स्वास्तिक चिन्ह

स्वस्तिक चिन्ह अकरा हजार वर्षांपूर्वीचे!


_
भारतात प्राचीन वैदिक संस्कृतीपासूनच स्वस्तिक हे चिन्ह शुभत्व, मांगल्य आणि पावित्र्याचे मानले गेले आहे. केवळ हिंदूच नव्हे तर अन्यही अनेक धर्मांमध्ये तसेच देशांमध्येही या चिन्हाचा उपयोग होत असल्याचे दिसून आले. 

स्वस्तिक चिन्ह अकरा हजार वर्षांपूर्वीचे!

हे चिन्ह किती प्राचीन आहे याबाबत वेगवेगळ्या आयआयटी, एनआयटी संस्थांमधील तज्ज्ञांच्या पथकाने एकत्र येऊन संशोधन केले. त्यावेळी हे चिन्ह तब्बल अकरा हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे त्यांना दिसून आले.
या संशोधनाची माहिती 8 जुलैला इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) ला देण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीमधील थक्क करणारे तत्त्वज्ञान आणि समृद्ध परंपरा अनेक पाश्चात्त्य लोकांना पचनी पडली नव्हती. या ‘रानटी’ लोकांची संस्कृती आणि ग्रंथ इतके प्राचीन आणि अलौकिक आहेत हे पाहून तर अनेकांनी आर्य हे मूळचे युरोपियन होते असे सांगून भारतीयांशी त्यांचा संबंध तोडण्याचा उद्योगही करून पाहिला. हिटलरनेही आम्हीच खरे नॉर्डिक (आर्य) वंशाचे आहोत असे सांगून स्वस्तिकचा नाझींसाठी (गैर) वापर केला होता. मात्र आता आयआयटी खर्गपूर, जादवपूर विद्यापीठ व अन्यही अनेक शैक्षणिक संस्थांमधील संशोधकांनी स्वस्तिकचे प्राचीनत्व व मूळ सिद्ध केले आहे. त्याचबरोबर जगातील मूळ ग्रंथ असलेल्या ऋग्वेदाच्या प्राचीनत्वाबाबतही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सिंधू संस्कृतीच्या फार पूर्वीच ऋग्वेद श्रुतींच्या म्हणजे मौखिक स्वरूपात अस्तित्वात होता, असे त्यांनी म्हटले आहे. स्वस्तिक हे चिन्ह भारतातूनच मंगोलियामार्गे अमेरिका खंडात पोहोचले व तेथील अॅझटेक व माया संस्कृतीचाही भाग बनले. तसेच फिनलँड, स्कँडिनाव्हीया, ब्रिटिश हायलँडस् आणि युरोपियन भूमीवरही पोहोचले, असे त्यांनी म्हटले आहे.♍
*हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या स्वस्तिक चिन्हाविषयी माहिती....*

१. स्वस्तिक हे कशाचे प्रतिक आहे ? = *समृद्धी, मांगल्य,शांती*

२. ते कोणत्या बोटाने काढावे ? = *अनामिका*

३. या चिन्हाचा जीवनातील अर्थ = *कल्याण असो*

४. यामुळे जीवन कसे रहाते ? = *गतिमान ?*

५. कोणत्या देवतेचे साकार रूप आहे ? = *श्रीगणेश*

६. कोणत्या देवतेचे आसन मानले आहे ? = *सूर्य*

७. यातील उभी रेघ काय दर्शविते ? = *विश्वाच्या उत्पत्तीचे कारण*

८. आडवी रेघ काय दर्शविते ? = *विश्वाचा विस्तार*

९. चार भुजा कशाचे प्रतिक आहेत ? = *धर्म,अर्थ,काम व मोक्ष*

१०. चार भुजांवर स्थित गुण कोणते ? = *आशीर्वाद,कल्याण,प्रीती व सौंदर्य*

११. डाव्या व उजव्या बाजूच्या रेघा कशाचे प्रतिक आहेत ? = *शुभलाभ,रिद्धीसिद्धी*

१२. कोणत्या बिंदूपासून काढतात ? = *मध्यबिंदूपासून*

१३. चार ठिपके म्हणजे या चार देवता होत.. = *गौरी,पृथ्वी,कूर्म,अनंत*

१४. स्वस्तिकातील कल्याण भावना कोणती ? = *वसुधैव कुटुंबकम्*

१५. शुभ म्हणून कोठे काढतात ? = *मंदिर,घराचे मुख्यद्वार, अंतरपाट*

१६. घरच्या दारावर का काढावे ? = *नकारात्मक ऊर्जा घरात येऊ नये म्हणून तसेच सर्वांना सुख समाधान लाभावे*

१७. शुभ कार्यात कोणत्या रंगाने काढतात ? = *लाल,पिवळ्या*

१८. कोणत्या शारीरिक आजारांवर  उपायकारक असते ? = *निद्रानाश,भयावह स्वप्ने*

१९. मध्यबिंदू कशाचे प्रतिक मानण्यात आले आहे ? = *श्रीविष्णूचे नाभीकमळ/ब्रह्मदेवाचे उत्पत्तीस्थान*

२०. बुद्ध परंपरेत या चिन्हाचा अर्थ = *बुद्धाचे पाऊल*

२१. बुद्धमूर्तीवर स्वस्तिक काढणारे देश = *जपान, चीन*


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম