बाटलीतले पाणी खरोखरच शुद्ध असते का?

बाटलीतले पाणी खरोखरच शुद्ध असते का ?


 दि.११  मे  २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3tER0SG
आपण शुद्ध पाणी म्हणुन,बाटलीतले पाणी विकत घेतो.बाटलीबंद पाणी विक्री व्यवसाय करणार्‍या बोगस कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्या दररोज साधारणपणे ७० ते ८० हजार लिटर पाणी खपवितात. अशुद्ध पाण्याचा हा ‘बाजार’ म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळच आहे.
प्रत्येक जिल्ह्यात अशा बोगस कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडून एक लिटरपासून २० लिटर पाणी विक्री व्यवसाय जोरात सुरू आहे. अशा बोगस कंपन्यांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

बाटलीतले पाणी खरोखरच शुद्ध असते का?,Is Bottled Water Really Pure?

गेल्या दोन-तीन वर्षांत बाटलीबंद पाणीविक्री करणार्‍या बोगस कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता केवळ बाटल्या खपविण्यावर भर दिला जातो. महामार्गालगतची रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये सर्रासपणे या बेकायदेशीर कंपन्यांच्या पाण्याची विक्री सुरू आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नळाचे पाणी वापरले जाते. बाजारात लायसन्सधारक कंपन्यांच्या 20 लिटर जारची किंमत 50 ते 60 रुपयांना मिळते. मात्र, बोगस कंपन्यांकडून ती केवळ 25 ते 30 रुपयांत विकली जाते.बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डची (बीआयएस) आणि अन्‍न व औषध प्रशासन विभागाची मान्यता, परवाने असावे लागतात. या सर्व परवानग्या असलेला वितरकच बाटलीबंद पाण्याची विक्री करू शकतो; परंतु सगळे नियम धाब्यावर बसवून नागरिकांना अशुद्ध पाणी विकत त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि आर्थिक लूट बोगस कंपन्यांकडून सुरू आहे.
शुद्धतेसाठीच्या चाचण्या
सँड फिल्टरेशन ः टाकीत पाणी सोडून वाळूच्या साहाय्याने गाळ बाजूला करणे
कार्टरेज फिल्टरेशन ः पाण्यातील सूक्ष्म माती व इतर अनावश्यक कण बाजूला करणे.
रिव्हर्स ऑसमॉसिस ः विहीर, कूपनलिका किंवा काही ठिकाणी नदीच्या पाण्यातही मोठ्या प्रमाणात क्षार असतात. तसेच विविध नैसर्गिक धातूंचे पाण्यात मिश्रण झालेले असते. ते क्षार आणि धातू पाण्यातून काढून टाकले जातात.
ओझोनायझेशन ः पाण्यावर ओझोनायझेशन किरणांचा मारा करून त्यातील जीवाणू आणि विषाणू मारले जातात.
- वरील सर्व प्रक्रिया केल्यानंतर पाणी खरोखर शुद्ध झाले का, याची खात्री करण्यासाठी मिनरल वॉटर प्लँटमध्ये प्रयोगशाळा असावी लागते. तेथे केमिस्ट व मायक्रो बॉयालॉजिस्ट असावे लागतात. त्यांनी प्रयोगशाळेत पाणी शुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतरच ते विक्रीसाठी बाटलीबंद करायचे असते.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________

Is Bottled Water Really Pure?


May 11, 2021

We buy bottled water as pure water. There are bogus companies selling bottled water. These companies consume about 70,000 to 80,000 liters of water per day. This 'market' of unclean water is a game with people's lives.
There are such bogus companies operating in every district. They are selling one liter to 20 liters of water. Such bogus companies are costing the government millions of rupees.


The number of bogus companies selling bottled water has increased rapidly in the last two-three years. These companies insist on consuming only bottles without any kind of refining process. These illegal companies are selling water in restaurants and hotels along the highway. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, a large number of public tap water is used under the name of bottled water. A 20-liter jar from a licensed company costs between Rs 50 and Rs 60 in the market. However, it is sold by bogus companies for only Rs 25 to Rs 30. The sale of bottled water requires the approval of the Bureau of Indian Standards (BIS) and the Food and Drug Administration. Only a distributor with all these permissions can sell bottled water; But by setting all the rules on the table and selling unclean water to the citizens, their massive fraud and financial looting is being started by bogus companies.
Tests for accuracy
Sand Filtration: Leave water in the tank and remove the sludge with the help of sand
Cartridge filtration: Removal of fine particles and other unwanted particles from water.
Reverse osmosis: Wells, canals or in some places river water also contain large amounts of salts. Also various natural metals are mixed in the water. They remove salts and metals from the water.
Ozonization: Bacteria and viruses are killed by the ozonation of water.
- After all the above procedures, the mineral water plant needs to have a laboratory to make sure that the water is really purified. There have to be chemists and microbiologists. They want to bottle it for sale only after they make sure the water is pure in the lab.
____________________________
WᕼᗩTᔕA ᑭᑭ 9890875498 ☜ ♡
mahiti seva Group Pethwadgaon
_______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম