"अगर" झाडाच्या तेलाची किंमत आहे ५० लाख रुपये

 "अगर" झाडाच्या तेलाची किंमत आहे ५० लाख रुपये


देवासमोर भक्तिभावाने लावली जाणारी सुगंधी अगरबत्ती ही पूर्वी अगर वृक्षाच्या काण्डसारा पासून तयार केली जात होती. म्हणूनच तिला ‘अगरबत्ती’ हे नाव मिळाले.(आज कृत्रिम सुगंधी अगरबत्त्यांचा वापर  करतात)

"अगर" झाडाच्या तेलाची किंमत आहे ५० लाख रुपये

चंदन,निलगिरी झाडापासून तेल काढतात हे आपणास माहित आहे.त्याची किंमत पण आवाक्यात असते.पण "अगर" झाडाचे तेल सर्वसामान्याना परवडत नाही.याचे तेल सोन्यापेक्षाही महाग असते.

या झाडाच्या तेलापासून सुंगधित द्रव्ये,अत्तर,अगरबत्ती तयार करतात.तर चीन,जपान, कोरिया,इजिप्त मध्ये या झाडाच्या लाकडांचा वापर धार्मिक कारणासाठी केला जातो. यासह कोरियामध्ये याचा वापर औषधी दारू तयार करण्यासाठी केला जातो.

 आहे.भारतातील ईशान्ये प्रातांत त्रिपुरा,भूतान,बंगाल गारो, खांसिया, नागालॅंड, काचार,सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत या झाडाची लागवड केली जाते.तर अगर हा  भारतातील त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष आहे.याच्या खोड़ाला लागलेली बुर्शी पासून खोड काळे होते ते उपयुक्तांग आहे.बंगाल, गुजराथमध्ये अगर, तर पंजाबमध्ये ऊद म्हणतात. अगर निर्यासाच्या रंग व सुगंधावरून चार प्रकार आढळतात. १) कृष्णागरू, २) काष्ठागरू, ३) दहागरू, ४) मंगलागरू

याच्या बुंध्याची साल कागदा प्रमाणे पातळ असल्याने पूर्वी तिचा भूर्जपत्राप्रमाणे लिहिण्यासाठी उपयोग करीत असत. याचे खोड पांढरे पिवळसर व मऊ असते. त्याला गंध नसतो, पण हा वृक्ष जुना झाल्यावर कृमिमुळे किंवा एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे खोडाच्या आतील सालीत तैलीयराळ (एसिन) तयार होते. ज्यामुळे अगरू खोडात काळसर रंग, जडपणा व सुगंध निर्माण होते. हाच ‘कृष्णागरू’ होय. हा अतिशय सुगंधी, पाण्यात बुडणारा, जड, असा श्रेष्ठ अगरू असतो. जळताना अधिकच सुगंध दरवळतो. ५० वर्ष जुन्या वृक्षापासून ३-४ किलो अगरू निर्यास मिळतो.

या झाडापासून मिळणारे तेल त्वचारोगात लेप लावण्यासाठी वापरतात. सुगंधामुळे हे तेल उत्तेजक आहे. या तेलाचा कानात टाकून कर्णरोग निवारणासाठी उपयोग होतो. कोडाचे पांढरे डाग कमी होण्यास अगरू तेल लावतात. सांधेदुखीतही वेदनास्थानी तेल चोळतात. सर्दी, खोकला, दमा अशा श्वासाच्या विकारात अगरूचे १-२ थेंब तेल विडय़ाच्या पानात टाकून खायला देतात.

या वृक्षापासून तयार होणारे अत्तर जगात सर्वात महाग मिळते. याची किंमत लिटरमागे 50 लाखांपेक्षाही जास्त असते. विशेष म्हणजे हे लाकूड सडल्यानंतर त्यापासून अत्तर तयार केले जाते. तसेच यापासून बनवण्यात येणाऱ्या अगरबत्त्यांची किंमत प्रति किलो पाच लाखांपेक्षाही जास्त असते. अरब राष्ट्रांमध्ये यापासून तयार होणाऱ्या अत्तर आणि अगरबत्त्यांची मोठी मागणी आहे.

आसामला ‘अगरची राजधानी’ असेही म्हटले जाते.आसाम  राज्यात जवळपास एक लाखांपेक्षाही जास्त लोक अगर या वृक्षापासून तयार होणाऱ्या तेलाच्या व्यापारावर अवलंबुन आहेत.हल्ली यामध्ये पण भेसळ केली जात आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম