अनोखे मंदिर: या मंदिरात मानवी लिंगाची प्रतिकृती अर्पण करतात

 अनोखे मंदिर: या मंदिरात मानवी  लिंगाची प्रतिकृती अर्पण करतात


जगात विचित्र प्रथा परंपरा आढळतात.बॅंकाॅक मध्ये असे एक मंदिर आहे की या मंदिरात अपत्यप्राप्ती वाढवण्यासाठी चक्क  लाकडी किंवा रबरी मानवी लिंगाची प्रतिकृती अर्पण केली जाते.थायलंडमधील स्यान नदीच्या काठावर बॅकाँकमध्ये स्विसोटेल नाई लार्ट पार्क हॉटेलच्या मागे,ख्लॉन्ग सेन सॅपच्या बँकेजवळ हे अनोखे मंदिर आहे. एका मठात हे मंदिर असून येथे चाओ माई तुप्तीम या देवीची पूजा करण्यात येते.व अपत्यप्राप्ती साठी नवस केला जातो.चाओ माई ही बुद्धपूर्व काळातील वृक्षावर निवास करणारी देवी आहे, असे मानतात. चाओ माई तृप्तीम ही प्रजननशक्तीची देवी असल्याची मान्यता आहे.यासाठी भाविक लोक रबरी किंवा लाकडी मानवी लिंगाची प्रतिकृती अर्पण करतात यामुळे अपत्यप्राप्ती होते,अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिर परिसरात प्रसाद,पूजा सामग्रीसह लिंगाच्या प्रतिकृती विकणारी दुकानेही मोठ्या प्रमाणात आहेत.

अनोखे मंदिर: या मंदिरात मानवी  लिंगाची प्रतिकृती अर्पण करतात

या देवीवर भाविकांची श्रद्धा आहे.असे सांगण्यात येते की,कधी काळी एका महिलेने या मंदिरात लाकडी मानवी  लिंगाची प्रतिकृती अर्पण केली.व देवीला अपत्यप्राप्ती होण्याची प्रार्थना केली. त्यानंतर ती महिला गर्भवती झाली आणि तिला अपत्यप्राप्ती झाली. त्यानंतर या घटनेची माहिती पसरल्यानंतर ही प्रथा रुढ झाली आहे.या मंदिरात देवीला पांढरा चमेलीचा हार, कमळाचे फूल व अगरबत्ती अर्पण करण्यात येते. या मंदिरात देवीला मानवी लिंगाची प्रतिकृती अर्पण करून तिची पूजा केल्यास अपत्यप्राप्ती होते असे अनेक भाविकांनी सांगितले. या देवीला नर्तकी, हत्ती आणि घोड्याची प्रतिकृती अर्पण करण्याचीही परंपरा जुनी आहे.यामुळ् मंदिराच्या सभोवती मानवी लिंगाच्या अनेक प्रतिक्रूती दिसतात.सगळीकडे मानवी  लिंगाच्या आकाराच्या लहान मोठ्या मुर्तीनी हा परिसर भरून गेला आहे. थायी संस्कृतीत लिंगाची प्रतिकृती प्रजननशक्ती वाढवणारीआहे असे मानण्यात येत असल्याने अनेक भाविक घरातही अशा प्रतिकृती ठेवतात व त्याची पुजा करतात.थायलंड सारख्या बौद्ध संस्कृतीत, अशी चिन्हे सार्वजनिकरित्या दिसणे नक्कीच सामान्य आहे.  खरं तर, थायलंड हा लैंगिक संबंधासाठी पुराणमतवादी दृष्टिकोनासाठी ओळखला जातो.

अनोखे मंदिर: या मंदिरात मानवी  लिंगाची प्रतिकृती अर्पण करतात

असे हे अनोखे मंदिर असुन या मंदिराची लोकप्रियता वाढत चालली आहे.यामुळे पर्यटकांचा आोढाही इकडे वाढत आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম