दोन योनी व दोन गर्भाशय असलेल्या तीन तरूणी
मनुष्यास मग तो स्त्री असो वा पुरुष त्यास एकच लिंग असते.ती जर स्त्री असेल तर तिला एकच गर्भाशय व एकच योनी असते.पण जगात दुर्मिळापैकी दुर्मिळ असलेल्या या तीन तरूणीना,दोन योनी व दोन गर्भाशय आहेत.याचे कारण म्हणजे त्यांना "यूटेरस डायडेल्फिस" नावाचा हा दुर्मिळ आजार आहे.
ब्रिटनमध्ये एक तरूण महिला तिचे नाव आंद्रिया आहे तिला हा आजार असल्याने तिला अन्य महिलांच्या तुलनेत दुहेरी वेदनांचा सामना करावा लागतो.आंद्रिया १४ वर्षांची होती, तेव्हा तिला समजले की, तिच्या शरीरात ’Double Vagina’ आहे आणि पोटात दोन-दोन गर्भाशय आहेत. आंद्रियासाठी अशा स्थितीत कुणाशी बोलणेही अवघड होऊन बसले होते. परंतु, जेव्हा वेदना जास्त वाढल्या, तेव्हा तिने डॉक्टरांची मदत घेतली. डॉक्टरांनी तपासणीसाठी जेव्हा स्पेकुलम तिच्या नाजुक अवयवाच्या आत टाकण्यास सुरूवात केली तेव्हा तो केवळ 2 इंचावर थांबला. कारण, येथून तिची अंतर्गत सिस्टम दोन भागात विभागली होती.आणि हे आश्चर्य होते. तेव्हा त्यांनी आंद्रियाला पहिल्यांदा सांगितले की, ती इतर मुलींपेक्षा वेगळी आहे.व तिला दुर्मिळ रोग झालेला आहे.
तर दसरी तरूणी पेग डीएंजेलो ही अमेरिकेतील पेनसिल्वेनियातील फिलाडेल्फिया येथे राहते.तिच्या शरीरात सुध्दा दोन प्रजनन प्रणाली आहेत.तिला महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येते तिच्या दोन्ही प्रजनन प्रणाली योग्य पद्धतीने काम करत असून भविष्यात ती दोन्ही गर्भाशयांमध्ये गर्भ धारणा करू शकते.पेगला १८ वर्षाची होईपर्यंत आपल्या शारिरीक अवस्थेची माहिती नव्हती. दोन वर्षांपूर्वी अनियमीत पाळीमुळे ती डॉक्टरकडे गेली होती,त्यावेळी तिला ही बाब समजली.
या दोन तरूणीची ही स्थिती पाहता,युट्रेस डायडेल्फिस हा अतिशय दुर्मिळ रोग असुन दहा लाखात एखादी अशी केस असते.
तिसरी तरूणी: कॅसंड्रा बॅन्क्सन एक YouTube स्टार म्हणून ओळखली जाते. जी नियमितपणे तिच्या चाहत्यांना सौंदर्य टिप्स देते. तिच्या मूत्रपिंडात सतत वेदना होतात म्हणुन ती डॉक्टर कडे गेली असता तिला दोन योनी असल्याचे समजले.एवढेच नाही तर तिला दोन गर्भ आणि दोन गर्भाशय आहेत़.
या तीन तरूणी दिसण्यात सुध्दा इतर तरूणी सारख्या सामान्य दिसतात.बाहेरून काही लक्षात सुध्दा येत नाही.
या तरूणीना दोन योनी व दोन गर्भाशय असल्याचे माहित झाल्यावर इतरांची नजर मात्र बदललेली यांना जाणवते.
तिघीही आपआपल्या देशात सामान्य जीवन जगत असुन, खाजगी जीवनात पण सुखी आहेत.त्यांना चांगले जोडीदार मिळाले आहेत.
काय आहे हा दुर्मिळ आजार
दुहेरी गर्भाशय,हा एक दुर्मिळ आजार आहे जो स्त्रीच्या गर्भामध्ये गर्भात विकसित झाल्यावर ही स्थिती उद्भवते.
साधारणपणे,मुलरियन नलिका नावाच्या दोन नळ्या एकत्र जोडल्या जातात. ज्यामुळे एकच गर्भाशय तयार होतो, परंतु कधीकधी या दोन नळ्या सामील होण्यास अपयशी ठरतात. जेव्हा हे घडते,दोन स्वतंत्र गर्भाशय व आणि दुहेरी योनीसह विकसित होते.इतिहास पाहता या स्थिती असलेल्या काही स्त्रियांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे