🦟 काही विशिष्ट रक्तगटाच्या लोकांनाच डास अधिक का चावतात याची '3' कारणं !
________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
________________________
तुमचं रक्त गोडं आहे म्हणून नव्हे तर या '3' कारणांमुळे डास तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात.
एखाद्या विशिष्ट रक्तगटाच्या माणसाला डास अधिक चावतात हे तुम्हाला माहिती आहे का? तसे संशोधकांचे मत आहे! ‘ओ’ हा रक्तगट असलेल्या लोकांना डास अधिक चावतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनाही डास चावण्याचे प्रमाण अधिक असते.
http://bit.ly/3xjG53B
2004 सालच्या अहवालानुसार, इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत डास ओ रक्तगटाच्या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात.
या अभ्यासानुसार डास सर्वप्रथम ओ रक्तगट त्यानंतर ए रक्तगट त्यानंतर बी रक्तगट आणि सगळ्यात शेवटी एबी रक्तगटाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. त्यामुळे ओ रक्तगटाच्या व्यक्तींनी डासांपासून स्वतः चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण डासांमुळे मलेरिया , डेंगी , चिकनगुनिया, झिका यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
👉 गर्भवती स्त्रिया :
वयोवृद्ध किंवा लहान मुलांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांमध्ये डासांचा डंख होण्याचा धोका अधिक असतो. the annals of tropical medicine and parasitology 2004 च्या अभ्यासानुसार सामान्य स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना डास चावण्याचा धोका दुप्पट असतो.‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांच्या रक्तात काही विशिष्ट प्रकारचे तरल पदार्थ असतात व त्यामुळे डास त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. ‘ए’ रक्तगटाच्या माणसांकडे ते जास्त आकर्षित होत नाहीत. त्यांच्या रक्तात या तरल पदार्थांचे प्रमाण सर्वात कमी असते. गर्भवती महिलांच्या श्वासोच्छ्वासात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 21 टक्के अधिक असते. त्यामुळे त्यांचे तापमान तुलनेने अधिक असते. अशा स्थितीत डास त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. गडद रंगाचा पोषाख करणार्या लोकांकडेही डास अधिक आकर्षित होतात, असे दिसून आले आहे. याबाबत फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले आहे. मेटॅबॉलिक रेट अधिक असणार्यांमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या निर्मितीचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे त्यांच्याकडे डास आकर्षित होतात. गर्भवती स्त्रियांचे मेटॅबॉलिझम वाढलेले असते त्यामुळे त्यांना डास चावण्याची शक्यताही वाढते.
👉 तुमची जणुकं mosquito magnet असल्यास :
तुमच्या शरीरातील जणूकं तुम्हांला mosquito magnet बनवतात.the journal Infections, Genetics and Evolution 2013 सालच्या अभ्यासानुसार शरीरातील काही विशिष्ट जणूकं डासांना आकर्षित करतात.the journal Infections, Genetics and Evolution नामक ही जणूकं शरीराच्या वासामध्ये असतात. त्यामधील केमिकल्समुळे डास अधिक जवळ येतात. तसेच डास विशिष्ट भागावर चावतात. ‘Olfaction in Mosquito-Host Interactions’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार डेंगीला कारणीभूत असणारे डास डोक्याजवळ अधिक चावतात.