🔹उत्खन्नात सापडला राजवाडा🔹

उत्खननात सापडला पंधराशे वर्षांपूर्वीचा राजवाडा

 रांची :झारखंडची पश्चिम सिंहभूम आणि ओडिशाच्या मयुरगंज जिल्ह्याच्या सीमेवरील बेनीसागर या ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात पंधराशे वर्षांपूर्वीच्या राजवाड्याचे अवशेष सापडले आहेत. हा राजवाडा राजा वेणुधर याचा होता. काळाच्या ओघात तो कोसळला आणि तिथे जंगल वाढले.

उत्खननात सापडला पंधराशे वर्षांपूर्वीचा राजवाडा
या ठिकाणी मोठे मोठे वृक्ष आहेत. मात्र तरीही तिथे पुरातत्त्व विभागाचे संशोधक उत्खनन करीत आहेत. या ठिकाणी एका विशाल मंदिराचे अवशेषही सापडले आहेत. या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी 55 शिवलिंगांची स्थापना करण्यात आली होती. तसेच विष्णू, गणेश, दुर्गा, हनुमान, कुबरे, सूर्य यांच्याही मूर्ती आढळून आल्या आहेत. बेनीसागर हे निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. त्यामुळे आता त्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित केले जात आहे.♍
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম