मनी प्लांट व त्याबद्दल माहिती
_
दि. १७ मे २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3tPiXax
वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणे फारच शुभकारक असते. ज्योतिषांच्या मतांप्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे. मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे लावले जाते. याची पाने गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडाला फारश्या निगेची आवश्यकता नसते. या झाडाला फारसे पाणीसुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते.
आपल्यापैकी अनेकांच्या घरात एक वनस्पती छोट्या बॉटल किंवा कुंडीत असते. जिला लोक बऱ्याचदा दुसऱ्यांच्या घरातून आणून आपल्या इथे लावतात.
ही वनस्पती सूर्याच्या प्रकाशापासून लांब राहून सुद्धा खूप वेळेपर्यंत हिरवी आणि टवटवीत दिसते.मनी प्लांट एक अशी वनस्पती आहे, जी घरात ह्या विश्वासाने लावली जाते की, ही वनस्पती घरात पैश्याची कमी नाही होऊ देणार. ही वनस्पती लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल.
पण तुम्हाला माहित आहे का, मनी प्लांटला पैसे आणि समृद्धीच्या भरभराटीशी जोडण्यामागे एक गोष्ट आहे? चला ती गोष्ट जाणून घेऊया.
मनी प्लांटशी जोडलेली ही प्रसिद्ध लोककथा तैवानमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे.
त्याने बघितले की, ही वनस्पती खूप लवचिक आहे आणि काही जास्त सांभाळ न करताही आपोआप वाढत आहे.
वनस्पती ज्याप्रकारे कोणत्याही मदतीशिवाय अपोआप वाढत होती, त्यावरून शेतकऱ्याला प्रेरणा मिळाली. वनस्पतीच्या या विकासाने त्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
शेतकऱ्याने निर्णय घेतला की, तो वनस्पतीसारखा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये लवचिकपणा आणेल आणि आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वत:ला समर्पित करेल. तो कोणाचीही पर्वा न करता पुढे जात राहील.
लवकरच त्या वनस्पतीवर फूल आले. तोपर्यंत शेतकरी देखील आपल्या कष्टाने एक यशस्वी व्यावसायिक बनला होता.
लोकांनी शेतकऱ्याच्या यशस्वी होण्याचे गुपीत त्याच्या घराच्या बाहेर लावलेली हिरवीगार वनस्पती आहे असे जाणले. ह्याप्रकारे हळू-हळू लोकांनी तिला समृद्धीशी जोडून त्या वनस्पतीचे नाव मनी प्लांट असे ठेवले. ह्या गोष्टी व्यतिरिक्त मनी प्लांटविषयी कित्येक दुसरे दावे प्रचलित आहेत. जे वेगवेगळया आधारावर आहेत.
फेंगशुईच्या नुसार, ही वनस्पती आजूबाजूची हवा शुद्ध करते. ही रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते.
🪴घरात कांटेदार व दूध (ज्यांना कापल्याने पांढरे द्रव्य निघत) निघणारे रोप लावू नये. कारण काटी नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात. गुलाबा सारखे कांटेदार रोप लावू शकता पण त्याला घराच्या छतावर लावले तर उत्तम.
कोणत्याही वस्तूवर असणारा विश्वास आपल्याला प्रत्येकवेळी बळ देतो, पण जीवनात काही मिळवण्यासाठी कष्ट करणे खूप गरजेचे आहे.असे होऊ शकते की, मनी प्लांट तुमच्या जीवनातील, घरातील समृद्धी कायम ठेवू शकते. पण त्या समृद्धीची भरभराट करण्यासाठी कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील.यासाठी मेहनत व जिद्द हवी.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
____________________________
Tags
माहिती