चांद्रवीर परत येतील याची अमेरिकेला खात्री नव्हती

   चांद्रवीर परत येतील याची अमेरिकेला खात्री नव्हती 


.        दि. २५  जूलै २०२०

http://bit.ly/3juid7y
  .  ‘अपोलो-11’ या ‘नासा’च्या यानातून चंद्रावर गेलेल्या नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी इतिहास घडवला. 16 जुलै 1969 या दिवशी हे यान सोडण्यात आले होते. 20 जुलै 1969 ला नील आणि एडविन चांद्रभूमीवर उतरले. त्यावेळी मोड्यूलचे पायलट मायकल कोलिन हे ‘कोलंबिया’ नावाचे हे मोड्यूल चालवत होते. ‘हे सामान्य माणसाचे छोटेसे पाऊल असले तरी ही संपूर्ण मानवजातीची उत्तुंग झेप आहे’, असे उद्गार नीलने चांद्रभूमीवर आपले पाऊल ठेवत असताना काढले होते. हे दोन्ही अंतराळवीर परत सुखरूप येतील याची अमेरिकेला खात्री नव्हती. त्यामुळे तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोकसंदेशही तयार ठेवला होता. अर्थात, हा शोकसंदेश वाचण्याची वेळच आली नाही!    
व्हाईट हाऊसचे स्पीच रायटर (भाषण लेखक) बिल सफायर यांनी 18 जुलै 1969 ला ‘इन इवेंट ऑफ मून डिझॅस्टर’ या नावाने हा शोकसंदेश तयार केला होता. मात्र, तीनही अंतराळवीर हा शोकसंदेश लिहिल्यानंतर सहा दिवसांनी म्हणजे 24 जुलैला पृथ्वीवर सुखरूप परत आले. सफायर यांनी त्यावेळी व्हाईट हाऊसचे ‘चीफ ऑफ द स्टाफ’ राहिलेल्या हॅरी हेल्डमॅन यांच्याकडे शोकसंदेशाची एक प्रत पाठवली होती. त्यामध्ये लिहिले होते की, हे तीन अंतराळवीर आता चंद्रावरच शांत चिरनिद्रा घेतील. त्यांच्या बलिदानाने मानवतेसाठी नवी आशा निर्माण होईल. त्यांना संपूर्ण जग नेहमी लक्षात ठेवेल. त्यांच्यासाठी आमची मातृभूमी शोक करील. हे तिघेजण चंद्रावर जाणारे पहिलेच मानव होते. ते नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील. रात्री चंद्राकडे पाहणार्या प्रत्येक माणसाला याची जाणीव होईल की, तेथील एक असा कोपरा आहे जेथे नेहमीच मानवता जिवंत राहील...वगैरे!

╰──────•◈•──────╯

चांद्रवीर परत येतील याची अमेरिकेला खात्री नव्हती

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম