जेव्हा बाळासाहेब ठाकरेना भुजबळानी अटक करून दाखवली होती


जेव्हा बाळासाहेब ठाकरेना भुजबळानी अटक करून दाखवली होती


शिवसेना वाढवणयात जेवढा बाळासाहेबांची वाटा होता त्यात खारीचा वाटा छगन भुजबळांचाही होता हे खुद्द बाळासाहेबांनी सुध्दा कबुल केले होते.

छगन भुजबळ म्हणजे "कट्टर शिवसैनिक" बाळासाहेबांच्या साठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे.

जेव्हा बाळासाहेब ठाकरेना भुजबळानी अटक करून दाखवली होती

पण १९९० साल सुरू होते शिवसेनेचा झंझावात महाराष्ट्र भर सुरू होता. देशात रामजन्मभुमी चे वारे सुरू होते.केन्द्रात जनता दलाचे व्ही. पी. सिंग सरकार आले होते. त्यांनी बासनात ठेवलेला "मंडल आयोग" बाहेर काढून त्याची अंमलबजावणी केली. आणि भुजबळांच्या मनात कोठेतरी पाल चुकचुकली.शिवसेनेत आपल्याला डावलले जातेय अशी त्यांची भावना झाली.त्यांची नाराजी बाळासाहेबांच्या कानावर गेली. त्यांनी भुजबळाना मातोश्री वर बोलावुन घेतले, व पहिला प्रश्न टाकला. "काय रे छगन,माझ्यावर कधीपासून रूसू लागलायसं, जगदंबेची शपथ आहे तुला,तुझ्या मनात काय आहे ते स्पष्ट बोल, काय हवे ते माग तुझा रूसवा नाही काढला तर नाव ठाकरे लावणार नाही"  बाळासाहेबांचा हा अनपेक्षित प्रश्न एेकुन भुजबळ गांगरले व म्हणाले, काही नाही साहेब मी कशाला तुमच्या वर रूसु.

यावर बाळासाहेब म्हणाले,माझ्या कानावर येते ते काही खोटे नसणार.पण लक्षात ठेव, शिवसेनेशी गद्दारी करू नको,नाहीतर आयुष्यभर पश्चातापात होरपळत राहशिल,तुझ्यावर लवकरच मोठी जबाबदारी देतोय.

आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना परत एकदा मुंबईच्या महापौराची जबाबदारी भुजबळाना दिली. कारण आतापर्यंत दुसरयांदा महापौराची जबाबदारी कुणालाही देण्यात आली नव्हती.

१०९० मध्ये भुजबळ दुसरयांदा महापौर झाले.पण मनातुन चलबिचल होते.

१९९१ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागल्या  बाळासाहेब,भुजबळ ,मनोहर जोशीनि महाराष्ट्र पिंजुन काढला आणि शिवसेना- भाजपला घवघवीत यश मिळाले.काॅन्ग्रेसला निसटते बहुमत मिळाले तर दोन नंबरचा पक्ष शिवसेना-भाजप  ठरला. संख्याबळाप्रमाणे शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद आले.

विरोधी पक्षनेतेपद हे कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे असलेने साहजिकच यावर मनोहर जोशी,सुभाष देसाई,आदींचा डोळा होता.

पण शिवसेनेत "बाळासाहेब म्हणतील तिच पुर्व" असे असल्याने सगळयांचे लक्ष बाळासाहेबांच्या कडे लागुन राहिले.बाळासाहेबानी आपल्या शिलेदासह बैठक बोलावली.व अनपेक्षितपणे मनोहर जोशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. कोणी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता.भुजबळ मनातुन खट्ट झाले.त्यांना वाटत होते बाळासाहेब आपली निवड करतील म्हणुन.

हा झाला इतिहास,एवढ्यासाठी की भुजबळानी शिवसेना का सोडली या कारणासाठी.

आणी ही नाराजी मुख्यमंत्री शरद पवारांनी हेरली व छगन भुजबळाना शिवसेनेतुन फोडले. व काॅन्ग्रेस सरकार मध्ये महसूलमंत्री केले.संपुर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक पेटला त्यावेळी शिवसेनेशी गद्दारी म्हणजे खायचे काम नव्हते.भुजबळ व बाळासाहेब यांचे वितुष्ट आले,"खाल्या ताटात हा++" अशी निर्भत्सणा बाळासाहेबानी केली. भुजबळ यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ला देखील झाला होता. बाळासाहेबानी लखोबा लोंखडे अशी उपाधीही दिली.व जाईल तेथे ठाकरी भाषेत समाचार घ्यायला सुरुवात केली.

तर इकडे भुजबळ पण कमी नव्हते त्यांनी पण बाळासाहेब यांना "टी.बाळु" म्हणुन हिणवायला सुरूवात केली. गुरू शिष्याचा वाद पेटला.होताहोता १९९५ साल उजाडले.राज्यात शिवसेना-भाजप युती सरकार आले.इकडे ठाकरे-भुजबळ वाद चालुच होता.दै सामना मधुनभुजबळ यांचेवर वार होत होते.

भुजबळ विरोधी पक्षनेते झाले.तोवर राज्याच्या युती सरकारने श्रीकृष्ण आयोगाची फाईल गुंडाळून ठेवली.राजकारणातुन शरद पवार दिल्लीत गेले होते.परत १९९९ साली कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकार येऊन विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले तर भुजबळ गृहमंत्री बनले.

भुजबळांनी आपल्या टेबलवर श्रीकृष्ण आयोगाची फाईल आल्यावर तडफातडफी निर्णय घेतला व  बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचे आदेश सोडले.मुंबईतील वातावरण पेटले.ठिकठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. छगन भुजबळ बदल्याच्या भावनेतून हि कारवाई करत आहेत असं बोललं जात होतं.महाराष्टातील वातावरण स्फोटक बनलं.ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. शाळा लवकर सोडण्यात येत होत्या. दुकाने बंद करून लोकं आपआपलं घरी निघत होती. संपूर्ण देश टीव्ही समोर येऊन बसला होता.काय होईल सांगता येत नव्हते.मुंबईत पोलिसांची स्पेशल तुकडी कोर्टात तैनात करण्यात आली. तरीही ठिकठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली.पण राज्य सरकार पर्यायाने गृहमंत्री भुजबळ यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला.काहीही करून ठाकरेना अटक करून तुरुंगत  धाडणारच हा पण त्यांनी केला होता.२४ जुलै २००० चा दिवस संपूर्ण मुंबईमधील वातावरण तंग बनलं होतं. सुमारे ५०० पोलीस बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यासाठी मातोश्रीवर पोहचले. मातोश्री भोवती शिवसैनिकानी पण गर्दी केली होती. प्रचंड गर्दीत जयजयकाराच्या गजरात बाळासाहेब पोलिसांच्या स्वाधीन झाले.गाड्याचा ताफा तिथून महापौर बंगल्यात गेला, व बाळासाहेबांना कागदोपत्री अटक करण्यात आली.व लागलिच बुलेटप्रुफ कार मधून त्यांना थेट कोर्टात नेण्यात आलं. नामवंत वकील सतीश मानेशिंदे यांनी बाळासाहेबांची बाजु कोर्टात मांडली व कोर्टाने बाळासाहेब ठाकरे यांना जामीन मंजूर केला.

अशा तर्हेने बाळासाहेबांना तुरूगांत धाडण्याचे भुजबळांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম