आश्चर्य! रबरासारखा ताणणारा पण न तुटणारा अनोखा "दगड"

 आश्चर्य! रबरासारखा ताणणारा पण न तुटणारा अनोखा "दगड"


दगड म्हटले की तो कठीण किंवा ठणक असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? जगात असा एक दगड आहे जो अजिबात कठीण नाही. हा दगड कठीण नाही पण अतिशय लवचिक आहे. पहिल्यांदा हा दगड पाहिल्यानंतर तुम्हाला तो रबर किंवा कोणत्याही दोरी सारखा लवचिक वाटेल, परंतु वास्तव काही वेगळेच आहे.हा दगड वाटतो पण मोडत नाही. 

आश्चर्य! रबरासारखा ताणणारा पण न तुटणारा अनोखा "दगड"

इटाकोलुमाइट एक प्रकारचा वाळुचा दगड आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तो पट्ट्यांच्या आकारात कापला जातो. तो खूप लवचिक बनतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो तुटतही नाही. ज्या ठिकाणी तो पहिल्यांदा सापडला त्या ठिकाणावरून या दगडाला त्याचे नाव मिळाले. हा ब्राझीलच्या मिनास गेराईसमध्ये सर्वात आधी सापडला. परंतु आता तो जगातील अनेक भागांमध्ये सहजपणे आढळतो. इटाकोलुमाइट, जॉर्जिया, अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना आणि भारतातील हरयाणाच्या कलियाना गावात देखील आढळतो.

दगड बांधकामाच्या कामातही याचा वापर केला जातो. याचा आकार 1 सेंटीमीटर जाड आणि 20 सेमी लांब प्लेटमध्ये बनवला जातो आणि भिंती किंवा मजल्यांवर लावण्यासाठी देखील वापर केला जातो. पण जेव्हा तो पातळ पट्ट्यांच्या आकारात कापला जातो, तेव्हा या दगडाची खरी जादू दिसते.या दगडाची 20 ते 50 फुटांची पट्टी कापून दोन्ही टोकांना पकडली, तर त्याच्या वजनामुळे ही पट्टी वाकडी होते. अनेकांना ही निसर्गाची जादू आहे, असं वाटतं. निसर्गात आढळणाऱ्या अनेक चमत्कारांपैकी हा एक चमत्कार आहे, असंही अनेकजण मानतात.शास्त्रज्ञ देखील त्याच्या गुणवत्तेमुळे बऱ्याच काळापासून चकित झाले आहेत. तर यामागे भूगर्भशास्त्राचा आधार असून काही रासायनिक प्रक्रियांमुळे असे दगड तयार होत असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, जर इटाकोलुमाइटची 30 किंवा 60 सेंटीमीटर लांब पट्टी कोपऱ्यांना धरून लटकवली असेल तर ती आपल्या वजनामुळे वाकेल. बरेच लोक याला जादू मानतात, परंतु ते केवळ विज्ञानामुळे होते. पूर्वी असे मानले जात होते की, हा दगड लवचिक आहे कारण त्यात अभ्रक मिसळला जातो. पण खरी गोष्ट अशी आहे की, अशी हालचाल दगडाच्या सच्छिद्रतेमुळे होते.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম