होय! या माणसाला चंद्रावर दफन केले आहे.
युजिन शुमेकर हे खुप मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनी खगोलशास्त्रावर खुप अभ्यास आणि प्रयोग केले होते. त्यांनी 1960 मध्ये अमेरिकन भुगोलशास्त्रीय सर्व्हेमध्ये खगोलशास्त्रीय संशोधन प्रोग्राम केलेले आहेत. अपोलो मिशनच्या आंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर नक्की काय शोधायला पाहिजे, याबाबत त्यांनी प्रशिक्षण दिले होते.28 एप्रिल 1928 ला जन्म झालेले यूजीन हे 20 व्या शतकातील सर्वात हुशार व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना 1992 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉर्ज एच. डब्ल्यू बुशद्वारे विज्ञानाच्या राष्ट्रीय पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
जुलै 1997 मध्ये ते ऑस्ट्रेलियात उल्कांचा शोध घेत असतानाच एका कार अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.आपला मृतदेह चंद्रावर दफन करावा अशी शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
शुमेकरच्या सहकारी कॅरोलीन पॉर्को यांनी नासाला शुमेकरची शेवटची इच्छा सांगितली. नासाने ही इच्छा पुर्ण करण्याचे ठरवले. व १९९९ मध्ये शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर पाठवण्यासाठी पॉली कार्बोनेट कॅप्सुल तयार करण्यात आली. त्यामध्ये शुमेकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या.
१९९९ मध्ये चंद्रावर गेलेल्या ल्युनार प्रॉस्पेक्टर स्पेसक्राफ्ट या यानामधुन शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर गेल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्यांच्या अस्थी असलेली ती पॉली कार्बोनेट कॅप्सुल दफन करण्यात आली.
शुमेकर यांची अंतीम इच्छा, चंद्राबद्दलच्या अभ्यासाची त्यांना असलेली आवड, चंद्राच्या संशोधनामध्ये त्यांनी घातलेली भर, त्यासाठी त्यांनी दिलेला वेळ यामुळेच नासाने त्यांची अंतीम इच्छा पुर्ण केली. व जगातील ते पहिले अंतराळात दफन झालेले मानव ठरले