गॅंगमनचा रात्रीचा प्रवास

 दिवस उजाडला की " त्यांची ' थांबते वाटचाल 
 
गॅंगमनचा रात्रीचा प्रवास


रात्रीचा- आवाजात जरा जरी बदल जाणवला तर रुळांची करावी लागते  तपासणी



कोल्हापूर - वेळ रात्री बारा - साडेबाराची . पावसाची चिरचिर सुरू आहे . कोल्हापूर रेल्वे स्थानकातून शेवटची मिरज पॅसेंजरही गेली आहे . रेल्वे स्थानक आणि मिरजेपर्यंत रेल्वे रुळाचा ट्रॅक शांत आहे . या ट्रॅकमधून दोघे चालत निघाले आहेत. हातात बॅटरी . एकाच्या खांद्यावर पिशवी . त्यात लोखंडी अवजारे . दुसऱ्याच्या खांद्यावर मोठा हातोडा व लोखंडी पहार. रुळांच्या मधून जाताना रुळाच्या जोडावर बॅटरीचा प्रकाश ते टाकत आहेत. जरा काही वावगं जाणवलं तर हातोड्याने रुळावर ठोकताहेत . आवाजात जरा जरी बदल जाणवला तरी ते काळजीपूर्वक रुळाची तपासणी करत करत पुढे जात आहेत. अशी रात्रीच्या अंधारातून त्यांची रुळावरून वाटचाल सुरू आहे . दिवस उजाडत आला की त्यांची त्या दिवसापुरतीची वाटचाल थांबते .
रेल्वेतल्या गॅंगमन या कामगारवर्गाची ही वाटचाल आहे . पावसाळा आला , की शेतीच्या कामांची धांदल उडते , तशी पावसाळ्यात रोज रात्री रेल्वे रुळांची काटेकोर तपासणी करण्याची रेल्वेची पद्धत आहे . पावसाळा सुरू झाल्याने कालपासून ही रात्रीची तपासणी सुरू झाली आहे . आपण रेल्वेत बसून आरामात झोपून पुढे निघून जातो ; पण त्याच रेल्वेमार्गात आपल्या सुरक्षिततेसाठी भरपावसात रात्रभर रुळांच्या मधून गस्त घालणाऱ्या गॅंगमननाही जाणून घेण्याची गरज आहे .
गॅंगमन म्हणजे प्रत्यक्ष रेल्वे रुळावर काम करणारे कर्मचारी . यांना ऑफिसकाम कधीच नाही . जे काम आहे ते केवळ रुळांवरच . रुळांची देखभाल , खडीची भर घालणे , रूळ जोडणाऱ्या मोठ्या -मोठ्या नटबोल्टना तेलपाणी करणे , ते आवळणे व पावसाळ्यात प्रत्यक्ष रात्रभर फिरून रुळांच्या अवस्थेवर नजर ठेवणे हे त्यांचे काम आहे . सर्वांत जिकिरीचे आणि जबाबदारीचे त्यांचे काम; पण गॅंगमन म्हणजे चतुर्थ श्रेणी वर्गातला कर्मचारी आहे आणि त्याचे काम म्हणजे रेल्वे , प्रवाशांच्या सुरक्षिततेची किती काळजी घेते , याचे प्रतीक आहे 

पावसाळ्यात रात्री बारा वाजता या गॅंगमनची ड्युटी सुरू होते . दोन गॅंगमननी चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत रुळावरून चालत जायचे . अन्य दोघांनी त्या पुढे जायचे . म्हणजेच रात्रीत येता - जाता त्यांनी 16 किलोमीटर चालायचे . त्यांच्याजवळ एक बॅटरी असते . सोबत अवजारांची पिशवी , एक लोखंडी पहार, खोरे असते . सभोवताली पूर्ण अंधार ; पण रुळावरून ठरलेल्या वाटेने त्यांची पायपीट सुरू होते . जाताना दोन्ही बाजूला बॅटरीचा झोत टाकून रुळांची पाहणी केली जाते. त्यांना वाटलं , रूळ थोडा खचला आहे , तर लगेच दुरुस्ती केली जाते. गंभीर असेल तर जेथे रूळ खचलेला आहे त्याच्या अलीकडे - पलीकडे पन्नास - साठ मीटरवर रुळावर फटाकडी बांधली जाते. ही फटाकडी म्हणजे एक डबी असते . तिच्यावरून इंजिनाचे चाक जाताच त्याचा आवाज होतो , तो रेल्वे ड्रायव्हरला जाणवतो. मग रुळावर पुढे काही तरी अडचण आहे , हे ओळखून ड्रायव्हर रेल्वे थांबवतो . गॅंगमन तेथे येऊन नेमके काय झाले सांगून रेल्वे काही अंतर अतिशय स्लो घेऊन पुढे जायला सांगतो . त्यामुळे संभाव्य धोका टळतो. विशेषतः नदीच्या पुलावरून रेल्वे जाते त्या वेळी गॅंगमनचा विशेष पहारा असतो. आपल्याला रात्री कधी कधी रेल्वेतून जाताना रुळाकडेला दोघे- तिघे हातात बॅटरी घेऊन उभे राहिलेले दिसतात . ते गॅंगमन असतात . पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी ते रात्रभर जागे असतात . रेल्वे धडाडत गेली की आसपासचे साप भेदरून आडवेतिडवे कसे पळतात , हे गॅंगमन रोज अनुभवतात .दखल घ्यायलाच हवी

रेल्वे गॅंगमन,railway Gangman's journey is night-tim
रेल्वेचे सर्व पातळ्यांवर आधुनिकीकरण झाले आहे ; पण पावसाळ्यात रात्री रेल्वे रुळांची तपासणी करण्यासाठी गॅंगमन हाच पर्याय आहे . कोल्हापूर रेल्वे स्थानकात 12 गॅंगमन आहेत. कालपासून त्यांचा रात्रीचा दिवस सुरू झाला आहे . आता पाऊस कमी आहे म्हणून ठिक आहे ; पण मुसळधार पाऊस सुरू झाला तर त्यांची जबाबदारी आणखी वाढत जाणार आहे . त्यामुळे रेल्वेचा ड्रायव्हर , गार्ड , टी .सी .शिवायही माघारी रात्रभर जे राबतात त्यांची थोडी तरी माहिती करून घ्यायला काय हरकत आहे ?♍
======================================================================================================================
As the day dawns, "their 'journey stops
_
Gangman's journey is night-time

Kolhapur - Time 12 midnight. It's starting to rain. The last Miraj passenger has also left Kolhapur railway station. The railway track to the railway station and Mirza is quiet. Both of them have started walking from this track. Battery in hand. A bag over one's shoulder. It contains iron tools. On the other's shoulder is a large hammer and an iron rod. They are throwing battery light on the rail joints as they pass through the rails. If they feel anything, they are hitting the rail with a hammer. Even if there is a slight change in the voice, they are carefully checking the rails and moving on. They are on their way through the darkness of the night. As the day dawns, their journey to that day stops.
This is the journey of the gangmen in the railways. As the rains come, so does the rush of agricultural work, so in the rainy season, the railways have a method of inspecting the railway tracks every night. The night check has been on since the onset of rains. We sit on the train and go to sleep comfortably; But you also need to know the gangmen who patrol the rails all night long for your safety on the same railway line.
Gangman is an employee working on a real railway track. He never has office work. The work is only on the rails. Their job is to maintain the rails, add rocks, oil the large nutbolts that connect the rails, cover them, and monitor the condition of the rails by walking overnight during the rainy season. His work of the utmost zeal and responsibility; But Gangman is a Class IV employee and his work is a symbol of how much the railways care about the safety of the passengers.
________________________
mahiti seva Group Pethwadgaon
___________________________
The gangman's duty starts at midnight in the rainy season. Two gangmen used to walk on the tracks till the Chinchwad railway crossing. The other two used to go beyond that. That means they used to walk 16 kilometers at night. They have a battery. Accompanying is a tool bag, an iron rod, a basin. Complete darkness all around; But their pipeline starts on the path set by the rails. On the way, the rails are inspected by throwing batteries on both sides. They thought that if the rule was a bit worn out, it would be repaired immediately. If severe, a firecracker is built on the rail at a distance of fifty-sixty meters from where the rail is worn. This cracker is a box. It makes a noise as soon as the engine wheel goes off, the train driver notices. Then the driver stops, realizing that there is something wrong with the track. The gangman arrives and tells us exactly what happened and tells the train to take some distance and proceed very slowly. This avoids potential danger. Gangman has a special guard, especially when the train passes over a river bridge. Sometimes at night you see two or three people standing by the train with batteries in their hands. They are gangmen. They stay up all night for safety in the rain. Every day, the gangmen experience how the snakes in the vicinity run through the train .It must be noticed.

Railway Gangman,
Railways have been modernized at all levels; But Gangman is the only option to check the railway tracks at night in the rainy season. There are 12 gangmen at Kolhapur railway station. Their night day has started since yesterday. Now the rain is less so ok; But if the torrential rains start, their responsibility will increase even more. So what's the point of getting a little information about the train driver, the guard, the TC.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম