डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा ऑनलाईन डाउनलोड करा
इंटरनेटने जग जवळ आले हे खोटे नाही.काही कामे तर चुटकीसरशी आपण या माध्यमातून करू शकतो.ज्या कामासाठी दिवस दिवस घालवावा लागत होता ते काम म्हणजे फेरफार उतारा होय.
आता फेरफार उतारा (डिजिटल स्वाक्षरी सह)तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील काढुन नंतर त्याची प्रिन्ट काढु शकता.
फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते. फेरफारांची नोंदवहीला ‘हक्काचे पत्रक’ किंवा ‘फेरफार रजिस्टर’ असेही म्हणतात.
डिजिटल स्वाक्षरीत फेरफार ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी प्रथम खालील महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट लिंक ओपन करा.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून प्रवेश करू शकता.
जर तुम्ही नविनच या बेबसाईटवर आहे आला असाल तर New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.व otp पर्याय वापरू शकता.
New User Registration करताना एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला खालील माहिती भरायची आहे.
वैयक्तिक माहिती – Personal Information
पत्ता माहिती – Address Information
लॉगइन माहिती – Login Information
यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल. त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.
लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally Signed eFerfar” हा पर्याय तुम्ही पाहू शकता, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर “डिजिटल स्वाक्षरीत फेरफार (Digitally Signed eFerfar)” नावाचे एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका आणि तुमचे गाव निवडायचे आहे आणि मग फेरफार नंबर टाकायचा आहे.
सगळ्यात शेवटी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
नंतर RS.15 will be deducted from your available balance for Ferfar download, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. याचा अर्थ असा की, फेरफार उताऱ्यासाठी १५ रुपये खर्च येईल ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.
आता तुम्ही नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या खात्यात पैसे जमा असणं गरजेचं आहे.
ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
तिथं एंटर अमाऊंट समोर १५ रुपये एवढा आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊवर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथं असलेल्या छोटा डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग कन्फम बटन दाबायचं आहे.
त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अॅप, गुगल पे असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. पेमेंट झाले की तुम्हाला मोबाईल वर otp येतो
त्याखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार तिथं डाऊनलोड होईल.
यात सुरुवातीला फेरफाराचा क्रमांक, त्यानंतर अधिकाराच्या स्वरुपात काय बदल झाला, याची सविस्तर माहिती दिलेली असते. पुढे परिणाम झालेले गट क्रमांक आणि अधिकाऱ्याचं नाव आणि शेरा दिलेला असतो.
हा फेरफार उतारा डिजिटल स्वाक्षरीत (Digitally Signed eFerfar) असल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही. शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येईल. आता डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा (Digitally Signed eFerfar) काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात जायची गरज पडणार नाही.अशा तऱ्हेने तुम्ही फेरफार उतारा डिजिटल स्वाक्षरी सह डाऊनलोड करू शकता.