निसर्गाचा अद्भूत चमत्कार: तीन तोंड साप असल्याचा भास होणारे फुलपाखरू
निसर्गाची लिला कोणालाही सांगता येत नाही. निसर्गाने प्रत्येक जिवाला नैसर्गिक संरक्षण दिले आहे. आता हा फोटो पहा. तो फोटो पाहून वेगळाच भितीदायक भास होत आहे, ज्यात 3 शिर असलेला साप दिसत आहे. मात्र, हा 3 शीर असलेला साप नसून निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे, हा साप नाही तर फुलपाखरू आहे.
या फोटोत दिसणारा हा 3 तोंडाचा साप नसून, जगातील सर्वात मोठं फूलपाखरु आहे. कदाचित हे पाहिल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. एटाकस एटलस (Attacus Atlas) या नावाचं हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात सुंदर फूलपाखरु आहे. फूलपाखरं हे किटकांच्या प्रजातीत येते, ज्यात अळीचा विकास होऊन फूलपाखरु तयार होतं. फूलपाखरु झाल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात हे प्रजननाचा काळ पूर्ण करते, मादी अंडी घालते आणि त्यानंतर ते मरतं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत हे निसर्गात असे काही रंग उधळतं, की पाहणारे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही.या फूलपाखराच्या दोन्ही पंखाच्या टोकांना सापाच्या तोंडासारखे आकार असतात. शिवाय त्याचं डोकंही साप असल्याचाच भास देतं.
या फूलपाखराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. जेव्हा या फूलपाखराला कुणापासूनही धोका वाटतो, तेव्हा तो पंख फडफडवतो, आणि साप असल्याचा भास निर्माण करतो, त्यामुळे समोरचा शिकारी घाबरतो, आणि तिथून निघून जातो. हे फूलपाखरु थायलंडच्या जंगलात सापडतं.निसर्गानेच या फुलपाखराला हे वरदान दिले आहे.