म्हणुन गाडीमागे कुत्री लागतात
बर्याच वेळा तुम्ही मोटरसायकल वरून जाताना तुमच्या गाडीमागे कुत्रे धावताना अनुभवले असेल.यामुळे कधीकधी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण अशा क्रित्येक घटनात अपघात होऊन काहीजणांना आपला जीव गमावलेला आहे.
मोटरसायकल वरून जाताना रस्त्यात बरीच कुत्री तुम्हाला दिसली असतील.कधी एकटयाने तर कधी झुंडीने सुधद.पण सर्वच कुत्री मोटरसायकल मागे लागतात असे नाही.
एखादा ठराविक टारगट कुत्राच मोटरसायकल मागे लागतो.तो मागे लागल्यावर साहजिकच मोटरसायकल स्वाराचे सारे लक्ष कुत्र्याकडे लागते.व तो घाबरून जास्त वेगाने मोटरसायकल दामटतो.यावेळी हळु जावे तर कुत्र्याची भिती असते.या गडबडीत त्याचे लक्ष भरकटुन अपघात होतो.अपघात झालेवर मात्र कुत्रा गायब असतो.खरेतर हे अपघात निव्वळ भितीपेटी होतात.
मोटरसायकल मागे कुत्रा का लागतो
याची अनेक कारणे देता येतील.
१) कधीतरी एखाद्या मोटरसायकलने कुत्र्याला ठोकर दिली असेल तर तो कुत्रा तसलीच मोटरसायकल दिसल्यावर मागे धावुन भुंकुन आपला राग व्यक्त करतो.
२) मोटरसायकल पार्किग केल्यावर तिच्या टायरवर कुत्र्याने लघवी केलेली असल्यास तिचा गंध दुसऱ्या कुत्र्यास येऊन तो कुत्रा त्या वासामागे म्हणजेच गाडीमागे धावत असावा.
३) काही कुत्री शांत तर काही आक्रमक असतात.आक्रमक कुत्र्यासमोरून कुणीही गेले की ती भुंकुन हल्याचा पवित्रा घेतात.तसेच धावती मोटरसायकल गेली तर ही कुत्री जास्तच वेगाने हल्ला करण्याच्या पावित्रात धावतात.गाड्यांच्या मागे धावणे हा श्वानाचा उपजत स्वभाव किंवा अंत:प्रेरणा आहे. कोणत्याही धावत्या गोष्टीमागे ते धावतात
४) काही कुत्री धावत्या मोटरसायकल मागे लागतात व तीच मोटरसायकल थांबवली तर शेपुट घालून परत जातात पण सगळीच कुत्री असे करतीलच असे नाही.तसेच शिकार करण्याच्या प्रवृत्तीमुळे देखील कुत्रा धावत्या गाड्यांच्या मागे धावण्याची शक्यता आहे. आपल्यापासून दूर पळणाऱ्या गोष्टीला कुत्रे शिकार समजतात. त्यामुळे कुत्रा गाडीच्या मागे पळतो.
पण मोटरसायकल चालकाने एक लक्षात ठेवावी की तुम्ही मोटरसायकल वरून जात असताना कुत्रा मागे लागला तर घाबरू नका कारण कुत्रा धावणे व चावणे या दोन्ही क्रिया एकावेळी एकदम करू शकत नाही.म्हणुन गोंधळुन न जाता मोटरसायकल हळुवार गती कमी करून रस्त्यावर लक्ष ठेवून जा.फारतर कुत्रा पॅन्टवर त्याचा पाय मारेल पण चावु शकणार नाही