विचित्र परंपरा! लग्नानंतर वधुवराने तीन दिवस संडासला जायचे नाही.
भारतासह जगात काही प्रथा परंपरा जोपासल्या जातात.त्याचे पालनही केले जाते.पण ही प्रथा परंपरा पाहता तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.इंडोनेशियातील तिदोन्ग समुदायातही अशीच एक प्रथा आहे. त्यामध्ये लग्नानंतर नवरा-नवरी तीन दिवस संडासचा वापर करु शकत नाहीत.
लग्न हा पवित्र संस्कार आहे. संडासमध्ये गेल्यानंतर त्यातील पावित्र्य संपुष्टात येते अशी या लोकांची समजूत आहे. नवरा-नवरींना कुणाचीही नजर लागू नये म्हणून ही प्रथा पाळली जाते.
संडासचा वापर अनेक मंडळी करत असतात. ही सर्व मंडळी आपल्या शरीरातील घाण संडासमध्ये सोडतात. त्यामुळे त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती असते. लग्नानंतर लगेच संडासला गेल्यास नवरा-नवरीची मानसिकताही नकारात्मक होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका नवदांपत्याच्या वैवाहिक आयुष्यालाही बसू शकतो, अशी अजब समजूत या लोकांची आहे.तीन दिवस संडासला जायला लागू नये म्हणून नवरा नवरींचं खाणेपिणे देखील कमी ठेवलं जातं.
ही प्रथा या समुदयात कडक पाळली जाते.पण यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.काही नविन पिढीतील तरूण या प्रथेला नाक मुरडत असले तरी समुदयापुढे त्यांना झुकावे लागते