आणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं !

  आणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं ! 

फेसबुक लिंक https://bit.ly/36tzAAz
           गांधीजी म्हटलं की आपल्यासमोर त्या साध्या पोशाखातील महात्म्याची प्रतिभा उभी राहते ज्यांनी सदैव सत्याच्या मार्गाचे आचरण केले.
आणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं !

अहिंसावादाच्या आधारावर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अश्या या महापुरुषाबद्द्दल आपल्याला एवढेच माहित आहे की ते एक सत्यपुरुष आणि स्वातंत्र्यसेनानी होते. पण समजा तुम्हाला कोणी सांगितले की गांधीजींना क्रिकेट खेळामध्ये विलक्षण रस होता तर??? तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटेल, कारण गांधीजींच्या एकंदर व्यक्तिमत्वाकडे पाहता यावर विश्वास बसणे कठीणचं! पण गांधीजींबद्दल सामान्यतः माहित नसलेली ही गोष्ट अगदी खरी आहे की गांधीजी क्रिकेट खेळत असतं.


ब्रिटीश खेळाडूंच्या एका संघाचा भारतीय वंशाच्या खेळाडूंसोबत लंडन येथे क्रिकेटचा एक सामना आयोजित करण्यात आला होता आणि त्या सामन्यात आपल्या गांधीजींनी उत्तम खेळ करत स्वत:मधील क्रिकेटर सर्वांसमोर सिद्ध केला होता. या सामन्यात गांधीजींनी २१ धावा केल्या होत्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूपची पोस्ट,विशेष म्हणजे त्यात ३ चौकारांचा देखील समावेश होता. एवढेच नाही तर त्यांना आपली गोलंदाजी दाखवण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत त्यांनी एक बळी देखील घेतला. या प्रसंगावरून एक गोष्ट मात्र सिद्ध होते की गांधीजी उत्तम क्रिकेट खेळायचे.

दुसरा एक प्रसंग म्हणजे एकदा एम.सी.सी. क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता आणि त्या संघाचे नेतृत्व करत होता डग्लस जोर्डीन. या संघात गांधीजींची देखील निवड झाली होती. परंतु ते सामना  खेळले नव्हते, बहुधा राखीव खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती, कारण एम.सी.सी.च्या लॉर्ड मैदानावरच्या पुस्तकामध्ये १७ वा खेळाडू म्हणून त्यांची सही आहे.
गांधीजींचा क्रिकेटमधील रस दर्शवणारा अजून एक प्रसंग त्यांचे शाळेतील मित्र आर.जी.मेहता  यांनी लिहून ठेवली आहे. ते म्हणतात,,
🎗गांधीजी क्रिकेटचे मोठे चाहते होते. त्यांना या खेळामध्ये अतिशय रस होता ही गोष्ट त्यांच्या जवळील व्यक्ती वगळता फारशी कोणाला ठावूक नाही. एकदा आम्ही क्रिकेटचा एक सामना पाहायला गेलो होतो. तो सामना होता राजकोट शहर वि. राजकोट सरदार (कँप विभाग) यांच्यामध्ये! सामना अतिशय रंगत आला होता आणि गांधीजी अतिशय उत्सुकतेणे सामन्याची मजा घेत होते. अचानक एका क्षणाला ते उद्गारले, “हा फलंदाज आता आउट होईल बघ!” आणि काय आश्चर्य! तो फलंदाज दुसऱ्याच क्षणाला बाद झाला.
=======================

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম