विश्वाची निर्मिती

विश्वाची निर्मिती

माहिती  सेवा गृप पेठवड़गाव 

विश्वाच्या निर्मितीच्या बर्याच संकल्पना आतापर्यंत निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी मांडल्या आहेत. 
या सर्व संकल्पना त्या-त्या शास्त्रज्ञांनी त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षावरून तसेच कल्पना करून मांडल्या आहेत. कुठल्याही गोष्टीची निर्मिती ही त्या गोष्टीच्या निर्मितीच्यावेळी असलेल्या परिस्थितीवरून काढली जाते. पण विश्वाच्या निर्मितीनंतरच इतर सर्व गोष्टी निर्माण झाल्या त्यामुळे विश्वाची निर्मिती कशी झाली असावी हे सांगणे तितकेसे सोपे नाही.
साधारण पणे १३ ते २० अब्ज वर्षापूर्वी एक मोठ्या स्फोटातून सध्याच्या विश्वाची निर्मिती झाली असावी असा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. या विधानाला अनेक इतर अनेक शास्त्रज्ञांचा विरोध असला तरी बर्य र्याच शास्त्रज्ञांचे या शोधावर एकमत असल्याने सध्यातरी विश्वाची निर्मिती एका मोठ्या स्फोटातून असे मानले जाते. या स्फोटाला इंग्रजीमध्ये 'Big Bang' म्हणजेच 'महास्फोट' असे म्हटले जाते. असे असले तरी या महास्फोटा अगोदर काय परिस्थिती होती याचे उत्तर कुणाकडेच नाही. तसेच ज्या महाकाय गोष्टीचा स्फोट झाला त्यामध्ये बर्य र्याच प्रमाणात हायड्रोजन तसेच इतर मुलद्रव्ये होती या व्यतिरिक्त त्यामध्ये इतर कोणत्या गोष्टी होत्या या बद्दल कुणालाच माहिती नाही, इतकेच नाही तर तो महास्फोट कसा झाला याकुणाचेच एकमत नाही तसेच कुणाला पुरेशी माहिती देखिल नाही.
सुरुवातीला म्हणजेच साधारणपणे १३ ते २० अब्ज वर्षापूर्वी संपूर्ण विश्व एका बिंदूवत स्वरूपात होते. त्यानंतर झालेल्या त्याच्या महास्फोटामूळे त्यातील सर्व द्रव्य अंतराळामध्ये फेकले गेले. त्यापासूनच पुढे एक-एक गोष्ट तयार होत सध्याचे विश्व आपण पाहत आहोत.

विश्वाची निर्मिती
१९३१ मध्ये जॉर्ज लेमाइटर याने सुरुवातीला महास्फोटाची संकल्पना मांडली त्यामध्ये त्याने ही संकल्पना 'गृहीत धरा' या पद्धतीने मांडली. त्याच काळादरम्यान बर्य र्याच खगोलसंशोधकांना त्यांच्या अवकाश निरीक्षणामध्ये असे आढळून आले की अंतराळातील अती दूरवरील क्वेसार एकमेकांपासून दूर जात आहेत♍विश्व आज ज्या स्थितीमध्ये आहे ती स्थिती भविष्यामध्ये राहणार नाही हे वरील निरनिराळ्या अवस्थेवरून कळून येते. परंतु भविष्यामध्ये विश्वाची स्थिती काय असेल यावर अजूनही बर्य र्याच शास्त्रज्ञांचे एकमत नसल्याने त्यावर संशोधन सुरू आहे.♍
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম