जीम बंद झाल्यानंतर घटवलेले वजन पुन्हा वाढते का ?
जीममध्ये जाणे थांबवल्यास तुमचे परत वजन वाढण्याचा धोका दाट आहे.
फेसबुक लिंक http://bit.ly/35rOuWr
अचानक हे वजन वाढणार नाही. मात्र जीम सोडल्याचा दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसण्याची शक्यता दाट आहे. यामुळे वजन वाढू शकते. जिममध्ये व्यायाम केल्याने कॅलरी बर्न होतात, शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारते. त्याचा फायदा हळूहळू वजन घटवण्यास आणि त्यानंतर ते आटोक्यात ठेवण्यास होतो. फिटनेस एक्सपर्ट रोशनी शहा यांच्या सल्ल्यानुसार, व्यायाम करणे सोडल्यानंतर आपोआपच तुमचे मेटॅबॉलिझमदेखील कमी होते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणेदेखील अवघड होते♍जिम बंद झाल्यानंतरही तुमच्या शरीराची हालचाल होईल याची काळजी घ्या. किमान 30 मिनिटे कार्डियो व्यायाम आठवड्यातून तीन वेळेस करावा. स्वतःला नॉन जिम अॅरोबिक अॅक्टिव्हीटीमध्ये गुंतवा. यामध्ये जॉगिंग, रनिंग, सायकलिंग यासारख्या व्यायाम प्रकारांचा समावेश करा. यामुळे कॅलरी कमी होण्यास मदत होते.
स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता. यामध्ये डम्बल्स, केटलबेल्सचा वापर करा. यामुळे तुमचे मेटॅबॉलिझम सुधारेल.
किमान 5000 पावलं नियमित चालल्यासदेखील तुमचे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे जवळच्या अंतरासाठी गाडीचा वापर करण्याऐवजी चालत ये-जा करा. लिफ्टऐवजी पायर्या चढून जा. चालल्यामुळे कॅलरीज बर्न होतात. सोबतच तुमचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. ♍व्यायामासोबतच तुम्ही काय खात आहात हेदेखील महत्त्वाचे आहे. रिफाईन्ड फूड खाणे टाळा. डाळ, धान्यं, फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. ट्रान्स फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, कोलेस्टेरॉल, साखर यांचे प्रमाण कमी असलेले पदार्थ आहारात ठेवा. तुमच्या शरीराला आवश्यक कॅलरींचा आहारात समावेश करा. स्त्रियांना 2000 kcal, तर पुरूषांना 2500 kcal यांची गरज असते.
_______________________&______________
Does the lost weight gain again after the gym is closed?
If you stop going to the gym, your risk of gaining weight again is high.
Suddenly it will not gain weight. However, skipping the gym is more likely to have adverse effects on your health. This can lead to weight gain. Exercising in the gym burns calories, improves the body's metabolism. The benefit is to gradually lose weight and then keep it under control. According to fitness expert Roshni Shah, your metabolism automatically slows down when you stop exercising. It also makes it difficult to control your weight. Make sure your body moves even after the gym is closed. Do at least 30 minutes of cardio exercise three times a week. Engage yourself in non-gym aerobic activity. These include exercise types such as jogging, running, cycling. This helps in reducing calories.
Strength training can be done at home. Use dumbbells, kettlebells in it. This will improve your metabolism.
Regular walking of at least 5,000 steps helps to keep your weight under control. So instead of using the car for short distances, walk back and forth. Take the stairs instead of the elevator. Walking burns calories. At the same time it helps to improve your metabolism. What you eat is important along with exercise. Avoid eating refined foods. Pulses, grains, fruits and vegetables should be included in the diet. Eat foods low in trans fats, saturated fats, cholesterol and sugar. Include the calories your body needs in your diet. Women need 2000 kcal, while men need 2500 kcal.
Tags
आरोग्य