🔹प्रा. सोनोपंत दांडेकर🔹

*⭕प्राचार्य सोनोपंत दांडेकर..वारकरी संप्रदायातील चालती बोलती ज्ञानेश्वरी⭕*
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  
_________________________
संत साहित्याचे गाढे अभ्यासक पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, प्रसाद मासिकाचे संपादक, थोर कीर्तन – प्रवचनकार, पंढरीची वारी नित्य करणारे व्रती अशा विविध नात्यांनी महाराष्ट्रभर परिचित असणारे शंकर वासुदेव तथा सोनोपंत दांडेकर. 
स.प. महाविद्यालयातील एका वर्गात !!वासुदेव हरी !! पांडुरंग हरी !! अशी घोषणा वर्गात घुमली
प्राचार्य सोनोपंत दांडेकरसर प्राचार्य असताना महाविद्यालयात अध्यापनासाठी वर्गात आले आणि वरील घोषणेने त्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी त्यांनी टिंगल करणेचा प्रयत्न केला . सरांनी लगेचच विद्यार्थ्यांस उत्तर दिले माझ्या टिगलीच्या निमित्ताने तुम्ही पांडुरंगाचे नाव घेतलेत मी धन्य झालो असे सांगितले . असे हे सोनोपंत वारकरी संप्रदायातील चालती बोलती ज्ञानेश्वरी होती .
आज त्यांचे पुण्यस्मरण कै. जोगमहाराज यांच्या समाधीच्या सान्निध्यात श्रीक्षेत्र आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. !पुणे ते आळंदीपर्यंत चौदा मैलांचे अंतर चालत जाऊन ही अंत्ययात्रा तेथे पोहोचली. पुण्याच्या इतिहासात एवढ्या प्रचंड आणि इतक्या दूरवर जाणा-या अंत्ययात्रेचा दुसरा दाखला नाही.
*शरद पवार यांचे काटेवाडीतील ह. भ .प. काळेबुवा त्यांचे शिष्य, अशिक्षित धनगर माणूस आता ते हयात नाहीत* .ते सुद्धा ज्ञानेश्वरीवर प्रवचन देत असत .त्यांची कीर्तने सुंदर प्रवचन सुद्धा सोनोपंत दांडेकरांची देणगी होती गो. नि . दांडेकर हि त्यांचे सहवासात होते .♍

!!अभिवादन!!
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম