साबुदाणा शाकाहारी की मांसाहारी?

 साबुदाणा शाकाहारी की मांसाहारी ?


उपवासाला हटकुन साबुदाणा खाल्ला जातो.याबददल सोशल मिडीयावर खुप पोस्ट येत असतात.तर जाणुन घेऊया की साबुदाणा शाकाहारी की मांसाहारी.हे एक प्रकारच कंद आहे. साबुदाणाचे कंद मुळात दक्षिण अमेरिका येथले आहे. पोर्तुगाल व्यापाऱ्यांनी ते आफ्रिकेत आणले आणि तेथून त्यांनी १९०० शतकात भारतात आणले. साबुदाण्याचे कंद टॅपिओकाची भारतात मुख्यतः तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश येथे शेती केली जाते. त्याची लागवडी साठी हलकी भुसभुशीत मुरमाड जमीन योग्य आहे.

साबुदाणा शाकाहारी की मांसाहारी ?

या कंदाच्या टरफाल्या मध्ये हलक्या प्रमाणात सायनोजानिक ग्लायकोसाईड विषारी रसायन असतं. जमिनीतून काढल्यानंतर लगेचच त्याच्यावर उत्पादन प्रक्रिया सुरु करावी लागते. नाहीतर ती कंदमूळ खराब होतात. साबुदाणा कंदच पिक येण्यासाठी ९ ते १० महिने लागतात.याच्या खोडाला व मुळांना, अनेक महिन्यांपार्यंत मोठाल्या कंटेनर किंवा कुजवून आणि सडवून त्यांच्यातून एक पांढरा दुधासारखा पदार्थ बाहेर येतो.या पदार्थाला मोठ्या कंटेनरमध्ये किंवा मोठ्या हौदात, झाडाच्या मुळांसकट साधण्यासाठी ठेवलं जातं. काही महिन्यांनी, एक तरल पदार्थ वर तरंगू लागतो, व पांढरा जड पदार्थ तळाशी साचतो. नंतर,हे कंटेनर किंवा हौदातुन बाहेर काढून तरल पदार्थाला व खाली साचलेल्या पदार्थाला वेगवेगळं केले जाते.आणि याच जड पदार्थापासून साबुदाणा बनवण्याचा, आटा तयार होतो. पुढे, फॅक्टरी मध्ये नेऊन या  आट्यापासून साबुदाण्याचे छोटे गोलाकार दाणे बनवले जातात,चकचकीत शुभ्र पणा येण्यासाठी त्यांना पॉलिश केलं जातं.

ही झाली साबुदाणा बनवण्याची सर्व साधारण प्रक्रिया, पण आता तुम्ही म्हणाल  ह्यात तर मांसाहाराशी संबंधित काहीच नव्हतं.यासाठी फॅक्टरी मधील पध्दत समजावुन घेतली पाहिजे.

साबुदाणा शाकाहारी की मांसाहारी ?
चित्र: गुगल


 साबुदाणा हा वनस्पती पासून बनत असला तरी, मध्ये जेव्हा त्या मुळांना, लगद्याला सडण्यासाठी ठेवतात त्या कंटेनरवर कोणत्याही प्रकारचं झाकण नसतं. ते सताड उघडे असतात.आरोग्याचे नियम पाळले जात नाहीत.

फॅक्टरीमध्ये मोठमोठे लाईट सुद्धा लागलेले असतात या लाईट्सच्या भोवती जमा होणारे किडे, कीटक सरळ ह्या कंटेनर्स मध्ये जाऊन पडतात.याशिवाय, या कंटेनर्स मध्ये दीर्घ काळ ठेवल्यामुळे पांढऱ्या पदार्थांत अनेक सूक्ष्म किटाणू,अळ्या कधी तयार होतात, जे आपल्याला वरून दिसून येत नाही.हाच लगदा पुढे कामगार लोक आपल्या पायांनी तुडवतात व मेलेले किडे, कीटक, सूक्ष्म जीव, अळ्या, सगळे एकजीव होते.आणि येथेच मांसाहाराचा संबंध येतो, ही पायाने तुडवण्याची प्रक्रिया २-३ वेळा केली जाते. आणि सगळ्यात शेवटी, वर जमा झालेला तो तरल पदार्थ काढून टाकण्यात येतो.

त्या पदार्थात सहसा, झाडाच्या मुळांचा लगदा, कचरा सगळं निघून जातं. पण आधी तुडवले किडे, कीटक इत्यादी त्यातच उरतात आणि हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं असतं. या मिश्रणापासूनच पुढे साबुदाणा बनवण्यात येतो.मग आता तुम्हीच सांगा या साबुदाणयाला शाकाहारी कसा म्हणणार???

साबुदाणा सुरवातीला मांसाहारी नसतो पण त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेमुळे तो नंतर मांसाहारी पदार्थच बनतो.

आयात केलेला साबुदाणा तर स्वप्नांतसुद्धा खाऊ नये. कारण चायना आणि थायलंड ह्या देशांत साबुदाणा बनवताना जो सॅगो नावाचा घोळ बनतो त्याला अक्षरशः पायाने तुडवतात.

साबुदाणा शाकाहारी की मांसाहारी ?
चित्र: गुगल

हल्ली काही फॅक्टरी लगदा कुजवण्याच्या प्रकियेसाठी आधुनिक मशिन वापरू लागल्या आहेत.या फॅक्टरी मालकानी मानवी हस्तस्पर्श कमी होईल हे पाहिले पाहिजे व लोकांच्या श्रध्दा पायदळी तुडवु नयेत ही अपेक्षा

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম