काय आहे भविष्यशास्त्र

 भविष्यशास्त्र 

माहिती सेवा गृप पेठवड़गाव

माणूस जगत असतो, ते वर्तमान काळात. स्वप्ने पहात असतो ती भविष्यकालातील.
जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता ह्यासा-या मानवी भावना आहेत. वर्तमानकाळ घडतच असतो. त्याच्या समोरच असतो,
पण भविष्काळ मात्र घडणारा असतो. भविष्यशास्त्र हे माणसाला त्या बाबात थोडीफार कल्पना देणारे शास्त्र आहे. ते खरे असते. खोटे असते. अशा विविध मते समाजात आहेत.भविष्यशास्त्र हे माणसाला दैवाकडे नेते. तो निष्क्रिय होतो,असाही एक मत प्रवाह आहे.
परंतु भविष्यशास्त्र हे माणसाला मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे.
भविष्यशास्त्राची गरज कदाचित अतिशय बुध्दिमान व्यकितला लागणीर नाही. त्याचा विश्वास त्याच्या प्रयत्नावर असतो.त्याचे विचार, कर्म करीत रहा. त्याचे चांगले वा वाईट फळ तुम्हाला मिळेलच. तुमचे कर्म जर चांगले असेल तर त्याचे फळ चांगलेच असेल.
परंतु भविष्यशास्त्राची जास्ती गरज सामान्य माणसालाच असेत. त्याचे कारण मुख्यत्वेकरुन त्याची विचारमर्यादा मानसिक सामर्थ्य हे असते. तो अधिक विचार करु शकत नाही. सकारात्मक विचार त्याला येत नाहीत. मग तो निराश होतो. निराश झाल्यानंतर दोनच गोष्टी त्याला आधारास्तव दिसतात. एक देव आणि दुसरे दैव.
नशिबात काय आहे. चांगले की वाईट, हे जाणून घेण्यासाठी तो ज्योतिषाकडे जातो. कधी कधी त्याला उपाय सापडतो. निराश झालेल्या त्याच्या मनाला, एक आशा, उभारी येते आणि परत एकदा तो नव्या उमेदिने वर्तमानकाळातल्या सुख-दुखाःला सामोरा जातो.
वादळातल्या जहाजाला जसे किना-यावर असलेला दिपस्तंभ मार्गदर्शन करतो. त्याप्रमाणे दुःखी, कष्टी, निराशेने ग्रासलेल्या, चिडलेल्या व्यक्तिला त्याचे जीवन सुखी होण्यास मार्गदर्शन करणारे हे शास्त्र आहे.
भविष्य हे बदलत नाही आणि ते बदलण्याचे सामर्थ्य़ सामान्य माणसाकडे नसते. परंतु विविध उपायाने, उपासनेने त्याची तिव्रता नक्कीच कमी होते. हे मात्र खरे आहे.

भविष्यशास्त्र
दूर असणारा चंद्र सागरावर परिणाम करतो. अवकाशात असणारा सूर्यच ही जीवसृष्टी जगवण्याचे कार्य करतो. ही गोष्ट अंधःश्रध्दा ठेऊनही खरी आहे, असे मानण्याचे कारण नाही.♍
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম