 व्या शतकात विजापूरचा शासक इब्राहिम आदिल शाह याने या तोफेला स्थापित केले होते.या तोफेवर एका हत्तीला दोन सिंह नखांनी फाडत असल्याची आकृती देखिल कोरण्यात आली आहे.या तोफेला वापरण्यासाठी 40 किलो दारु आणि लोखंडाचे अनेक गोळे लागत होते. एवढे सगळे एका वेळेस मारा करण्यासाठी लागत होते. दारु चे भंडार संपल्यानंतर दगडाचे तुकडे किंवा तांब्याचे सिक्के भरुन या तोफेचा वापर करण्यात येत होता.
या तोफेचे वजन एवढे आहे की,तिला ओढण्यासाठी 10 हत्ती, 400 बैल आणि शेकडो माणसांची ताकत लागत होती.
विजय नगरजवळील रक्कस-तंगडि येथे झालेल्या युद्धात या तोफेचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. या युद्धात विजय नगरच्या राज्याचा मृत्यु झाला होता.या तोफेचा आव्वाज खरच खूप मोठा होता. तोफ डागणाऱ्याचं सरंक्षण व्हावं म्हणून त्या काळात तोफे जवळ एक पाण्याने भरलेला हौद बांधण्यात आला होता. तोफेची बत्ती पेटवल्यावर सैनिक या हौदात उडी घ्यायचे. नाही तर त्यांच्या कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असायची.निजामशाहीच्या उत्तरार्धात ही तोफ अहमदनगर येथून परांड्याच्या किल्ल्यावर व नंतर दक्षिणेत नेण्यात आली.आदिलशाहीचे सरदार मुरार पंडीत जगदेव यांनी हि तोफ विजापूर येथील आदिलशाहीच्या राजधानीत नेण्यासाठी खूप खस्ता खाल्या.हि तोफ नर्मदा नदी पार करताना नावेसकट नदीत बुडाली होती.अथक परिश्रम करून मुरार जागदेवानी हि तोफआदिशाहीकडे सपुर्द केली.याच तोफेची भीती आदिलशाही सार्या हिंदुस्थानातील राज्यकर्त्यांनी घालत असे. मराठी राज्य बुडवण्याची धमकी याच तोफेच्या जीवावर आदिलशाही देत असे.
मात्र शिवछत्रपतीनी अलौकिक कर्तुत्वाने कर्नाटक स्वतंत्र केले तेव्हा अनेक जन बोलू लागले कि हि मुलुख मैदान पुण्याला नेऊया ,तेव्हा अतिशय मुत्सद्दी असलेले शिवराय बोलले कि माझी एक एक माणसे हि मुलुख मैदान तोफच आहे,अश्या धातूंच्या तोफा नेऊन स्वराज्य सजवण्या ऐवजी मला महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या आत मुलुख मैदान तयार करायची आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম