मोबाईल वर मिळवा दहावी,बारावी मार्कलिस्ट

 मोबाईल वर मिळवा दहावी,बारावी मार्कलिस्ट


बरयाचजणाकडे दहावी बारावी मार्कलिस्ट खराब झालेले असते,किंवा त्यावर पिवळे डाग पडुन जीर्ण झालेले असते किंवा हरवलेले असते.अशावेळी तुम्हाला महत्त्वाचे कामासाठी त्याची आवश्यकता भासु शकते.

यासाठी बोर्डाने १९९० नंतरची दहावी-बारावी मार्कलिस्ट डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

मोबाईल वर मिळवा दहावी बारावी मार्कलिस्ट

यासाठी प्रथम तुमचे मोबाईल वर क्रोम ब्राऊझर मध्ये जाऊन ही लिंक http://bit.ly/3ymMQkW आोपन करा.

तुम्हाला हे पेज दिसेल.

मोबाईल वर मिळवा दहावी,बारावी मार्कलिस्ट


येथे डाव्या बाजूला तुम्हास तुमचे अकाउंट काढावे लागेल.यासाठी creat new account वर टच करून करा.

गूणपत्रकावरील नाव आहे तसेच भरा.

 त्यानंतरही कॅटेगरी मध्ये Individual पर्याय निवडा. 

रजिस्ट्रेशन मध्ये ssc and hsc board हा पर्याय निवडा.

त्याखाली आपला चालू मोबाईल नंबर टाका जेणेकरून त्यावर OTP प्राप्त होऊ शकेल मात्र हा मोबाईल नंबर यापूर्वी या संकेतस्थळावर वापरण्यात आलेला नसावा.

त्याखालील बॉक्समध्ये ई-मेल अड्रेस काळजीपूर्वक भरा आणि रजिस्ट्रेशन नंतर हाच आपला युजर नेम असेल.

यानंतर पासवर्ड टाकावा तो संयुक्त स्वरूपामध्ये असला पाहिजे उदाहरणार्थ Kolhapur@999

आता पासवर्ड confirm करावा व त्याखाली दिसनारा  व्हेरिफिकेशन कोड टाकावा.

I Agree ला क्लिक करावे व त्याखालील Register या बटनावर क्लिक करावे.

यानंतर आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करण्यासाठी आपल्या मोबाईलवर OTP पाठवण्यात येईल तो टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

यानंतर verify ssc and hsc marksheet यावर जाऊन युजरनेम म्हणजेच ई-मेल अड्रेस टाकून, पासवर्ड टाकावा व त्याखालील व्हेरिफिकेशन कोड टाकून Login करावे.

लॉगिन झाल्यानंतर:

verify ssc and hsc marksheet यावर जाऊन

येणारी माहिती ssc and hsc marksheet वरून अचूक भरावी

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली येणाऱ्या बटनावर क्लिक केल्यानंतर 

पीडीएफ फाईल डाऊनलोड होईल.





थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম