नोटांवर गांधीजींचा फोटो का असतो?

  नोटांवर गांधीजींचा फोटो का असतो?


फेसबुक लिंक https://bit.ly/3l2RhLm
            आपल्या देशातील प्रत्येक नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो का असतो ? असा प्रश्न कधी पडला आहे का?, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेवूया याच प्रश्नाचे उत्तर....

नोटांवर गांधीजींचा फोटो का असतो?

भारताला स्वातंत्र मिळवून देण्यामागे महात्मा गांधी यांची महत्त्वाची भूमिका होती. स्वातंत्र्यासाठी त्यांना काहीवेळा तंरुगातही जावे लागले. भारतात विविध तऱ्हेचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येक राज्यातील लोकांना असे वाटत होते की, चलनावर आपल्या राज्याचा फोटो असावा.

चलनावर महात्मा गांधी यांचा फोटो लावण्याचा अर्थ म्हणजे गांधी हे असे एक व्यक्ती होते जे सर्व धर्माचे पालन करत होते. जे नेहमी सगळ्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असत. ते आपल्या देशाचे राष्ट्रपिताही होते. तसेच त्यावेळी ते भारताचा चेहरा होते. जगभरात महात्मा गांधीं बद्दल विशेष असा आदर आहे.
भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना आपल्या चलनावर किंग जॉर्ज यांचा फोटो होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही जवळपास २ वर्षापर्यंत हेच भारतीय चलन चलनात होते. १९४९ मध्ये यात बदल करुन नोटांवर अशोक स्तंभ छापण्यात आला होता.

भारतीय रिजर्व्ह बँकेनुसार १९९६ मध्ये महात्मा गांधी यांचा फोटो असलेली नोट चलनात आली. त्यानंतर ५, १०, २०, १००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. या दरम्यान अशोक स्तंभाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आणि अशोक स्तंभाचा फोटो नोटाच्या उजव्या बाजूला छापण्यात आला.
देशात १९९६ च्या आधी १९८७ मध्ये महात्मा गांधी यांच्या फोटो वॉटरमार्कच्या स्वरुपात वापरला जात होता. जो नोटवर उजव्या बाजूला असे. पण, आता प्रत्येक नोटवर गांधीजी यांचा फोटो वापरला जातो.
नोटवर दिसणाऱ्या फोटोमागे एक रहस्य आहे. हा फोटो १९४६ मध्ये काढण्यात आला होता. तेव्हा ते लार्ड फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांच्यासोबत कोलकाता येथील विक्ट्री हाऊसमध्ये आले होते. या फोटोतून महात्मा गांधी यांचा चेहरा पोट्रेटच्या रुपात भारतीय नोटांवर छापण्यात आला.
=======================

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম