तुम्ही "शाकाहारी" म्हणुन खाता ते पदार्थ खरोखरच "शाकाहारी" आहेत का? .
भारताखेरीज जगातल्या अन्य राष्ट्रांमधील लोक बहुदा मांसाहारीच आहेत. भारतात मात्र काही समाज केवळ शाकाहारच सेवन करणारा आहे. शरीर पोषणाच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाने मांसाहाराचे महत्त्व नाकारलेले नाही. बर्याच जणांचा समज आहे की आयुर्वेदामध्ये शाकाहाराचेच महत्त्व सांगितलेले आहे. तसे पाहता मांसाहारापेक्षा शाकाहारामध्ये फायबर जास्त असतं आणि कोलेस्टेरॉल, प्रथिनं, कॅल्शिअम व मीठ कमी असतं, असं मानलं जातं. पण मांस, मांसे, अंडी व दुग्धजन्य पदार्थ आपल्या आहारामधून पूर्णतः वगळण्यासंदर्भात आजही काही गैरसमजुती आहेत. भारतात दूध,मध,चीज,व दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ शाकाहारी समजून खाल्ले जातात. शाकहाराची व्याख्या ही माणसाने आपल्या सोयीनुसार घेतलेली आहे. खरे तर शाकाहार म्हणजे ज्या आहार मध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या, छळ हे झालेले नसेल तो आहार.पण हा नियम हवा तसा वाकवला जातो.
अनेकांना मांसाहार पूर्ण वर्ज्य असतो. त्यामूळे हे लोक फक्त शाकाहार करतात.हिंसा, अहिंसा हे तत्व शास्त्रीय नजरेतून पाहिले तर आपण काहीच खाऊ शकणार नाही. कारण वनस्पतींना जीव असतोच.धान्य, बिया फळ फळावळ हि त्यांची पिल्लं/गर्भं असतात. आपण मुख्य विषयावर वळु.बाजारात असे कितीतरी पदार्थ मिळतात जे समजांप्रमाणे आणि त्यातील जिन्नसांच्या गुणधर्मानुसार शाकाहारी वाटतात. पण मुळात ते मांसाहारी असतात. मांसाहारी म्हणजे प्राणिजन्य घटकांपासून त्यांची निर्मिती झालेली असते.
१) ओमेगा 3 – ज्या पदार्थांमध्ये ओमेगा 3 हा घटक समाविष्ट असतो ते पदार्थ शाकाहारी नसून मांसाहारी असतात. मुळात हा घटक डोळ्यांना दिसणारा नसतो पण पदार्थांमध्ये समाविष्ट असतो. यात मास्यापासून मिळणारे काही घटक मिसळलेले असतात. ओमेगा 3 अळशी, चिया सीड्स आणि अक्रोड यांमध्ये प्रामुख्याने आढळते.
२) साखर- होय खरे आहे साखर ही शाकाहारी वर्गात मोडत नाही.मुळात साखर ही प्राणिजन्य घटकाचा वापर करून बनवलेली असते. अनेक ठिकाणी साखर नैसर्गिकरित्या ब्लिच म्हणजे शुभ्र केली जाते. त्यात जनावरांच्या हाडांचा उपयोग केला जातो. इतकेच नव्हे तर ब्राऊन साखरमध्ये देखील या घटकाचा वापर होतो.
३) खारे शेंगदाणे(पॅकेटमधील) अनेक मोठमोठ्या ब्रँड्सच्या खाऱ्या शेंगदाण्यांमध्ये मसाले आणि मीठ मिसळण्यासाठी जिलेटिनचा पूर्ण वापर केला जातो आणि हा पदार्थ प्राणिजन्य घटक आहे. त्यामुळे खाऱ्या शेंगदाण्याचा यात समावेश होतो.
४) सॉफ्ट ड्रिंक – होय,सॉफ्ट ड्रिंक हा असा प्रकार आहे की तुम्हाला शाकाहारी वाटु शकतो.पण नाहीतो शाकाहारी नाही यात जिलेटिनचा वापर केला जातो आणि हा पदार्थ जनावरांच्या अवयवांपासून बनतो. याचा वापर सॉफ्ट ड्रिंक्सना दाटपणा येण्यासाठी केला जातो.म्हणुन तो शाकाहारी वर्गात मोडत नाही.
५) चीज : चीजपण तुम्हाला शाकाहारी वाटु शकते पण तसे नाही. चीजसुद्धा संपूर्णतः शाकाहारी नाही. काही खास प्रकारच्या चीजमध्ये रेन्नेट नावाचा घटक असतो. हा घटक वासराच्या पोटातून काढला जातो. त्याचा वापर चीजला घट्टपणा येण्यासाठी करतात. परंतु बाजारात हे घटक न मिसळलेले चीजदेखील उपलब्ध असते.या शिवाय दहयाचे उदाहरण देता येईल दह्यामधये असंख्य बॅक्टेरिया असतात.प्रयोगशाळेत सुक्ष्म यंत्रातुन जर दही पाहिले तर बॅक्टेरिया रूपी असंख्य किडे वळवळवताना दिसतील.
६)बारबेक्यु पोटॅटो (बटाटा) चिप्स - तुम्ही जे चिप्स कुर्मकुरम खाता ते या प्रकारच्या चीप्सला तुम्ही शाकाहार समजत असाल तर ते चुकीचे आहे.बारबेक्यु पोटॅटो चिप्समध्ये चिकन फॅट्स मिसळलेले असू शकतात. त्याचा स्पष्ट उल्लेख पॅकेटवर केलेला असतो. त्यामुळे खातेवेळी तो तपासून घ्यावा लागतो.
७) व्हॅनिला आईस्क्रीम- आता तर वाचुन तुम्हाला शॉकच बसेल पण व्हॅनिला आईस्क्रीममध्ये ऑटर प्राण्याच्या अवयवांपैकी काही घटकांचा वापर केलेला असतो.व्हॅनिला फ्लेवर हा ऊदबिलाव या प्राण्याच्या बॉडीच्या पार्ट्सपासून बनवला जातो. या घटकाला “कॅस्टोरम” म्हणतात. याचा वापर आईस्क्रीमला व्हॅनिला फ्लेवर देण्यासाठी केला जातो. तसे पाहता हे खाण्याने काही नुकसान होत नाही. पण ते आइस्क्रीम किती शाकाहारी असेल ते तुम्ही ठरवा. माहितीसाठी या पदार्थाचा उल्लेख केला आहे.