तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत जाणुन घ्या

 तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत जाणुन घ्या

 सध्या मोबाईलला दोन सीमकार्ड वापरता येतात.म्हणुन तुम्ही मोबाईल करता दोन सिमकार्ड वापरत असाल,जी तुमच्या नावावर रजिस्टर असतात.पण असे सुध्दा होऊ शकते की, तुमच्या नावावर दुसराच कोणीतरी सिमकार्ड वापरत असला तर ते कसे माहिती होणार? यासाठी खालील माहिती वाचा. 

तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत जाणुन घ्या

एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ मोबाईल नंबर एक्टिव्हेट होऊ शकतात. काही वेळा आपल्या नावावर किती नंबर चालू आहेत, हे त्या व्यक्तीलाच माहिती नसतं.पण याव्यतिरिक्त कधी तुम्ही एखाद्या कंपनिचे सीमकार्ड काहीकाळ वापरून त्याकडे दुर्लक्ष केले असेल,किंवा तुमच्या नावावर असलेले सीमकार्ड दुसराच कोणीतरी वापरत असेल व तुम्हाला माहीतच नसेल.तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.

दुरूपयोग होण्याची शक्यता 

तुम्हाला माहितच असेल की, गुन्हेगार लोक विघातक काम करण्यासाठी मोबाईल करता दुसरयाच्या नावावर असलेले सीमकार्ड वापरतात.याचा त्या सीमकार्ड मालकाला पत्ताच नसतो.जर का पोलीस केस झाली की,त्या सीमकार्ड मालकाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. दुसऱ्या व्यक्तींची कागदपत्रं वापरून अवैध रीतीने मोबाईल सिम कार्डस् घेण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.म्हणूनच दूरसंचार विभागाने एक टूल लाँच केलं आहे.पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या नावावर किती सीमकार्ड आहेत हे पहा. लिंक - 👇https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/  अशी त्या पोर्टलची लिंक आहे.या लिंकवर क्लिक करून या पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकला,की ओटीपी येतो आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला आपल्या नावावर नेमकी किती सिमकार्ड्स आहेत, याची माहिती मिळते.( यासाठी chrome ब्राऊझर वापरा) 

तुमच्या नावावर असलेले नंबर बरोबर असतील तर ठीक आहे.जर तुम्ही यातील एखादा नंबर वापरत नसाल तर ब्लॉक आॉप्शनवर क्लिक करून तो नंबर ब्लॉक करू शकता.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম