फक्त २७ लोकांचा इटुकला देश
होय बरोबर वाचलतं तुम्ही या देशात फक्त नि फक्त २७ लोक राहतात.आपल्या भारतात एखाद्या गावात किमान १००-१५० लोक असल्याशिवाय त्याला गाव सुध्दा म्हणत नाहीत आणि येथे तर हा देश आहे.
आतापर्यंत व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे, अशी आपली समजूत होती. पण, या देशापेक्षाही एक लहान देश पृथ्वीवर अस्तित्वात असून त्याची लोकसंख्या अवघी २७ आहे.
हा देश इंग्लंडजवळ असुन तो समुद्रात आहे. त्याचे नाव सी-लँड असे असून तो इंग्लंडच्या सफोल्क सागरतटापासून जवळपास १२ कि.मी.अंतरावर आहे. जर इतिहास पाहिला तर, पूर्वी या ठिकाणी एक समुद्री किल्ला होता. आता या किल्ल्याची पडझड झाली आहे. मात्र, या किल्ल्यातच या देशाची स्थापना करण्यात आली आहे. या किल्ल्याची निर्मिती ब्रिटनकडून दुसऱया महायुद्धापूर्वी करण्यात आली होती. महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनचे या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरची अनेक वर्षे या किल्ल्यावर अनेकांचे नियंत्रण राहिले. पण हा परिसर तसा दुर्लक्षितच होता.क्वचित काही हौशी मंडळी येथे जात असत.पण येथे जाणे म्हणजे दिव्यच होते.येथे कसलीही सोयीसुविधा नव्हती म्हणुन पर्यटक सुध्दा इकडे फिरकत नव्हते.
आणि एक दिवस ९ ऑक्टोबर २०१२ या दिवशी रॉय बेट्स नावाच्या एका व्यक्तीने आपण स्वतः या सी-लँड नामक देशाचे राजपुत्र असल्याचे घोषित केले. व तो या देशाचा राजा बनला.सीलँडमध्ये चलने आणि पासपोर्टसह संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत सादर केले आहे. बेट्स यांच्या मृत्यूनंतर आता या देशावर त्याचा मुलगा मायकेल बेट्स याचे शासन आहे. जगात अशी किमान २० तरी लघुराष्ट्रे आहेत. त्यात हा देश सर्वात लहान आहे. अशा लघुराष्ट्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात येत नाही. तरीही या देशांमधील नागरिक स्वतःला स्वतंत्र मानतात.
ब्रिटन जवळ असला तरी तो किंवा अन्य कोणत्याही देशाकडून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्नही केला जात नाही. या सी-लँड देशाचे एकूण क्षेत्रफळ २५० चौरस मीटर आहे. या देशातील लोकांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. या २५० चौरस मीटर जागेतच ते शेती करतात. आणि पोट भरण्याइतके धान्य पिकवतात. या देशाची माहिती इंटरनेटवर प्रसारित झाल्यानंतर त्याला देणग्या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. २७ पैकी काही लोक ब्रिटनमध्ये कामासाठी जातात.व परत येतात. त्यातून त्यांना काही उत्पन्न मिळते. मात्र, आपला देश ब्रिटनचा भाग असल्याचे ते मानत नाहीत. कारण त्यांना स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे आहे.