व्हॅनिला आइस्क्रीम सारखी चवीची गोंडस "निळी केळी"

 व्हॅनिला आइस्क्रीम सारखी चवीची गोंडस "निळी केळी"


आता लवकरच येणार निळी केळी



केळी म्हटली की आपल्या समोर पिवळ्या रंगाची केळी येतात.(कच्ची असल्यास हिरवी)या पिवळ्या रंगाची केळी आपण पिढ्यानपिढ्या पाहत आहोत,खात आहोत.पण आता लवकरच  निळी केळी येऊ घातली आहेत.

व्हॅनिला आइस्क्रीम सारखी चवीची गोंडस "निळी केळी"

" ब्लू जावा बनानाज" या नावाने आोळखणारी या जातीची दक्षिण अमेरिकेत या केळीची शेती होते.या केळीची झाडे ६ मीटर उंच असतात आणि त्यांना दीड ते दोन वर्षात केळी लागतात. ही केळी जगात अनेक नावाने ओळखली जातात. 

फिजी मध्ये या केळ्यांना हवाईयन बनाना, हवाई मध्ये आयस्क्रीम बनाना, फिलीपिन्स मध्ये क्रि किंवा ब्ल्यू जावा बनाना म्हटले जाते. फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास आणि लुइसियाना येथे या केळीचं सर्वाधिक उत्पन्न होतं.वनस्पतीशास्त्रानुसार, केळी हे बेरी प्रकारातील फळ आहे.

पण आता कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्य बेलथानगाडी तालुक्यात पण एक शेतकरी या केळीची लागवड करत आहे.

या केळींची कातडी निळी असून केळी मलईसारखी आहेत.चव ही प्रत्यक्षात व्हॅनिला आईस्क्रीमसारखी आहे. या केळींच्या रोपांना बाधा होऊ नये म्हणून त्यांना पिशव्यांत वाढवले जाते. त्यामुळे त्याच्या फळांचा घड मोजकाच म्हणजे चाळीस ते पन्नासचा असतो.

या केळीची झाडे ६ मीटर उंच असतात आणि त्यांना दीड ते दोन वर्षात केळी लागतात. हे केळे सात इंचापर्यंत मोठे असू शकते.कमी तापमान आणि थंड प्रदेशात हे पिक चांगले येते.दक्षिण कर्नाटकात पोषक हवामान असल्याने येथे काही शेतकरी प्रयोग करत आहेत.

निळी केळी खाल्ल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचंही सांगितलं जातं. ही केळी बद्धकोष्टता कमी करते, आयर्नची कमतरता भरुन काढते आणि पचं संस्थेला तंदुरुस्त करते.केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.

लवकरच आपल्या बाजारात ही निळी केळी दिसु लागतील.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম