पावनखिंड काय आहे

  पावनखिंड काय आहे

विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंचीच्या ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.
विशाळगड व पावनखिंड ही इतिहासातील महत्वाची घटना.पन्हाळयावरून सुटका करून महाराज विशाळगडाकडे रवाना झाले त्यावेळी राजेंचा पाठलाग सिध्दी मसुदच्या सैन्याने केला. या सिध्दीच्या सैन्याची वाट अडवुन महान पराक्रम बाजीप्रभु देशपांडेनी केला तीच हि पावनखिंड.
पावनखिंड काय आहे
पावनखिंडीस अगोदर घोडखिंड म्हणत असत. बाजीप्रभुनी आपल्या निवडक ३०० मावळयासह  सिध्दिच्या हजारोच्या सैन्यास अडवुन ठेवले.
पावनखिंड काय आहे
व आपल्या रक्ताने  न्हाऊन ती घोडखिंड पावन केली म्हणुन ती पावनखिंड. तो दिवस म्हणजे १२ जुलै १६६०.
बाजीप्रभुंच्या मुत्युअगोदर काही तास आणखी एका योध्दयाने आपले प्राण स्वराज्यासाठी दिले ते वीर शिवा काशिद यांनाी.
या वीर योध्दयाना शतश: नमन.!

(पावनखिंडीचे काही फोटो )

पावनखिंड काय आहे


पावनखिंड काय आहे

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম