लक्ष्या बेर्डेची आई : अभिनेत्री अलका इनामदार

 लक्ष्या बेर्डेची आई : अभिनेत्री अलका इनामदार 

फेसबुक लिंक http://bit.ly/3tQfubW
मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे असेल तर त्याच्या आईची भूमिका अलका इनामदार असणार हे समीकरण अनेक चित्रपटांमध्ये दिसले.काहीजण तर अलका इनामदार यांच लक्ष्याच्या खरया आई आहेत असे वाटत असे.

लक्ष्या बेर्डेची आई : अभिनेत्री अलका इनामदार


विनोदीपट असो वा सामाजिक चित्रपट असो त्यांनी अनेक भुमिका जीव तोडून केल्या आहेत.त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.पण त्यांना खाष्ट सासु कधीच रंगविता आली नाही.कारण त्यांचा तो स्वभावच नव्हता.मायाळु खेडवळ भाबडी आई त्यांनी अनेक चित्रपटात रंगिवली.अलका इनामदार या कोल्हापुरात मंगळवार पेठ, पाण्याचा खजिना परिसरात राहत होत्या.त्यांचे पती दिनकर इनामदार हे सुध्दा नाटय व सिनेकलावंत.प्रारंभी मेळे,नाटकामध्ये दिनकर इनामदार काम करत असत. प्रकाश हिलगे यांच्या "वैभव म्युझिकल नाईट" मध्ये ते काम करत असत.त्याकाळी "मेळे" हा प्रकार कोल्हापूर भागात खुप प्रसिद्ध होता.पतीच्या बरोबरीने अलका इनामदार यांनी पण नाटकात भुमिका करायला सुरुवात केली. ते दोघे पतीपत्नी ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपट निघत होते तेव्हापासुन काम करत होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,जवळच जयप्रभा स्टुडिअो असल्याने व बाबा म्हणजे भालजी पेंढारकर यांचा त्यांच्यावर लोभ होता.चित्रपटात छोट्या मोठ्या भुमिका करत त्यांनी अनेक दिग्दर्शकांचे लक्ष वेधुन घेतले.दादा कोंडके यांच्या चित्रपटात दिनकर इनामदार यांची छोटीशी का असेना पण भुमिका असे.पळवापळवी मध्ये त्यांनी उषा चव्हाण यांच्या बापाची भुमिका केली होती.त्याचबरोबर दिनकर इनामदार यांनी झपाटलेला या चित्रपटात "धनाजीराव" ही भूमिका साकारली होती.लक्ष्मीकांत या चित्रपटात बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. याच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून धनाजीराव यांची टिंगल करत लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.
अलका इनामदार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई म्हणुन बरेच चित्रपटात काम केले. अलका इनामदार यांनी अनेक चित्रपटात लक्षाच्या आईची भूमिका साकारली.
माहेरची साडी, हृदयस्पर्श, आई पाहिजे, दे दणादण, मुंबईचा फौजदार, शेम टू शेम यासारखे चित्रपट त्यांनी गाजवले.वयाची सत्तरी पार केल्यानंतरही पडद्यावरील त्यांचा वावर उत्साही आणि सहकलाकारांना प्रेरणा देणारा असायचा.
एवढेच नाही तर अभिनया सोबत त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता. कोल्हापूरच्या महानगर पालिकेत नगरसेविकेच्या पदाचा भार त्यांनी सांभाळला होता.त्या मंगळवार पेठ येथुन अपक्ष म्हणुन निवडुन आल्या होत्या.
२२ जानेवारी २००४ रोजी अलका इनामदार यांचे निधन झाले त्यापश्चात त्यांचे पती दिनकर इनामदार यांनी देखील १२ ऑगस्ट २००५ रोजी अखेरचा श्वास घेतला.
अलका आणि दिनकर इनामदार यांना संजय आणि विनोद ही दोन मुले. संजय इनामदार यांनी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा भार सांभाळला आहे. सध्या त्यांचे कुटुंब कोल्हापूर येथे स्थायिक आहे.
कोरा लिंक https://bit.ly/3eScOq0

अनिल पाटील पेठवडगाव
___________________

गाजलेली जाहिरात
“सुवासिनीनं कुकवाला आणि मर्दानं चहाला नगं म्हनु नयेss”

असं म्हणणारा मगदुम चहाच्या गाजलेल्या जाहिराती मधला दमदार आवाज आपल्या कोल्हापुरातले जेष्ठ शिक्षक आणि अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचा!!

सोबत ईतर दोन आवाज ज्यांचा ते पुन्हा कोल्हापुरचंच गुणी कलावंत दांपत्य : 
कै. अलका ईनामदार आणि कै. दिनकर ईनामदार.

ही संपुर्ण जाहिरात आणि यातला एकेक संवाद प्रसिध्द होता.. अजुनही अनेकाना पाठ आहे!!

“सखु पावन्यास्नी चा टाक बघु”

“नगंss”

“अवो सुवासिनीनं कुकवाला आणि मर्दानं चहाला नगं म्हनु नये”

“अवो पर आमी फकस्त मगदुम चाच पीतोss”

“आनी आमी काय ऊन पानी पीतो काय? 
अवो आमी बी आमच्या आबा आज्यापास्नं.. मर्दांचा कडक मगदुम चाच पीतो”

“अस्सं ? मग हुन जाऊंद्या डब्बल्ल”

“हांगाशीss”

“आत्ता आनते”

☺️
9890875498
=======================================
Lakshya Berde's mother: Actress Alka Inamdar


If Laxmikant Berde is in a Marathi film, then the role of his mother will be played by Alka Inamdar. This equation was seen in many films. Some people thought that Alka Inamdar was the real mother of the target.
Whether it is a comedy or a social film, he has played many roles. His acting has been appreciated by many. But he has never been able to paint his mother-in-law. Because he did not have that temperament. Her husband Dinkar Inamdar was also a playwright. Initially, Dinkar Inamdar used to work in fairs and plays. He used to work in Prakash Hilge's "Vaibhav Musical Night". At that time, "Mela" was very popular in Kolhapur area. The couple have been working since the release of the film Black and White. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, as there is a Jayprabha studio nearby and Baba is Bhalji Pendharkar. He attracted the attention of many directors. Dinkar Inamdar had a small role in Kondke's film. In Palvapalvi, he played the role of Usha Chavan's father. Also, Dinkar Inamdar played the role of "Dhanajirao" in the film. Were. Laxmikant had made the audience laugh loudly by tingling Dhanajirao through these talking dolls.
Alka Inamdar acted in many films as the mother of Laxmikant Berde. Alka Inamdar has played the role of Laksha's mother in many films.
He has acted in films like Maher's Saree, Hridayasparsh, Ai Pahije, De Danadan, Mumbai's Faujdar, Shame to Shame.
Not only that, he had also entered politics along with acting. She had held the post of corporator in Kolhapur Municipal Corporation. She was elected as an independent from Peth on Tuesday.
After the death of Alka Inamdar on January 22, 2004, her husband Dinkar Inamdar also passed away on August 12, 2005.
Alka and Dinkar Inamdar have two children, Sanjay and Vinod. Sanjay Inamdar is the Public Relations Officer of Kolhapur Municipal Corporation. Currently his family is settled in Kolhapur.
Anil Patil Pethwadgaon
___________________


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম