कोसळणाऱ्या विजेला⚡ अटक करा !

 कोसळणाऱ्या विजेला⚡ अटक करा ! 

         ⚡
                ⚡

'
तारीख  2 अॉक्टोंबर 2020 
'

फेसबुक लिंक https://bit.ly/34jKaav
पावसाळा आल्हाददायक तसा तो आपत्ती आणणाराही असतो. या आपत्तीच्या मालिकेत वीज कोसळणेही सामील आहे.ढगातून जमिनीकडे येणारी वीज हा एक मुख्य प्रकार आहे. प्रति सेकंद 100 विजा पृथ्वीवर धडकत असतात. आकाशात लखलखणाऱ्या विजा हा विद्युत ऊर्जेचा प्रकार आहे. बेंजामिन फ्रँकलीन या अमेरिकी शास्त्रज्ञाने 1752 मध्ये सिद्ध करण्यासाठी एक प्रयोग केला. तो असा की वीज कडकडत असताना पतंगाला चावी बांधून त्याने आकाशात उडवली. तसेच एक किल्ली त्याच्या हातात ठेवली. वीज कडाडल्यावर त्या किल्लीवर ठिणग्या पडल्‍या. आणि त्‍यावर धन-ऋण आहे हे समोर आले.प्रत्येक विजेत जवळपास एक अब्ज व्होल्ट एवढी विद्युत ऊर्जा असू शकते. ढगांच्या खालच्या बाजूला ऋण वीज तयार होते त्‍यावेळी त्‍यांची पायऱ्यांसारखी मालिका तयार होते. तेव्हा वीज ही तीन लाख किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने जमिनीकडे येते. प्रत्येक पायरी साधारण 150 फूट लांबीची असते. जेव्हा सर्वांत खालची पायरी धन प्रभाराने भारित असलेल्या वस्तूपासून 150 मीटर अंतरावर येते, तेव्हा ती तिकडे आकृष्ट होते. ही वस्तू एखादी इमारत, झाड किंवा एखादी व्यक्तीही असू शकते. ढगांचा ऋण आणि त्या वस्तूचा धन या दोन्हींमधून वीज प्रवाह वाहत असतो आणि वीज कोसळताना दिसते. तिचा वेग तब्बल 300 लाख किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो. दरवर्षी शेकडो जण यामुळे प्राणास मुकतात. लायटनिंग अरेस्टरची यंत्रणा हा धोका कमी करते. याकडे सर्वांनीच लक्ष @देण्याची गरज आहे.पावसाळा हा ऋतू अतिशय आल्हाददायक असला आणि नवनिर्मिती करणारा ऋतू असला तरी तो एका अर्थाने आपत्ती आणणाराही ठरत असतो. निसर्गाची शक्ती खूप मोठी आहे. कोणत्या क्षणी निसर्गाचं रुप पालटेल आणि एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळेल याचा भरवसा देता येत नाही. आपत्तींची काहीशी मालिकाच या काळात घडत असते. अनेक नैसर्गिक आपत्तीं पैकी एक आपत्ती म्हणजे विजेचं कोसळणं.अतिउच्चदाबाची वीज ज्या वेळी कोसळते त्‍यावेळी ती १० कोटी वॅट प्रवाहित करते आणि त्‍यादरम्‍यान सर्वोच्च तापमान म्‍हणजे ३०,०००˚ से. किंवा त्याहीपेक्षा जास्त असू असते. या प्रचंड उष्णतेमुळे वीजे कोसळल्‍यांनतर त्‍याच्या मार्गात येणा-या काहीही आले तर त्‍यांची वाफ होऊन जाते. तसेच विद्युत उर्जेतील उष्णता प्रचंड वाढल्‍याने त्‍या मार्गातील हवेचा दाबाचे स्फोटात रूपांतर होवून त्‍याची तीव्रता वाढते आणि त्यामुळे वीजेची मोठी गर्जना निर्माण होते. त्‍यास विजांचा कडकडातही म्‍हटले जाते. या आपत्तीपासून कशा प्रकारे वाचता येईल, त्याच्या उपाययोजना पहा.जमीन आणि आकाशात जमा होणारे ढग यांच्या तापमानात निर्माण होणारा फरक आणि त्यातून निर्माण होणारा कणांचा भार याचा निचरा विजेच्या रुपाने होत असतो. वीज कोसळण्याचं भाकित करता येत नाही म्हणून कोसळणाऱ्या या विजेला नैसगिक आपत्तीपैकी एक असं म्हणता येईल.पडणाऱ्या विजेचा दाब १ लक्ष व्होल्टस् इतकाअसतो. इतक्या तीव्र दाबाने येणारी ही वीज धरतीत सामावण्याचा मार्ग शोधत असते. जमिनीलगत संपर्कात येणाऱ्या पहिल्या वस्तूवा इमारतीच्या माध्यमातून वीज जमिनीत जात असते. @विजेच्या या प्रवासात दाबाच्या तीव्रतेमुळे माणसंच काय तर वृक्ष देखील जळून खाक होतात.तीव्र ऊर्जेचा लोळ अशा अर्थाने आपण या विजेच्या प्रवासाला काही प्रमाणात @नियंत्रित राखू शकतो त्यासाठी आपणास “लायटनिंग अरेस्टर” सारख्या उपकरण्याची गरज भासते. विशिष्ट पध्दतीने धातूच्या सहाय्याने कोसळणाऱ्या विजेला आपणाकडे खेचणे आणि अगदी सुरक्षितपणे जमिनीत पोहचवणे या कामासाठी अशी अरेस्टर बसविली जातात.क्षेत्रफळाच्या हिशेबाने राज्यात अशा अरेस्टरचे प्रमाण वाढविण्याचे काम आता सुरु झाले आहे.@ शहरांमधील उंच इमारती तसेच प्रेक्षागारे, चित्रपटगृहे आदी ठिकाणांवर असे अरेस्टर असतात. मात्र ग्रामीण व निमशहरी भागात अशी यंत्रणाच नाही त्यामुळे या भागात वीज कोसळणे या आपत्तीपासून सावध आणि सुरक्षित अंतरावर राहणे हाच एकमेव पर्याय असतो.

कोसळणाऱ्या विजेला⚡ अटक करा !

मोकळ्या जागेत लहान टेकडी, झाड, झेंड्याचे खांब, प्रेक्षपण मनोरा अशा जमीनीपासून फार उंच असलेल्या जागांचा आश्रय घेवू नये. तर बंदिस्त इमारती, चारचाकी वाहने वीजेच्या बचावासाठी सुरक्षित असतात.
विजा चमकत असतील तर त्यावेळी रेडिओ, टिव्ही,संगणक, मोबाईल आदी सारख्या उपकरणांचा वापर टाळणे धातूची छडी किंवा तत्सम वस्तू न बाळगणे, विजा चमकतात त्यावेळी झाडाच्या आसऱ्याला उभे न राहणे आदी काही उपाय आपणास सुरक्षित ठेवू शकतात.ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रात किमान १ लायटनिंग अरेस्टर बसविण्यापासून सुरुवात केली तर अल्पावधीत आपण राज्यात वीज सुरक्षित क्षेत्रात वाढ करु शकतो. जी यंत्रणा माणसांचे आणि जनावरांचे जीव वाचवू शकते ती आपल्या परिसरात आवश्यक आहे. अशा भूमिकेतून याकडे लक्ष दिल्यास येणाऱ्या काळात शेकडो जीव वाचवणे आपणास शक्य होईल.@
✍🏼संकलन
९८ ९० ८७ ५४ ९८_             
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
         🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম