वाघाला पुजणारं गाव
तोंडवली,मालवण तालुक्यातल्या तोंडवली गावात चक्क वाघांचं मंदिर आहे. या व्याघ्रमंदिरात स्वयंभू शिवलिंगाबरोबर वाघांच्या दोन समाधीही आहेत. गावकरी या समाधींचं मनोभावे दर्शन घेतात. पर्यावरण रक्षणाचा आगळा आदर्शच या गावाने घालून दिला आहे कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक गावं आहेत. तोंडवली त्यातलंच एक गाव. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत आलं की, एका वळणावर समुद्राचं दर्शन होतं. यापुढे गाव संपला, रस्ता थांबला असं वाटतं असतानाच रस्ता नागमोडी होत उत्तरेकडे सरकत जातो. समुद्राची निळाई आकाशाला केव्हा जाऊन भिडते समजत नाही. माडांची बनं समोर दिसू लागतात. सुरूचा भिनभिनता आवाज एखाद्या यंत्रासारखा कानापर्यंत पोहोचत असतो आणि आपण तोंडवलीत पोहोचतो. याच गावात चक्क वाघाची पूजा होते. यासाठी गावात व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे आणि गावच्या ग्रामदेवताच्या प्रांगणात दोन वाघांची समाधीही आहे. माहीती सेवा गृप पेठवड़गाव व्याघ्रेश्वराच्या मंदिरात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाशेजारी वाघ, बिबट्या ठाण मांडून असतात. ऐकणारा भीतीने गार होतो, पण गावक-यांना त्याचं काही वाटत नाही. गावाच्या शेतीवाड्यांतून जंगलातून वाघ, बिबट्या व अन्य जंगली श्वापदं बिनधास्त फिरत असतात. तोंडवलीच्या छोटेखानी गावच्या हद्दीत कुणी घुसखोरी करू नये म्हणून हद्दीवर निशाण फडकताना दिसतं. गावच्या सीमारेषेवर एक स्तंभही उभा केला आहे. या भागाला ना कुणी अभयारण्य ठरवलं आहे, ना शासनाचा फतवा आहे.♍परंतु देवाचा आदेश म्हणून अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ या भागात कुणाला शिकारी करू देत नाहीत आणि स्वत:ही करत नाहीत. गावातल्या वाघोबाच्या समाधीतून गावक-यांचं इथल्या निसर्गावर किती प्रेम आहे, याची साक्षच पटत