पित्तराना मोक्ष देणारे कोल्हापूरातील "गयातिर्थ "

 पित्तराना मोक्ष देणारे कोल्हापूरातील "गयातिर्थ "



हिंदू मान्यतेनुसार पिंडदान मोक्ष प्राप्तीचा एक सोपा मार्ग आहे. भारतात अनेक ठिकाणी पिंडदान केलं जातं परंतू काही विशेष ठिकाणांवर श्राद्ध केल्याचं खूप महत्त्व आहे. याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले गेले आहे.भाद्रपद कृष्णपक्षातील प्रतिपदे पासून अमावास्येपर्यंत  हा काळ आपल्या तीन पिढय़ातल्या पितरांच्या आपल्या निवासस्थानी आगमनाचा व वास्तव्याचा समजला जातो. या काळात आपल्या अपरोक्ष आपल्या पुढच्या पिढय़ांनी केलेल्या प्रगतीचे दर्शन घेऊन पितरांचे हे आत्मे या पिढय़ांना शुभाशिर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे.

पित्तराना मोक्ष देणारे कोल्हापूरातील "गयातिर्थ "

 पिंडदान करण्यासाठी  गया हे भारतातील  बिहार राज्यात असुन ते पाटण्याच्या १०० किमी दक्षिणेस फल्गू नदीच्या काठावर वसले आहे. गया येथे पिंडदानाचे खूप महत्त्व आहे. मान्यतेनुसार प्रभू राम आणि देवी सीतेने राजा दशरथ यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गयामध्येच पिंडदान केले होते. गया या स्थळाला विष्णूंची नगरी मानले गेले आहे. ही मोक्षभूमी म्हणून ओळखली जाते. यासाठी गयाला जाणेची आवश्यकता नाही,कोल्हापूरात ती सोय आहे.असेच एक मंदिर आपल्या कोल्हापुरात देखील आहे व त्यालाही गयाइतकेच किंबहुना जास्तच महत्त्व आहे. हे मंदिर बरयाच जणांना माहिती नाही इतके ते विस्मुरूतीत गेले आहे. 

पुर्वी आज जेथे लक्ष्मीपुरी म्हणतात तेथे महार तलाव होता. हे तळे बुजविले जाऊन सध्या तेथे राजाराम कॉलेज (सायन्स कॉलेज), राजाराम (अयोध्या) टॉकिज, आईसाहेब महाराज यांचा पुतळा, शाहू टॉकीज, सध्याची स्टेट बँक इमारत, कोषागार कार्यालय अशा इमारती उठल्या आहेत. या भागाला रविवार पेठ असे नाव आहे. तत्पूर्वी त्याचे नाव हिरापूर असे होते.हा तलाव मुजवण्याच्या अगोदर काठावर हे "गयातिर्थ" होते.

आज हे मंदिर कोषागार कार्यालय मागे व दिशा डायग्नोस्टिक सेंटर समोर असुन बाहेरून मंदिर असल्याचे जाणवत नाही. या मंदिराला आज "लक्ष्मीनारायण गयातिर्थ मंदिर" म्हणुन आोळख असली तरी मंदिरावर तशी पाटी नसल्याने व बाहेरून वाडयासारखे दगडी बांधकाम असल्याने बरयाच जणांना माहिती पडत नाही. 

दगडावर आहेत कोरलेले १३ पावलांचे ठसे 

आत मंदिरात गेल्यावर समोरच एक मंदिर आहे. पांढरया संगमरवरी विलोभनीय अशा लक्ष्मी-नारायणच्या मुर्ती आहेत. या बहुधा अलिकडच्या काळातील असाव्यात.

पित्तराना मोक्ष देणारे कोल्हापूरातील "गयातिर्थ "

बाजुला आठ पायरया खाली उतरून गेल्यावर जे  मंदिर लागते तेच प्राचीन "गयातिर्थ" होय. 
पित्तराना मोक्ष देणारे कोल्हापूरातील "गयातिर्थ "

पित्तराना मोक्ष देणारे कोल्हापूरातील "गयातिर्थ "

आत गाभाऱ्यात अंधार असतो. मंदिर हेमाडपंती मांडणीचे असुन चार खांबावर तोललेले आहे. पैकी दोन खांब मागील भिंतीत गेल्याने समोर दोनच घडीव खांब दिसतात.मंदिरात मुख्य विष्णुची मुर्ती असुन बाजुला दगडावर १३ पावलांचे ठसे कोरलेले आहेत. 

पित्तराना मोक्ष देणारे कोल्हापूरातील "गयातिर्थ "

त्याबाजुला महादेवाची पिंडी असुन याचे वैशिष्ट्य म्हणजे या पिंडीवर सरपटणारा नाग कोरलेली ही कोल्हापूरातील एकमेव मुर्ती आहे. (इतरत्र पिंडीवर छाया धरलेली नागाची मुर्ती असते.) या मंदिराबद्दल करविर महातम्यात असा उल्लेख आहे की, येथे पित्तराना तर्पण करण्यासाठी ,श्राद्ध कर्म करण्यासाठी प्रथा पुर्वापार होती. जवळची व्यक्ती मरण पावल्यानंतर श्राद्ध कर्म करणे ही धर्मपरपंरा सांगितली आहे यासाठी बिहार मधील गयातिर्थ पवित्र मानले आहे. याचबरोबर करविर क्षेत्रातील या गयातिर्थ मंदिरात देखील पौराणिक महत्व आहे.करविरला दक्षिण काशी म्हटले जाते. 

करविर महात्म्यात असा उल्लेख आहे की, श्री महालक्ष्मी मंदिराच्या इशान्येला  हे गयातिर्थ तलावाच्या काठावर स्थित आहे. 

"अयोध्या मथुरा माया काशी अवतिंका"

"पुरी द्वारावती चैव सरतैदा मोक्ष मात्रदा"

म्हणजे ही सात क्षेत्रे जीवात्म्याला मोक्ष मिळवुन देतात.इतकेच महत्त्व या करविर क्षेत्री गयातीर्थला आहे. 

म्रुतात्माला मोक्ष देण्यासाठी काशीचे विश्वनाथ करविर क्षेत्री आले. जीवाच्या गतीसाठी  या करविर क्षेत्री यमाचा आधिकार चालत नाही. किंवा त्याचे सामर्थ्य चालत नाही. असे महालक्ष्मीने वरदान दिले आहे. याठिकाणी यमाची भुमिका "रंकभैरवाकडे" दिली आहे.(हे मंदिर बिनखांबी मंदिर जवळ गुरव गल्लीत आहे) आणि  म्रुतात्माला मोक्ष देण्याची जबाबदारी "अनुगामिणी" देवीकडे दिली आहे.अशा तऱ्हेचे धार्मिक परंपरा जोडलेले हे क्षेत्र आहे. 

या गयातीर्थ मंदिरात २१ उजवी पावले व विष्णुची मुर्ती आहे.  जीवाच्या मोक्षासाठी, मुक्तीसाठी केला जाणारा तर्पण विधी येथे करावा असे उल्लेख आहेत. आज या ठिकाणी १३ पावले आहेत पण करविर महात्म्य मध्ये २१ पावलाचा उल्लेख सापडतो. ती पावले या देवाची आहेत. ईशान, विष्णु, कमलासन, भार्गव, अत्री, चंद्र, इंद्र,कश्यप, सुपर्ण, गजानन, वनित्रेय, अत्र, ग्रह, चतुष्वेद, अगस्य, गर्ग अशी ही १३ पावले आहेत. 

तर्पण विधी 

याठिकाणी तर्पण करण्यासाठी असा विधी सांगितला आहे की, काळेतीळ व उदक या सामग्रीवर आपण हा विधी करू शकतो.डाव्या हातात काळे तीळ घेऊन अंगठ्याने प्रत्येक पावलावर हे तीळ घालावेत. असा उल्लेख आहे. 

बिहार मधील गयेमध्ये जाऊन आपण हा विधी केला तर पित्तराना मोक्ष मिळतो असा धार्मिक ग्रथांत उल्लेख आहे. पण बिहार मधील गयेमध्ये केवळ १३ पावले आहेत तर करविर क्षेत्री २१ देवतांची पावले आहेत. 

करविर क्षेत्री असणाऱ्या या क्षेत्री ,आपण तर्पण विधी करण्यासाठी निघालो आहोत ही संकल्पना घेऊन एखादा वंशज बाहेर पडतो त्यावेळी त्याचे पित्तर स्वर्गात आनंदाने नाचु लागतात. इतके महत्त्व या करविर क्षेत्री गयेला आहे. बिहार मध्ये जाऊन पिंडदान विधी करावा लागतो त्याचे जे महत्त्व आहे तितकेच महत्व या करविर क्षेत्री गयेला आहे.

हे पिंडदान अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीपासून सुरू होते आणि सर्वपित्री अथवा महालया अमावस्येच्या दिवशी पर्यन्त केले जाते. 

-अनिल पाटील पेठ वडगाव

9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম