पहाटे उठणार तो घाट बघणार आणि पहाटे जो उठणार नाही तो घाटावर जाणार

🔹पहाटे उठणार तो घाट बघणार आणि पहाटे जो उठणार नाही तो घाटावर जाणार🔹

  कोल्हापूरचा अवलिया   


दि. २ आॅक्टोंबर २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/3n9Y8o7
             पहाटे उठणार तो घाट बघणार आणि पहाटे जो उठणार नाही तो घाटावर जाणार (मरणार) असा कटू सत्याचा संदेश आपल्या टी शर्टच्या पाठीवर छापून मिरविणारा एक अवलिया रोज पहाटे कोल्हापुरातून जोतिबास जातो. जाण्यापूर्वी पंचगंगेच्या घाटावर अंघोळ करतो. पोहण्याचा आनंद लुटतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्याची दिनचर्या पंचगंगेपासून सुरू होते.

पहाटे उठणार तो घाट बघणार आणि पहाटे जो उठणार नाही तो घाटावर जाणार


एकला चलो हे त्याचे ब्रीद आहे. उपजीविकेचे साधन वाहनांचे कोचिंग वर्क! एकदम उत्साही असा हा जंबो जेव्हा आपल्या दुचाकीवरून जोतिबाकडे जातो तेव्हा आपल्या जंबो आवाजात जुनी हिंदी गीते गात जातो. त्याच्या आवाजाने जागे झालेले लोक फिरायला बाहेर पडतात. आळशी लोक मात्र ‘काय शिंची कटकट’ म्हणत या कुशीवरून त्या कुशीवर वळत पुन्हा घोरायला सुरुवात करतात.
कमाल वाटते ती या गोष्टीची, एका अल्पशिक्षित माणसाला पहाटेच्या या अमृतवेळेचे इतके माहात्म्य पटले; पण उच्चशिक्षित माणसे मात्र या ब्राह्म मुहूर्ताच्या लाभापासून वंचित कसे राहतात. पहाटेच्या या प्रहरी ‘म्हणा हरी हरी’ असे म्हटले जाते. 1) ऋग्वेदामध्ये तर म्हटलंय की, जी व्यक्ती पहाटे उठते ती दीर्घायुष्यी असते. 2) या वेळेत तमो आणि रजो गुण अतिशय कमी प्रमाणात असतात. 3) ऑक्सिजन भरपूर असतो. 4) वातावरण सकारात्मक असते. 5) विचार चांगले सुचतात. 6) उत्साह आणि ऊर्जा प्राप्त होते. 7) फुफ्फुसे शक्तिशाली बनून रक्त शुद्ध होते. 8) शरीर बलवान बनून प्रतिकार शक्ती वाढते. 9) पूर्ण दिवस आपण आनंदी व उत्साही राहतो. 10) विशेष म्हणजे, पहाटेच्या वेळेमध्ये साक्षात ईश्‍वराचा आपल्याला सहवास लाभतो. अशा वेळी अंथरूणातून स्वतः उठणार की, सकाळी सात-आठपर्यंत लोळत पडणार. लोळाल तर लोळाल, हे लक्षात ठेवा. जंबोचा संदेश खरोखर जंबो आहे. पहाटे उठाल तर घाट बघणार, नाही उठाल तर घाटावर जाणार!
========================= *ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ⓽⓼⓽⓪⓼⓻⓹⓸⓽⓼ * ☜♡☞
*_🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇_*      

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম