जेव्हा बाळासाहेब ठाकरेनी झापल्यावर शाहरुख खानची तंतरली होती

 जेव्हा बाळासाहेब ठाकरेनी झापल्यावर शाहरुख खानची तंतरली होती


तसा हा किस्सा जुना म्हणजे  १९९७ सालातली आहे.त्यावेळी निर्माता फिरोज नडियादवालाने "रफ्तार" नामक चित्रपटाचा मुहूर्तानिम्मित पार्टी ठेवली होती. ("रफ्तार" हा चित्रपट डब्यात गेल्याने प्रदर्शित झाला नाही) त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते.व मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. त्यांना व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच सांस्क्रूतिक मंत्री प्रमोद नवलकर तसेच इतर मान्यवराना या पार्टीचे आमंत्रण होते.मुंबईच्या ओबेरॉय टॉवर मध्ये ही पार्टी आयोजित केली होती!

जेव्हा बाळासाहेब ठाकरेनी झापल्यावर शाहरुख खानची तंतरली होती
मुहुर्त पार्टी

चित्रपटाचा मुहुर्त पार्टी असल्याने साहजिकच चित्रपट वर्तुळातील बडया हस्तीना पण आमंत्रण होते.संजय दत्त, अक्षय कुमार, मनीषा कोयराला अशा बड्या स्टार्सना घेऊन नडियादवाला चित्रपट बनवणार होता.

पार्टी साठी अनेक बडे ऊद्योगपती, चित्रपट संबंधित मान्यवरांच्या बरोबर शाहरुख खानला पण आमंत्रण होते. 

पार्टीत राजकीय लोंकाबरोबर अनेक व्हीआयपी असल्याने कडक बंदोबस्त होता. 

आत पार्टी नुकतीच सुरू झाली होती. बाळासाहेब व मुख्यमंत्री जोडीने आगमन झाले होते. अनेक मंडळी येत होती. साहजिकच प्रत्येकाला प्रवेशद्वारावर अडवुन चेक करून सोडले जात होते. अशातच शाहरुख खानचे आगमन झाले. शाहरुखला ज्यावेळी सिक्युरिटीने अडवले व चेक केले असता त्याच्याकडे रिवॉल्वर सापडले.लगेचच पोलिसांनी त्याच्या या बंदुकीच्या कागदपात्रांबद्दल विचारपूस केली. 

याबरोबर शाहरुख भडकला व सिक्युरिटी पोलीसांना  म्हणाला , मी कोण माहिती आहे का? मी शाहरुख खान आहे. मुकाट्याने मला आत सोडा. 

पोलिसांनी शांतपणे सांगितले की, तुम्ही कोणीही असा. तुमच्या कडे रिवॉल्वर सापडले आहे त्याचे कागदपत्र दाखवा मग आत जा. 

यावर शाहरुख अधिकच भडकून पोलिसांना अपशब्द वापरू लागला. प्रवेशद्वारावर गोंधळ होऊ लागला.येणारे मान्यवर प्रवेशद्वारावर होणारा हा गोंधळ पाहत उभे होते. 

शाहरुख तर पोलीसांचे एेकायला तयार नव्हता.पोलीसांनी वरिष्ठांना याची कल्पना दिली.वरिष्ठ पोलीस अधिकारी ताबडतोब घटनास्थळी येऊन शाहरुखची समजुत काढु लागले.पण शाहरुख एेकणयाच्या मनस्थितीत नव्हता.पोलीस एवढेच  म्हणत होते की, रिवॉल्वरचे कागदपत्रे दाखवा व आतमध्ये जा. 

हा गोंधळ सुमारे अर्धा तास चालु होता.शाहरूख बिथरला व निर्माता फिरोज नडियादवालाला अध्दातध्दा बोलु लागला."कोन समझता है ये फिरोज,सालेने एक वेटर(अक्षयकुमार) आौर एक क्रिमिनलको (संजय दत्त) लेके कैसा पिक्चर निकाल रहा है" असे बोलत फिरोजला शिव्या देऊन लागला.

आणि हा गोंधळ आत कोणीतरी बाळासाहेबांच्या कानावर घातला.बाळासाहेबानी नेमके काय प्रकरण आहे हे समजून घेऊन साहेबांनी शाहरुखला निरोप पाठवला की, शाहरुख तु मोठा असलास तरी कायद्यापुढे समान आहेस, मुकाट्याने पोलिसांना सहकार्य करावे व रिवॉल्वरचे कागदपत्र दाखव.या प्रकरणात मी लक्ष घातले तर संपूर्ण महाराष्ट्रात तुझे सिनेमे कसे चालू राहतात ते मी बघेन. 

हा निरोप येताच शाहरुखची तंतरली.काय बोलावे कळेना. मै तो ये कर रहा था, वो कर रहा था.......असे म्हणत पोलीस आधिकारयाना सहकार्य करण्याची ग्वाही  दिली व त्याने लगेच ड्रायव्हर करवी गाडीतून कागदपत्र मागवून घेतली व पोलीसांना दाखवली. मगच शाहरुखला पार्टीत प्रवेश देण्यात आला. नंतर झालेल्या पार्टीत शाहरुख गप्पगुमान बसुन होता.पार्टीत तो अवाक्षरही बोलला नाही. 

बाळासाहेबांनी या प्रकरणी लक्ष घातले म्हणुन बरे नाहीतर कदाचित या पार्टीत राडा झाला असता.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম