पॅनकार्डवरील नंबरचा अर्थ काय आहे

 पॅनकार्डवरील नंबरचा अर्थ काय आहे? 

फेसबुक लिंक https://bit.ly/36Lv3to
ओळखपत्र म्हणून अनेक ठिकाणी पॅनकार्डचा वापर केला जातो. पैशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण, तसेच करसंबंधित गोष्टींसाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतूनही मोठी रक्कम काढायची असल्यास पॅनकार्ड नंबर अनिवार्य असतो. मात्र या १० अंकी पॅननंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?


१० अंकी पॅननंबरला पाच भागांमध्ये विभागण्यात आलेय. ज्यातील पहिले पाच आणि शेवटचा अंक अक्षरे असतात तर उरलेले अंक संख्येत लिहिलेले असतात.♍
१. समजा एखाद्याचा पॅननंबर ADEPH6548C असा आहे. यातील पहिले तीन अंक हे AAA ते ZZZ यादरम्यानची तीन अक्षरे असतात.२. चौथा अंक पॅनकार्डधारकाची स्थिती दर्शवतो. हा सर्वात महत्त्वाचा अंक असतो. अनेक पॅनकार्डवर चौथा नंबर म्हणून p हे अक्षर असते. याचा अर्थ पर्सन म्हणजेच व्यक्ती. याशिवाय चौथा नंबर म्हणून C,H,F,A,T,B,L,J आणि G ही अक्षरेही असतात.
या अक्षरांचा अर्थ खालीलप्रमाणे
C – कंपनी
H – संयुक्त हिन्दू कुटुंब
F – फर्म
A – व्यक्तींचा समूह
T – ट्रस्ट
B – एका व्यक्तीची संस्था
L – स्थानीय प्राधिकरण
J – कृत्रिम विधिक व्यक्ति
G – सरकार
३. पाचवा अंक हा पॅनकार्ड धारकाचे नाव अथवा आडनावातील पहिले अक्षर असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे नाव अमित गोएल असे असेल तर पाचवा नंबर G हा असेल.
४. पाच अक्षरांनंतर पुढील चार अंक संख्येत असतात. हे चार अंक 0001 ते 9999 यादरम्यानच्या अनुक्रमे संख्या असतात.
५. पॅननंबरमधील शेवटचा अर्थात दहावा अंक एक अक्षऱ असते जे सुरुवातीच्या नऊ अंकाचा वापर करुन एका विशिष्ट फॉर्म्युल्याअंतर्गत निर्धारित केले जाते.♍
➖➖➖➖➖➖➖ ➖➖    
                 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম