ब्रह्मपुरी किंवा बेगमपुर

 ब्रह्मपुरी किंवा बेगमपुर 

फेसबुक लिंक https://bit.ly/34zyIYD
 महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवढे तालुक्यातील एक इतिहासप्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या १,८५९ (१९७१). पंढरपूर शहराच्या आग्नेयीस सु. २५ किमी. भीमा नदीतीरावर हे वसले आहे. मराठा साम्राज्यावरील स्वारीच्या वेळी (१६९५) औरंगजेबाने आपली छावणी येथे उभारून कायम घरांची बांधणी केली.
नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास - नूर असे म्हटले जाऊ लागले.पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे औरंगजेब कालावधीण सिध्देश्वर मंदिरास अर्थसहय्य मिळत आहे.
औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला.
बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात.
औरंगजेबाची मुलगी झेबुन्निसा उर्फ बेगमसाहेबा ही १९०२ मध्ये येथे मरण पावली. तिच्या स्मरणार्थ ‘बेगमपूर’ अशा नावानेही ब्रह्मपुरीचा निर्देश केला जाई. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते.

ब्रह्मपुरी किंवा बेगमपुर

येथे सिद्धेश्वर हे एक जुने हेमाडपंती मंदिर असून महाशिवरात्रीला तेथे जत्रा भरते.नदीकाठावर श्रावण मासानिमित्त येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरु असते.मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस ह.भ.प.बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.

➖➖➖➖➖➖➖ ➖➖    
            ● संकलने
            📞@9890875498  
              ©माहिती सेवा गृप पेठवड़गाव©

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম