एक मंदिर असेही: या मंदिरात गेल्यास त्याचा मुत्यु निश्चित

 एक मंदिर असेही: या मंदिरात गेल्यास त्याचा मुत्यु निश्चित


जगात अनेक रहस्य दडलेली आहेत. काही रहस्य उजेडात आली तर काही रहस्य ही रहस्यच बनुन राहतात.ती रहस्य सोडवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात कधी त्यांना यश मिळते तर कधी अपयश मिळते.

एक मंदिर असेही: या मंदिरात गेल्यास त्याचा मुत्यु निश्चित

तुर्की देशामध्ये एक मंदिर असे आहे की या मंदिरात कोणीही जिवित माणूस,पशु-पक्षी गेला तर तो जिंवत परत येत नाही.म्हणुन या मंदिराला "नरकाच्या दरवाजाचे मंदिर" असेही म्हणत असत.हे मंदिर दक्षिण प्रांतातील हिरापोलीस शहरात असुन ते  प्लुटो या देवाचे आहे.मंदिर फार प्राचीन असुन मंदिरात आत काळामिट्ट अंधार आहे. त्यामुळे आत काहीही दिसत नाही.मंदिरात आत गेल्यास मुत्यु होतो.या मंदिराबद्दल पिढ्यानपिढ्या ही आख्यायिका चालत आली आहे.पण मंदिराच्या आत गेल्यावर मुत्यु का येतो? हे गुढ समजत नव्हते.

याचे कारण शोधून काढण्यासाठी बरयाच जणांनी प्रयत्न केले पण यश येत नव्हते.अनेकजण या मंदिराचे रहस्य शोधण्यासाठी येऊन मंदिराची बाहेरून पाहणी करत यावेळी साहजिकच मंदिराभोवती लोक गोळा होत असत,व लोकच त्यांना सांगत की, तुम्ही प्रथम कोणतातरी प्राणी किंवा पक्षी मंदिरात सोडा, तो परत जिंवत आला तर मग तुम्ही तुमचे संशोधन पुढे चालू ठेवा.मग साहजिकच कोणतातरी प्राणी पक्षी आत सोडत.परंतु ते प्राणी पक्षी लगेचच मुत्युमुखी पडत.आता असे काही प्रारंभी पाहिल्यावर कोण पुढे जाऊन संशोधन करेल. साहजिकच संशोधक माघारी जात असत.

यामुळे या मंदिराची फारच चर्चा होऊ लागली.

म्हणुन २०१८ मध्ये संशोधकाची एक टीम या मंदिरात रहस्य शोधण्यासाठी आली.त्यांनाही असे आढळून आले की,मंदिरात आत फारच अंधार व धुर आहेव मंदिरात कोणताही प्राणी पक्षी सोडला तर तो काही वेळातच मरतो.

तरीही या टीमने धीर न सोडता आधुनिक उपकारणासह मंदिरात प्रवेश करून रहस्य उजेडात आणले.

त्यावेळी त्यांना असे आढळून आले की,मंदिराच्या आत असलेल्या गुहेतुन मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वायु बाहेर पडतो.तसेच इतरही काही विषारी वायु या गुहेतुन बाहेर पडत आहे.यामुळे कोणताही प्राणी किंवा मनुष्य आॉक्सिजन न मिळाल्याने मुत्युमुखी पडतात.

या टीमने हे शोधुन काढले की,मंदिरात व परिसरात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने हे प्रकार घडत आहेत.अशातर्हेने या मंदिरातील हे रहस्य शोधुन काढल्याने क्रित्येक वर्षे या मंदिराबद्दल असलेली दंतकथा व भिती आता संपलेली आहे

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম